ChatGPT New Feature: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
ChatGPT वापरणाऱ्यांसाठी एक भारी बातमी आली आहे. आता तुम्हाला GIF बनवायला दुसरं कोणतं अॅप लागणार नाही. फक्त एक ओळ लिहा किंवा तुमचा फोटो टाका, आणि ChatGPT तुमच्यासाठी मजेशीर अॅनिमेटेड GIF बनवून देईल.
तुमचा साधा, स्थिर फोटो आता हसणार, रागावणार, आश्चर्यचकित होणार. फोटोला जिवंत करणं आता एकदम सोपं झालं आहे. आणि तो GIF तुम्ही थेट व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामवर शेअर पण करू शकणार. ChatGPT New Feature:
आता पर्यंत GIF पाहिजे असेल तर आपण गुगलवर जाऊन शोधायचो. जुने, सगळ्यांनी वापरलेले GIF वापरायचो. पण आता तसं नाही. तुम्हाला जसं हवं तसं GIF तुम्ही स्वतः बनवू शकता.
उदाहरण द्यायचं तर, तुम्ही ChatGPT ला लिहिलं, “नाचणाऱ्या मांजराचा GIF बनव”, तर काही सेकंदात तुमच्यासमोर नाचणारी मांजर तयार. तुम्हाला हवं ते प्राणी, हवी ती स्टाईल, सगळं तुम्ही सांगू शकता.
सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे स्वतःचा फोटो वापरून GIF बनवता येणार. तुमचा फोटो अपलोड करा आणि सांगा, “याला हसव”, “याला डोळे मिचकवायला लाव”. ChatGPT तो फोटो हलवून दाखवेल. मित्रांना वाढदिवसाला शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा कोणी रागावलं असेल तर त्याला मनवायचं असेल, तर असले पर्सनल GIF खूप कामाला येतील.
फक्त GIF बनवून ChatGPT थांबणार नाही, तर तुम्हाला तो एडिट पण करता येणार आहे.तुम्हाला GIF चा स्पीड कमी-जास्त करायचा असेल तर ते पण करता येईल. 0.5x पासून ते 2x पर्यंत स्पीड तुम्ही ठरवू शकता. हळू चालणारा GIF पाहिजे असेल तर हळू, आणि फास्ट पाहिजे असेल तर फास्ट.
इतकंच नाही, तर GIF ची प्रत्येक फ्रेम तुम्ही वेगळी बघू शकता. एखादी फ्रेम आवडली नाही तर ती बदलू शकता. तुम्हाला वाटलं की हा GIF मनासारखा झाला नाही, तर पुन्हा प्रॉम्प्टमध्ये थोडा बदल करा, ChatGPT नवीन GIF बनवून देईल.आणि एकदा GIF तयार झाला की एका क्लिकवर तो शेअर करता येणार आहे. कुठेही सेव्ह करायची, परत अपलोड करायची कटकट नाही.
हे नवीन फीचर OpenAI च्या नवीन ‘Images 2.6’ अपडेट सोबत आलं आहे. या अपडेटमुळे फक्त GIF च नाही तर फोटो बनवण्याचा स्पीड पण खूप वाढला आहे. आधी फोटो बनवायला वेळ लागायचा, आता ते काम खूप फास्ट होणार आहे.OpenAI ने सांगितलं आहे की सध्या दर आठवड्याला ChatGPT वरून 4 अब्जांपेक्षा जास्त फोटो बनवले जात आहेत. म्हणजे विचार करा, लोकांना हे किती आवडतंय. आता GIF आल्यावर तर हा आकडा आणखी वाढणार.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करायचा? एडिटिंग करताना लक्षात ठेवा ‘या’ टिप्स, मिळतील चांगले व्ह्यूज
साध्या माणसांपासून ते कंटेंट बनवणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. तुम्ही रील्स बनवत असाल, मीम्स बनवत असाल किंवा फक्त मित्रांसोबत मजा करत असाल, तर तुम्हाला आता वेगळं एडिटिंग शिकायची गरज नाही. फक्त लिहा आणि GIF तयार.
आता बघायचं आहे की हे फीचर सगळ्यांना कधी मिळतं. पण एक नक्की, GIF ची दुनिया आता पूर्णपणे बदलणार आहे. जुने, बोरिंग GIF जाऊन आता तुमच्या कल्पनेतले GIF येणार आहेत.तुम्ही असा GIF बनवलात तर पहिल्यांदा कोणाचा बनवाल?
Ans: होय, टेक्स्ट प्रॉम्प्ट किंवा फोटो वापरून GIF तयार करता येईल.
Ans: होय, 0.5x ते 2x पर्यंत स्पीड बदलता येतो.
Ans: होय, GIF च्या फ्रेम्स वेगवेगळ्या पाहून त्यात बदल करता येतात.






