Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाव बदललं, सेवा नाही! आता ‘या’ नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस… कंपनीने दिली माहिती

Airtel Priority Postpaid: देशातील दुसऱ्या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने अलीकडेच देशातील पहिली प्रायोरिटी पोस्टपेड सर्विस लाँच केली होती. आता कंपनीने या सर्विसचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने लाँच केलेल्या प्रायोरिटी पोस्टपेड सर्विसबाबत बराच वाद देखील निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 13, 2026 | 11:32 AM
नाव बदललं, सेवा नाही! आता 'या' नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस... कंपनीने दिली माहिती

नाव बदललं, सेवा नाही! आता 'या' नावाने ओळखली जाणार कंपनीची Airtel Priority Postpaid सर्विस... कंपनीने दिली माहिती

Follow Us
Follow Us:
  • एअरटेलची प्रायोरिटी पोस्टपेड सेवा आता ‘फास्ट लेन’ या नव्या नावाने उपलब्ध असेल, मात्र सेवा आणि प्लॅन्समध्ये कोणताही बदल होणार नाही.
  • या सेवेवर नेट न्यूट्रॅलिटीबाबत वाद निर्माण झाल्यानंतर ट्रायने कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
  • फास्ट लेन सेवेमुळे पात्र 5G पोस्टपेड ग्राहकांना अधिक वेगवान नेटवर्क, अनलिमिटेड डेटा आणि सुधारित अनुभव मिळणार आहे.
Airtel Fast Lane: टेलीकॉम कंपनी एअरटेलने मागील महिन्यात देशातील पहिली प्रायोरिटी पोस्टपेड सर्विस लाँच केली होती. आता या सर्विसचे नाव बदलण्यात आले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता प्रायोरिटी पोस्टपेड सर्विस फास्ट लेन या नावाने ओळखली जाणार आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, सर्विस बंद केली जात नाही तर केवळ नावात बदल केला जात आहे.

AI क्षेत्रात भारताची मोठी झेप! भारतीय कंपन्या करणार कोट्यावधी डॉलरची गुंतवणूक; SAP अहवालात झाला खुलासा

केवळ सर्विसच नाव बदललं, सर्विस बंद झाली नाही!

खरं तर, या सेवेमुळे नेट न्यूट्रॅलिटीवरील चर्चा पुन्हा सुरू झाली आहे आणि टेलीकॉम रेगुलेटर ऑफ इंडिया (TRAI) ने देखील कंपनीकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. या सर्व चर्चा सुरु असतानाच अशा अफवा पसरल्या होत्या की कंपनी प्रायोरिटी पोस्टपेड सर्विस बंद करण्याचा निर्णय घेत आहे. मात्र आता कंपनीने त्यांची भुमिका स्पष्ट करत सांगितलं आहे की, केवळ सर्विसचे नाव बदलत आहे, सर्विस बंद केली जाणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

सेवा तीच, नाव नवीन!

प्रायोरिटी पोस्टपेड सर्विसच्या नवीन नावाबाबत माहिती देताना एअरटेलने स्पष्टपणे सांगितलं आहे की, कंपनीचे लाँच कँपेन आता संपले आहे आणि फास्ट लेन नावाची सर्विस आता अधिक चांगल्या पद्धतीने सादर करण्यात आली आहे. ज्या यूजर्सनी पोस्टपेड प्लॅनची निवड केली आहे आणि ज्यांच्याकडे 5G सपोर्टेड डिव्हाईस आहेत, त्यांना फास्टर स्पीड, अनलिमिटेड डेटा आणि उत्तम सर्विसचा अनुभव मिळणार आहे. नावातील हा बदल केवळ ब्रँडिंगपुरता मर्यादित राहणार आहे आणि यामध्ये उपलब्ध असणारे प्लॅन्स पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत. सर्विस बंद होणार आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना कंपनीने सांगितलं की, ही सर्विस बंद करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आम्हाला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्टँडअलोन 5G नेटवर्क आणि स्लाइसिंग तंत्रज्ञान सर्व यूजर्ससाठी नेटवर्कची कार्यक्षमता सुधारतात. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा प्रीपेड यूजर्सवर कोणताही परिणाम होणार नाही आणि यूजर्सना त्यांची सर्विस पूर्वीप्रमाणेच मिळणार आहे. .

स्लाइसिंग टेक्नोलॉजी

नेटवर्क स्लाइसिंग टेक्नोलॉजीबद्दल बोलायचं झालं तर, हे 5G टेक्नोलॉजीमध्ये वापरले जाणारे असे एक फीचर आहे, जे एक नेटवर्क अनेक वर्चुअल नेटवर्कमध्ये स्प्लिट करते. यूजर ग्रुप किंवा विशिष्ट उद्देशांसाठी नेटवर्क स्लाइस तयार केले जाऊ शकतात. नेटवर्क स्लाइसिंगमुळे नेटवर्क अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. अमेरिका, यूके आणि मलेशियासह अनेक देशांमध्ये 5G नेटवर्क स्लाइसिंग टेक्नोलॉजी आधीपासूनच उपलब्ध आहे.

केस उघडताच होणार कनेक्ट! लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच… जाणून घ्या किंमत

वाद होण्याचे कारण काय?

एअरटेलच्या या सर्विसवर प्रचंड वाद झाला होता. अनेकांना वाटले की हे नेट न्यूट्रॅलिटीचे उल्लंघन आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की, कंपनी त्यांच्या यूजर्समध्ये भेदभाव करत आहे. या सर्विसमुळे पोस्टपेड यूजर्सना अधिक चांगला 5G अनुभव मिळणार आहे. ज्यामुळे प्रीपेड यूजर्सना पोस्टपेड सर्विसची निवड करण्यासाठी विचार करावा लागेल. शिवाय, एका संसदीय समितीने म्हटले आहे की, अशा सेवा गरीब आणि प्रीपेड वापरकर्त्यांच्या हक्कांचे उल्लंघन करत आहेत. याच वादाबाबत ट्रायने कंपनीला स्पष्टीकरण देण्यास सांगितलं होतं.

Web Title: Company change name of airtel priority postpaid service know about new name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?
1

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
2

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Oracle Layoffs 2026:  नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार
3

Oracle Layoffs 2026: नोकरीच्या बाजारात एआयचा ‘धक्का’! ‘या’ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय, लाखो कर्मचाऱ्यांच्या टांगती तलवार

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
4

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.