केस उघडताच होणार कनेक्ट! लाँग बॅटरी लाइफसह Lenovo चे नवे ईयरबड्स लाँच... जाणून घ्या किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, लेनोवो योगा ट्रू वायरलेस नॉइज कॅन्सलिंग ईअरबड्सची किंमत CNY 599 म्हणजेच सुमारे 8,300 रुपये ठेवण्यात आली आहे. प्रास्ताविक ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना हे लेटेस्ट लाँच ईअरबड्स CNY 509 म्हणजेच सुमारे 7,200 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे. ग्राहक JD.com द्वारे हे नवे ईअरबड्स हलक्या ऑफ-व्हाइट रंगात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य – Lenovo)
कंपनीने लाँच केलेले नवीन ईअरबड्स 12.2mm च्या डायनेमिक ड्राइवर्सने सुसज्ज आहेत. यूजर्सना उत्तम अनुभव मिळावा यासाठी यामध्ये 40dB पर्यंत एएनसी सपोर्ट मिळणार आहे. व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी प्रत्येक ईअरबड्समध्ये तीन मायक्रोफोन देण्यात आले आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हे ईयरबड्स व्हॉईसप्रिंट रिकग्निशन आणि एनवायर्नमेंटल नॉइज कँसिलेशन (ENC) टेक्नोलॉजीचा वापर करतात, ज्यामुळे कॉल्स आणि ऑनलाईन मिटिंगदरम्यान यूजरचा आवाज आजूबाजूच्या गोंधळापासून दूर करतो.
कनेक्टिविटीबद्दल बोलायचं झालं तर, चार्जिंग केस ओपन करताच हे ईयरबड्स त्वरित जोडले जातात. जेव्हा हे ईअरबड्स एखाद्या लेनोवो योगा पिसीसोबत जोडले जातात, तेव्हा लॅपटॉप स्क्रीनवर एक स्पेशल कनेक्शन पॉप-अप दिसू लागतो. हे ईयरबड्स वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टिम असणाऱ्या दोन डिव्हाईससोबत एकाच वेळी जोडले जाऊ शकतात. यूजर्स ईयरबड्सवर तिनवेळा टॅप करून कनेक्टेड डिव्हाईसदरम्यान अगदी सहज स्विच करू शकणार आहेत.
OnePlus चा डबल धमाका! दमदार फीचर्स दोन तगडे स्मार्टफोन्स लाँच… जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अॅक्टिव्ह नॉइज कँसलेशन बंद असल्यास हे ईअरबड्स एका सिंगल चार्जवर 7 तासांपर्यंत प्लेबॅक ऑफर करतात. तसेच चार्जिंग केससोबत वापर केल्यास या ईअरबड्सची बॅटरी एकूण 36 तासांपर्यंत वाढते. तसेच, जर अॅक्टिव्ह नॉइज कँसलेशन ऑन असेल तर ईयरबड्सची बॅटरी 4.5 तासांपर्यंत आणि चार्जिंग केस एकूण 24 तासांपर्यंत चालते. लेनोवोने त्यांच्या नव्या ईअरबड्समध्ये फास्ट-चार्जिग सपोर्ट दिला आहे. कंपनीने दावा केला आहे की, डिव्हाईस 10 मिनिटांच्या चार्जिंगवर देखील 2 तासांचा प्लेबॅक ऑफर करू शकते. पाणी आणि धूळीपासून संरक्षणासाठी याला IPX4 रेटिंग मिळाली आहे.
Ans: लेनोवो ही चीनमधील बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे.
Ans: लेनोवो लॅपटॉप, डेस्कटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन, सर्व्हर आणि इतर तंत्रज्ञान उत्पादने तयार करते.
Ans: होय, लेनोवोचे लॅपटॉप मजबूत बिल्ड क्वालिटी, चांगला परफॉर्मन्स आणि विविध किंमत श्रेणीतील पर्यायांसाठी ओळखले जातात.






