Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

Motorola Razr Fold: मोटोरोला भारतात त्यांचा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. Motorola Razr Fold नावाने येणारा हा फोन दमदार फीचर्ससह Samsung आणि Google च्या फोल्डेबल फोन्सना टक्कर देऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 11, 2026 | 01:47 PM
काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

काऊंटडाऊन सुरु! या दिवशी भारतात येणार Motorola चा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन, Samsung ला देणार टक्कर

Follow Us
Follow Us:
  • Motorola Razr Fold भारतात 13 मे रोजी लॉन्च केला जाणार आहे.
  • या फोल्डेबल फोनमध्ये Snapdragon 8 Gen 5 चिपसेट आणि 16GB रॅंम मिळू शकते.
  • फोनमध्ये 8.1-इंच फोल्डेबल डिस्प्ले, 6000mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग मिळण्याची शक्यता आहे.
Motorola Upcoming Phone: टेक कंपनी मोटोरोलाचा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन भारतात येत्या दोन दिवसांत लाँच केला जाणार आहे. आगामी स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर करण्यात आली असून, हा फोन सॅमसंग, गूगल, वनप्लस ब्रँड्सच्या फोल्ड फोन्सना टक्कर देणार असल्याचे सांगितलं जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2026 मध्ये कंपनीने हा फोन सादर केला होता. हा फोन आता भारतात दाखल होणार आहे.

BSNL Recharge Plan: कंपनीचं ग्राहकांना सरप्राईज! स्वस्त झाले ‘हे’ दोन प्लॅन्स, संपूर्ण वर्षभर राहा टेंशन फ्री

फोल्डेबल फोन कधी होणार लाँच?

कंपनी त्यांचा पहिला बुक-स्टाईल फोल्डेबल फोन भारतात 13 मे रोजी लाँच करणार आहे. हा फोन Motorola Razr Fold या नावाने सादर केला जाणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर कंपनीने या स्मार्टफोनची लाँच डेट जाहीर केली आहे. हा आगामी फोन भारतात काळ्या रंगाच्या पर्यायात सादर केला जाणार आहे. कंपनीने अलीकडेच जागतिक बाजारात Motorola Razr Ultra, Motorola Razr+ आणि Motorola Razr 2026 देखील सादर केले होते. हे मोटोरोलाचे क्लॅमशेल डिझाइन किंवा फ्लिप डिझाइन असलेले फोल्डेबल फोन आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

कोणते फीचर्स मिळणार?

मोटोरोलाने त्यांचा बुक-स्टाईलवाले फोल्डेबल फोन 29 एप्रिल रोजी अमेरिकेतील बाजारात सादर केला होता. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेटने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये 16GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 512GB यूएफएस 4.1 स्टोरेज दिले जाते. आगामी सॅमसंगच्या Galaxy Z Fold 8 ला मोटोरोलाचा हा बुक-स्टाईल फोल्डेबल फोन टक्कर देणार आहे.

Jio Recharge Plan: यूजर्सना मोठा झटका! कंपनीचा आणखी एक स्वस्त प्लॅन बंद, काय आहे कारण?

Motorola Razr Fold मध्ये 8.1 इंच मोठी फोल्डेबल स्क्रीन दिली जाण्याची शक्यता आहे. कंपनी या स्मार्टफोनमध्ये pOLED फ्लेक्सिबल डिस्प्ले पॅनलचा वापर करणार आहे. फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 6200 निट्सच्या पीक ब्राइटनेस फीचरला सपोर्ट करणार आहे. या डिव्हाईसमध्ये 6.6 इंच pOLED कवर डिस्प्ले देखील मिळणार आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 6000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करणार आहे. फोल्डेबल फोनमध्ये 6000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच हा फोन 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये IP49 रेटिंग असू शकते. कंपनी सात वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स देईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Motorola Razr Fold भारतात कधी लॉन्च होणार आहे?

    Ans: Motorola Razr Fold भारतात 13 मे रोजी लॉन्च होणार आहे.

  • Que: Motorola Razr Fold मध्ये कोणता प्रोसेसर मिळू शकतो?

    Ans: या फोल्डेबल फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 चिपसेट दिला जाऊ शकतो.

  • Que: Motorola Razr Fold मध्ये किती RAM आणि स्टोरेज मिळेल?

    Ans: फोनमध्ये 16GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Countdown begins motorola razr fold will launch in india on this day it will compete with samsung tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा
1

Aadhaar App ने रचला नवा विक्रम! 5 कोटी डाउनलोडचा टप्पा पार, घरबसल्या मिळतात ‘या’ महत्त्वाच्या सुविधा

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित
2

Smartphone Technology: फोनच्या स्क्रीनला कसा समजतो बोटांचा स्पर्श? काय आहे Touchscreen टेक्नॉलॉजी? वाचून तुम्हीही व्हाल चकित

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
3

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच
4

Galaxy S25 खरेदी करणं महागलं! Samsung ने 256GB आणि 512GB व्हेरिअंटच्या किंमती वाढवल्या, बेस मॉडेल अजूनही स्वस्तच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.