फिटनेस प्रेमींसाठी मोठी खुशखबर! Apple Fitness+ ची भारतात एंट्री, फक्त 149 रुपयांत मिळणार पर्सनल ट्रेनरसारखा अनुभव
भारतात Apple Fitness+ परवडणाऱ्या किमतीत लाँच करण्यात आले आहे. या सर्व्हिसच्या मंथली प्लॅनची किंमत 149 रुपयांपासून सुरू होते. तर अनुअल प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. Apple च्या फॅमिली शेअरिंग पॉलिसीअंतर्गत हे सबस्क्रिप्शन पाच फॅमिली मेंबरसोबत शेअर करू शकता. याशिवाय कंपनी नव्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स देखील घेऊन आली आहे. जर एखादा युजर नवीन आयफोन, अॅपल वॉच, आयपॅड, अॅपल टीव्ही, पॉवरबीट्स प्रो 2 किंवा एअरपॉड्स प्रो (तिसरी पिढी) खरेदी करत असेल, तर त्याला तीन महिन्यासाठी Apple Fitness+ फ्री मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple Fitness+ मध्ये फिटनेस केवळ एका व्यायामपुरते मर्यादित ठेवले नाही. या सर्व्हिसमध्ये एकूण 12 पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी समाविष्ट आहेत. ज्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, किकबॉक्सिंग, योगा, मेडिटेशन, माइंडफुल कूलडाउन आणि साइकलिंग सारख्या व्यायामाचा समावेश आहे. या वर्कआऊटचा वेळ 5 मिनिटापासून 45 मिनिटापर्यंत आहे. ज्यामुळे युजर्स त्यांच्या वेळ आणि फिटनेसनुसार सेशनची निवड करू शकतात. प्रत्येक वर्कआऊट व्हिडीओ प्रोफेशनल ट्रेनर्सद्वारे गाईड केले जातात, ज्यामुळे तुम्हाला घरी बसून देखील जिमसारखा अनुभव मिळतो. सर्वात खास गोष्ट म्हणजे नवीन आणि अनुभवी अशा दोन्ही यूजर्ससाठी वेगवेगळ्या लेव्हलचे वर्कआउट उपलब्ध आहेत.
Apple Fitness+ चा खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा अॅपल वॉच किंवा एअरपॉड्स प्रो (3rd Gen) सह याचा वापर केला जातो. ही सर्विस यूजर्सच्या फिजिकल अॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकते आणि स्क्रीनवर हार्ट रेट, कॅलोरी बर्न, टाइम आणि मूवमेंट डेटा सारथे रियल-टाइम मॅट्रिक्स दाखवते. एवढंच नाही, Apple Fitness+ यूजर्सच्या सवयींनुसार कस्टम वर्कआउट शेड्यूल देखील तयार करू शकतो. जसे, कोणता दिवस कोणत्या अॅक्टिव्हिटीसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे फिटनेस रूटीन फॉलो करणं अगदी सोपं होतं.
वर्कआउट दरम्यान मोटिवेशनसाठी Apple Fitness+ ला Apple Music सह इंटीग्रेट करण्यात आले आहे. एक्सरसाइज दरम्यान बॅकग्राउंडला एनर्जेटिक म्युझिक प्ले होते, ज्यामुळे वर्कआऊट करण्यासाठी आणखी मजा येते.
Ans: Apple Fitness+ ही Apple ची प्रीमियम फिटनेस सब्सक्रिप्शन सर्विस आहे, ज्यामध्ये प्रोफेशनल ट्रेनर्सकडून वर्कआउट, योगा, मेडिटेशन आणि फिटनेस सेशन्स मिळतात.
Ans: Apple Fitness+ भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आली असून भारतीय युजर्ससाठी आता उपलब्ध आहे.
Ans: Apple Fitness+ ची किंमत भारतात 149 रुपये प्रति महिना इतकी ठेवण्यात आली आहे.






