Airtel Update: कोट्यवधी यूजर्सना झटका! टेलिकॉम कंपनीने हटवली मोफत मिळणारी 'ही' खास सुविधा, जाणून घ्या सविस्तर
माणसांना नो एंट्री? सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Moltbook चर्चेत! फक्त AI Agents तयार करू शकतात अकाऊंट
कंपनीने जेव्हा या ऑफरची घोषणा केली होती तेव्हा सुरुवातीच्या अटी जाहीर करताना कंपनीने सांगितले होते की, ही ऑफर मर्यादित काळासाठी उपलब्ध असणार आहे आणि ही दीर्घकाळ चालणारी मोफत ऑफर नाही. त्यामुळे युजर्सना या ऑफरचा फायदा घेण्यासाठी घाई करावी लागणार आहे. मात्र आता कंपनीने ही मोफत ऑफर हटवली असून यामुळे युजर्सना मोठा धक्का बसला आहे. या फ्री perplexity Pro प्लॅनची किंमत 17000 रुपये होती. मात्र टेलिकॉम कंपनी एअरटेल ही सुविधा त्यांच्या युजर्सना मोफत उपलब्ध करून देत होती ही ऑफ मर्यादित काळासाठी उपलब्ध असल्याने आता कंपनीने हा प्लॅन बंद केला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एअरटेलने perplexity Pro ऑफर 2025 मध्ये लाँच केली होती. ही एक तात्पुरती ऑफर होती. जेव्हा ऑफर लाँच करण्यात आली होती त्यावेळी कंपनीने स्पष्टपणे या ऑफरमधील अटी आणि शर्ती जाहीर केल्या होत्या. ही ऑफर 16 जानेवारी 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे, असं कंपनीने स्पष्टपणे सांगितलं होतं. कंपनीने घोषणा केल्याप्रमाणे Perplexity Pro ऑफर आता प्रीपेड प्लॅनमधून ही ऑफर हटवण्यात आली आहे. ज्या ग्राहकांनी आणि यूजर्सनी Perplexity Pro प्लॅन क्लेम केला आहे आणि तो वापरत आहेत ते भविष्यात देखील ते वापरू शकतात. मात्र ज्यांनी ही संधी गमावली, त्यांचा मात्र आता तोटा होणार आहे.
ज्या यूजर्सना कालावधी संपण्यापूर्वी Perplexity Pro प्लॅन रिडीम केला आहे, ते यूजर्स पूर्वीप्रमाणेच या सर्विसेजचा आनंद घेऊ शकणार आहेत. हा प्लॅन सक्रिय झाल्यानंतर एक वर्षापर्यंत त्यांना हा अॅक्सेस मिळू शकेल. तथापि, आता ही ऑफर नवीन ग्राहकांसाठी नाही आणि ज्यांनी आधी ती रिडीम केलेली नाही त्यांच्यासाठी देखील नाही. खरं तर या सब्सक्रिप्शन प्लॅनची किंमत 17,000 रुपये आहे आणि हे एयरटेलचे सर्वात महागडे डिजिटल एड-ऑन्सपैकी एक आहे.
Perplexity Pro यूजर्सना आता हा प्लॅन अॅक्टिव्हेट करण्यासाठी बिलिंग सूचना भरावी लागणार आहे. जर फ्री ट्रायल कालावधी संपल्यानंतर सब्सक्रिप्शन रद्द झाले नाही, तर प्लॅन शुल्क आकारून आपोआप रिन्यू होईल. ज्या ग्राहकांना या सुविधेवर पैसे खर्च करायचे नाहीत त्यांनी ही सेवा वेळीच काळजीपूर्वक रद्द करावी.






