या स्मार्टफोनवर फिदा झाले यूजर्स! विक्रीत ठरला नंबर 1, जाणून घ्या लोकप्रियतेचं रहस्य
सर्वाधिक विक्री झालेल्या आयफोन 16 मध्ये 6.1 इंच OLED डिस्प्ले आहे, जो HDR कंटेट सपोर्ट आणि 2,000 निट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. A18 प्रोसेसरवाला हा आयफोन मल्टीटास्किंग आणि अॅपल इंटेलीजेंस फीचर्स अगदी सहज हँडल केले जाऊ शकतात. हाय परफॉर्मंससह हा प्रोसेसर एफिशिएंट आणि अपकमिंग सॉफ्टवेयर अपडेटसाठी कंपेटिबल देखील आहे. या डिव्हाईच्या रिअरमध्ये 48MP + 12MP चा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी आयफोनच्या फ्रंटला 12MP चा कॅमेरा दिला आहे. बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर फुल चार्जिंगवर हा आयफोन 22 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक सपोर्ट ऑफर करतो.(फोटो सौजन्य – Pinterest)
किंमत- अॅपलच्या लेटेस्ट आयफोन मॉडेल्सच्या तुलनेत या आयफोन 16 ची किंमत अत्यंत कमी आहे आणि सेल दरम्यान ग्राहकांना या डिव्हाईसच्या खरेदीवर आणखी डिस्काऊंट देखील मिळणार आहे. त्यामुळे लोकांना जास्त पैसे खर्च न करता देखील आयफोनमध्ये प्रिमियम अनुभव ऑफर केला जातो.
परफॉर्मंस- या आयफोनमध्ये A18 चिपसेट ऑफर केला जातो, जो जबरदस्त परफॉर्मंस ऑफर करतो. गेम्सपासून अॅपल इंटेलीजेंसपर्यंत अनेक दमदार फीचर्स या आयफोनमध्ये देण्यात आले आहेत. ज्यामुळे डिव्हाईस अगदी सहज हँडल केले जाऊ शकते.
सॉफ्टवेयर सपोर्ट- गेल्या काही वर्षांत, अॅपल त्यांच्या जुन्या डिव्हाईससाठी सॉफ्टवेअर अपडेट्स देत आहे, म्हणजेच जुन्या आयफोन्सनाही नवीनतम वैशिष्ट्ये मिळत राहतील. या विश्वासामुळे, लोक नवीनतम आयफोन खरेदी करण्यासाठी जास्त किंमत देण्याऐवजी थोडे जुने मॉडेल देखील खरेदी करतात.






