
Tech Tips: स्मार्टफोन खरेदी करताच सर्वात आधी करा हे काम, वर्षानुवर्षे नव्यासारखा तुमचे डिव्हाईस... जाणून घ्या
नवीन फोनमध्ये कंपन्या अनेक फीचर्स आणि एनिमेशन देतात. प्रत्येक यूजरला या फीचर्स आणि एनिमेशनची गरज असेलच असं नाही. त्यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर तुमच्या गरजेनुसार फीचर्स आणि एनिमेशनची निवड करा आणि उर्वरित सर्व फीचर्स डिसेबल करा. यामुळे तुमच्या फोनची प्रोसेसिंग पावर आणि बॅटरी वाचणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनवांटेड फीचर्सप्रमाणेच नको असलेले अॅप्स देखील डिलीट करू शकता. नव्या स्मार्टफोनमध्ये असे अनेक अॅप्स दिले जातात, ज्यांची यूजर्सना गरज नसते. त्यामुळे असे नको असलेले अॅप्स तुम्ही तुमच्या फोनमधून डिलीट करू शकता. शिवाय तुम्ही वापरत नसलेले अॅप्स देखील फोनमधून डिलीट करू शकता, जे तुम्ही इंस्टॉल केले असतील. यामुळे त्या अॅप्सकडे तुमचा डेटा जाणार नाही आणि तुमचं स्टोरेज देखील सेव्ह होईल.
तुमच्या फोनचे सॉफ्टवेयर आणि अॅप्स नेहमी अपडेट ठेवा. यामुळे तुम्ही सिक्योरिटी बग्सपासून तुमचा बचाव करू शकता. याशिवाय तुम्हाला नवीन फीचर्स वापर करण्याची देखील संधी मिळणार आहे. हल्ली गुगल सारख्या कंपन्या त्यांच्या फोनवर 7 वर्षांपर्यंत सॉफ्टेअर अपग्रेड देतात, ज्यामुळे यूजर्सना वर्षानुवर्षे नवीन फीचर्स मिळत राहतात.
अनेकांना त्यांच्या फोनवर स्क्रीन गार्ड आणि कव्हरचा वापर करायला आवडत नाही. त्यांचं अस मतं असतं की, स्क्रीन गार्ड आणि कव्हरचा वापर केल्यामुळे फोनचा लूक बदलतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य आहे, पण स्क्रीन गार्ड आणि कव्हर तुमचा फोन पडल्यास नुकसान होण्यापासून वाचवू शकतात. ते तो नवीनसारखा दिसण्यास देखील मदत करतात.