अरे देवा! केवळ 1,500 रुपयांत विकला 80 हजारांचा iPad, एक चूक कंपनीला पडली महागात; काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही संपूर्ण घटना इटलीमध्ये घडली आहे. या ठिकाणी असलेल्या एका मोठ्या रिटेल चेन MediaWorld कडून एक टेक्निकल चूक झाली. कंपनीने चुकून 13 इंच iPad Air मॉडेल त्यांच्या लॉयल्टी कार्ड होल्डर्सना केवळ 15 यूरो म्हणजेच सुमारे 1,500 रुपयांना विकले. 13 इंच iPad Air मॉडेल ची खरी किंमत सुमारे 79,990 रुपये आहे. मात्र कंपनीच्या एका चुकीमुळे या डिव्हाईसची किंमत हजारो रुपयांनी कमी झाली. टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे कंपनीच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ही समस्या निर्माण झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 11 दिवसांपर्यंत वेबसाईटवर ही किंमत लाईव्ह होती. या दरम्यान ज्यांनी हे डिव्हाईस ऑनलाईन ऑर्डर केले होते, त्यांना डिलिव्हरी देखील मिळाली. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही समस्या समजल्यानंतर MediaWorld ने ग्राहकांना दोन पर्याय दिले आहेत. यासाठी कंपनीने सर्व ग्राहकांना ईमेल देखील पाठवला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ग्राहक iPad त्यांच्याकडेच ठेऊ शकतात. पण यासाठी त्यांना उर्वरित किंमत कंपनीला द्यावी लागणार आहे. यामध्ये कंपनी ग्राहकांना एक्स्ट्रा डिस्काउंट देखील ऑफर करणार आहे. तर दुसरा पर्याय म्हणजे ग्राहक iPad कंपनीला परत देऊ शकतात आणि त्यांनी खर्च केलेले 15 यूरो म्हणजेच सुमारे 1,500 रुपये त्यांना रिफंड मिळणार आहे. यासोबतच कंपनी त्यांच्या चुकीसाठी 20 यूरो म्हणजेच सुमारे 2,050 रुपयांचे डिस्काऊंट वाउचर देखील देणार आहे. कंपनीने पाठवलेल्या ईमेलवर ग्राहक आता कशी पद्धतीने प्रतिसाद देणार आहे, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
या संपूर्ण प्रकरणावर MediaWorld च्या एका प्रवक्त्याने सांगितलं आहे की, हे एक ‘टेक्निकल एरर’ होते, ज्यामुळे प्रोडक्ट्सची किंमत अत्यंत कमी झाली होती. कंपनीच्या मते, ही किंमत इतकी वेगळी होती की ती कंपनीच्या प्रत्यक्ष व्यवसाय धोरणाचे प्रतिबिंबित करत नव्हती. कंपनीने असेही म्हटले आहे की कराराची शिल्लक अबाधित राहावी म्हणून अशा महत्त्वपूर्ण त्रुटी दुरुस्त करण्यासाठी पावले उचलण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
Ans: iPad Air च्या नवीन मॉडेलमध्ये Apple चा M-series किंवा A-series चिपसेट (मॉडेलनुसार) दिलेला असतो जो हाय-परफॉर्मन्स देतो.
Ans: मुख्य फरक प्रोसेसर, कॅमेरा, 5G सपोर्ट आणि परफॉर्मन्समध्ये असतो. 5th Gen मध्ये M1/M2 चिप दिली आहे (मॉडेलनुसार).
Ans: होय, iPad Air चे नवीन मॉडेल्स 5G कनेक्टिव्हिटी सपोर्ट करतात.






