Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI वरुन Elon Musk चा मोठा इशारा; मानवजाती धोक्यात? जगभरात खळबळ

Elon Musk Warning : उद्योगपती एलॉन मस्क यांनी कैलिफोर्नियाच्या न्यायालयात एआयच्या भविष्याबाबत गंभीर इशारा दिला आहे. भविष्यात एआय मानवजातीसाठी धोका ठरु शकतो असे त्यांनी म्हटले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 30, 2026 | 04:33 PM
Elon Musk AI Warning

Elon Musk AI Warning

Follow Us
Follow Us:
  • एआय सर्वांचा जीव घेऊ शकतो
  • एलॉन मस्क यांचे न्यायालयात धक्कादायक विधान
  • जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?
Elon Musk on Artificial Intelligence : नवी दिल्ली : उद्योगपती एलॉन मस्क यांनी कैलिफोर्नियाच्या न्यायालयात एआयच्या भविष्याबाबत गंभीर इशारे दिले आहेत. त्यांच्या मते, एआय हे एकतर मानवजातीचे सर्वांत मोठे शस्त्र ठरू शकते किंवा सर्वांत मोठा धोकाही असू शकते. ओपन एआयसोबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईदरम्यान साक्ष देताना टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक मस्क म्हणाले की, हे तंत्रज्ञान खूप वेगाने पुढे जात असून जग कोणत्या दिशेला जात आहे, याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे.

Elon Musk vs Sam Altman: एलन मस्क यांची ‘OpenAI’ विरोधात आक्रमक पवित्रा! ठोकला १२ लाख कोटींचा दावा, नेमकं प्रकरण काय?

आधुनिक एआय प्रणालीबद्दल बोलताना मस्क यांनी न्यायालयाला सांगितले की, हे आपल्या सर्वांचा जीव घेऊ शकते. इतकेच नाही तर, मानवजातीने ‘टर्मिनेटर’ चित्रपटासारख्या वाईट भविष्यापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे आणि त्याऐवजी ‘स्टार ट्रेक’ पासून प्रेरणा घेऊन चांगल्या आणि आशादायी भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे, असेही मस्क यांनी पुढे नमूद केले. आम्हाला ‘टर्मिनेटर’ नको मस्क यांच्या मते, आम्हाला ‘टर्मिनेटर’ चित्रपटासारखा निकाल नको आहे, तर जीन राँडेनबेरी यांच्या ‘स्टार ट्रेक’ मध्ये दाखवल्याप्रमाणे सकारात्मक परिणाम हवा आहे.

जेम्स कॅमेरूनच्या ‘टर्मिनेटर’ चित्रपटासारखे भविष्य नको, असे त्यांनी हाय-स्टेक्स खटल्यादरम्यान सांगितले. खरं तर, मस्क आणि सॅम ऑल्टमन याच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. मस्क यांचा दावा आहे की, ओपन एआय आपल्या मूळ ‘नॉन-प्रॉफिट’ उद्दिष्टापासून भरकटली आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी एआय बनवणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय होते, परंतु आता ती केवळ व्यावसायिक यशाकडे वळली आहे, असा आरोप त्यांनी केला.

साक्ष देताना त्यांनी सांगितले की, एआयबद्दलची ही भीती नवीन नाही. २०१५ च्या उन्हाळ्यात गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज यांच्याशी झालेल्या चर्चेतून ही भीती निर्माण झाल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. भविष्याबद्दलचा दृष्टिकोन मस्क यांच्या साक्षीत कायदेशीर युक्तिवादासोबतच भविष्याबद्दलच्या त्यांच्या विचारांची झलकही पाहायला मिळाली. मस्क यांनी यावेळी ‘न्यूरालिंक’ बद्दलही भाष्य केले.

१०० ट्रिलियन डॉलर असू शकते वेतन

टेस्लाच्या भागधारकांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) एलन मस्क यांच्यासाठी जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे वेतन पॅकेज मंजूर केले आहे. हा व्यवहार १० वर्षांत १ ट्रिलियन डॉलर म्हणजेच १०० ट्रिलियन रुपयांपर्यंत (भारतीय चलनात) असू शकतो, जो टेस्लाने काही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या अटीवर अवलंबून आहे, या लक्ष्यांमध्ये १० लाख मानवासारखे रोबोट विकणे देखील समाविष्ट आहे.

जर मस्क यानी ही सर्व उद्दिष्टे साध्य केली, तर त्यांना ५०० अब्ज डॉलरपेक्षा अधिक कमाई होऊ शकते. यामुळे त्यांची सध्याची ४६१ अब्ज डॉलरची संपत्ती आणखी वाढणार आहे. जरी त्यांच्या राजकीय संबंधांमुळे आणि ट्रम्प प्रशासनातील भूमिकेमुळे डाव्या विचारसरणीच्या ग्राहकांमध्ये टेस्लाच्या प्रतिमेला धक्का बसला असला, तरी यावधीं त्यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत आहे.

Career Tips : चांगला Job मिळत नाहीये? Elon Musk चा ‘ही’ Advise नक्की फॉलो करा

Web Title: Elon musk on artificial intelligence is thret to human in future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • AI technology
  • elon musk
  • World news

संबंधित बातम्या

Sony Bravia 9 II ची दमदार एंट्री! AI फीचर्ससह मिळणार जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव, जाणून घ्या वैशिष्ट्य
1

Sony Bravia 9 II ची दमदार एंट्री! AI फीचर्ससह मिळणार जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव, जाणून घ्या वैशिष्ट्य

Mahadev App: बनावट इंडोनेशियन पासपोर्ट अन् इंटरपोलची रेड नोटीस; ‘असा’ अडकला महादेव ॲपचा मालक सौरभ चंद्रकर
2

Mahadev App: बनावट इंडोनेशियन पासपोर्ट अन् इंटरपोलची रेड नोटीस; ‘असा’ अडकला महादेव ॲपचा मालक सौरभ चंद्रकर

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण
3

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण

AITechnology: ‘AI तंत्रज्ञान लीक झालं तर…’ चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?
4

AITechnology: ‘AI तंत्रज्ञान लीक झालं तर…’ चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.