Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahadev App: बनावट इंडोनेशियन पासपोर्ट अन् इंटरपोलची रेड नोटीस; ‘असा’ अडकला महादेव ॲपचा मालक सौरभ चंद्रकर

भारताने महादेव ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्रकर यांच्यावर आपली पकड घट्ट केली आहे. आरोपी सौरभ चंद्रकर यांना सरकारच्या विनंतीनुसार ओमानमध्ये अटक करण्यात आली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 08, 2026 | 05:30 PM
mahadev betting app promoter saurabh chandrakar arrested in oman muscat extradition india

mahadev betting app promoter saurabh chandrakar arrested in oman muscat extradition india

Follow Us
Follow Us:
  • ५,००० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सौरभ चंद्रकर याला ओमानमधील मस्कत येथे अटक करण्यात आली आहे.
  • भारताच्या विनंतीवरून जारी करण्यात आलेल्या इंटरपोलच्या ‘रेड कॉर्नर नोटीस’च्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, तो बनावट इंडोनेशियन पासपोर्टवर प्रवास करत होता.
  • सध्या त्याला मस्कत येथील ‘अल खौद’ नजरकैद केंद्रात ठेवण्यात आले असून, भारत सरकार त्याला मायदेशी आणण्यासाठी प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया राबवत आहे.

मस्कत (ओमान): भारतातील बहुचर्चित आणि हजारो कोटींच्या ‘महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप’ (Mahadev betting app case) प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्रकर याच्याभोवती तपास यंत्रणांचा पाश अधिक घट्ट झाला आहे. ओमानमधील मस्कत येथे रॉयल ओमान पोलिसांनी चंद्रकरला अटक केली असून, सध्या त्याला ‘अल खौद’ नजरकैद केंद्रात ठेवण्यात आले आहे. भारत सरकारच्या अधिकृत विनंतीनंतर ही मोठी आंतरराष्ट्रीय कारवाई करण्यात आली आहे.

बनावट पासपोर्ट आणि इंटरपोलची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, सौरभ चंद्रकर हा गेल्या काही काळापासून संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहत होता. मात्र, तिथून पळ काढून त्याने बनावट इंडोनेशियन पासपोर्टच्या साहाय्याने ओमानमध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवला होता. भारतीय तपास यंत्रणांनी त्याच्याविरुद्ध इंटरपोलमार्फत ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. याच नोटिसीच्या आधारे ओमान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या चंद्रकर याने ओमानमध्ये स्वतःची बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज उभी केली आहे, परंतु बनावट पासपोर्ट प्रकरणाने त्याच्या अडचणी अधिक वाढवल्या आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Solar Eclipse 2026: दिवसा होईल संपूर्ण अंधार, रात्री चमकेल आकाश; जाणून घ्या कधी घडणार ‘ही’ दुर्मिळ खगोलीय घटना?

५,००० कोटींची गुन्हेगारी कमाई

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासानुसार, महादेव ऑनलाइन बेटिंग नेटवर्कने तब्बल ५,००0 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची गुन्हेगारी कमाई (Proceeds of Crime) केली आहे. सौरभ चंद्रकर आणि त्याचा व्यावसायिक भागीदार रवी उप्पल यांनी २०१९ मध्ये दुबईतून हे अवैध बेटिंग साम्राज्य सुरू केले होते. क्रिकेट, फुटबॉल, टेनिस यांसारख्या खेळांवर तसेच थेट निवडणुकांच्या निकालांवर बेकायदेशीरपणे सट्टा लावण्यासाठी या ॲपचा वापर केला जात होता.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : AITechnology: ‘AI तंत्रज्ञान लीक झालं तर…’ चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?

प्रत्यार्पणासाठी भारताचे प्रयत्न तीव्र

यापूर्वी २०२४ मध्ये देखील इंटरपोलच्या नोटिसीवरून चंद्रकरला युएईमध्ये ताब्यात घेण्यात आले होते, परंतु काही तांत्रिक आणि कायदेशीर प्रक्रियेअभावी त्याची सुटका झाली होती. त्यानंतर त्याचा साथीदार रवी उप्पल युएईमधून फरार झाला होता. मात्र, यावेळी भारत सरकारने कोणतीही कसर सोडलेली नाही. ओमान सरकारसोबत राजनैतिक आणि कायदेशीर पातळीवर चर्चा सुरू असून, त्याला लवकरात लवकर भारतात प्रत्यार्पित करण्यासाठी (Extradition) गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय वेगाने काम करत आहे.

Web Title: Mahadev betting app promoter saurabh chandrakar arrested in oman muscat extradition india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • Mahadev betting app case
  • World news

संबंधित बातम्या

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण
1

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण

AITechnology: ‘AI तंत्रज्ञान लीक झालं तर…’ चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?
2

AITechnology: ‘AI तंत्रज्ञान लीक झालं तर…’ चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?

PM Modi Indonesia Visit : भारत-इंडोनेशिया सामुद्रधुनी उभारणार; PM मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार
3

PM Modi Indonesia Visit : भारत-इंडोनेशिया सामुद्रधुनी उभारणार; PM मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार

China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! गान्सू प्रांतात भूस्खलन; २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू
4

China Landslide : चीनमध्ये मोठी दुर्घटना! गान्सू प्रांतात भूस्खलन; २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.