Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
खरं तर वेबसाईटवर हा सेल 2 जानेवारी रोजी सुरु झाला आहे. हा सेल 6 जानेवारी रोजी संपणार आहे. म्हणजेच हा सेल संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्हाला या सेलमध्ये खरेदी करायची असेल तर घाई करावी लागणार आहे. आता तुमच्या विशलिस्टमध्ये असलेल्या वस्तू खरेदी करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता फ्लिपकार्ट ओपन करा आणि तुमच्या लिस्टमध्ये असलेले आयटम्स आता खरेदी करायला सुरुवात करा. फ्लिपकार्ट बिग बचत सेल 2026 सेलमध्ये कोणत्या वस्तूंवर ऑफर्स आणि डिस्काऊंट मिळणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.
आयफोनपासून सॅमसंगपर्यंत आणि मोटोरोलाच्या लेटेस्ट मॉडेल्सच्या खरेदीवर ग्राहकांना हजारो रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि ईयरबड्सच्या खरेदीवर ग्राहकांना 50 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. सोफा, बेड आणि डाइनिंग टेबलसारख्या फर्नीचरवर मेगा डील्स उपलब्ध आहेत. निवडक बँक कार्ड्सचा वापर केल्यास 10% इंस्टेंट डिस्काउंट आणि नो-कॉस्ट EMI ची सुविधा देखील मिळणार आहे.
जे लोकं आपल्या घराचा लूक बदलण्याचा विचार करत आहे किंवा ज्यांना त्यांचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करायचा आहे, त्यांच्यासाठी या डिल्स बेस्ट आहेत. यावेळी, फ्लिपकार्टने फ्लॅश सेल्स आणि कॉम्बो ऑफर्सवरही खूप भर दिला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त बचत करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील जर नवीन वस्तू किंवा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल घाई करा. कारण पुढील काही तासांतच सेल संपणार आहे.






