Realme ने लाँच केलं जगातील सर्वात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान (फोटो सौजन्य- Realme )
आपल्याला आपला स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी सुमारे 20 ते 25 मिनिटे लागतात. आणि जर चार्जर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असेल तर आपला फोन केवळ 15 मिनिटांत चार्ज होऊ शकतो. पण आता आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमचा फोन 5 मिनिटांत चार्ज होईल, तर तुमचा विश्वास बसेल का? या गोष्टीवर विश्वास बसत नसला तरी देखील हे आता शक्य आहे. तुमचा फोन केवळ 5 मिनिटांत चार्ज होणार आहे. Realme ने लाँच केलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे हे शक्य होणार आहे.
हेदेखील वाचा- Realme C सिरीजमधील Realme C63 5G लाँच, कमी किंमतीत मिळणार अनेक फिचर्स
प्रसिध्द आणि लोकप्रिय टेक कंपनी Realme ने जगातील सर्वात फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान लाँच केलं आहे. 320W SuperSonic चार्ज तंत्रज्ञान असं त्याचं नाव आहे. कंपनीने आपल्या 828 फॅन फेस्टिव्हल दरम्यान हे नवीन तंत्रज्ञान लाँच केलं आहे. कंपनीचा दावा आहे की या फास्ट चार्ज तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनमधील 4420mAh बॅटरी फक्त 4 मिनिटे 30 सेकंदात चार्ज होईल. कंपनीने या 4 मिनिटांना मिरॅकल म्हणजेच चमत्कार असं नाव दिलं आहे. Realme ने आपल्या ग्राहकांसाठी प्रगत चार्ज तंत्रज्ञान लाँच केलं आहे.
चीनमध्ये आयोजित 828 फॅन फेस्टिव्हलमध्ये कंपनीने 320W SuperSonic चार्ज तंत्रज्ञान लाँच केलं आहे. नवीन तंत्रज्ञानाबाबत कंपनीचा दावा आहे की 320W SuperSonic तंत्रज्ञानाच्या मदतीने युजर्स त्यांचा फोन हाय स्पीडने चार्ज करू शकतील. हे 320W SuperSonic तंत्रज्ञान जगातील सर्वात जलद चार्जिंग तंत्रज्ञान असणार आहे. 320W SuperSonic तंत्रज्ञान जगातील सर्वच स्मार्टफोन युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. अनेकदा आपण घाईत घराबाहेर पडतो आणि आपला फोन चार्ज करायला विसरतो. अशा परिस्थितीत Realme चे 320W SuperSonic तंत्रज्ञान अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
हेदेखील वाचा- तुमचा फोन देत असेल ‘हे’ संकेत तर वेळीच सावध व्हा; Spyware चा धोका असण्याची शक्यता
या तंत्रज्ञानाबाबत कंपनीने म्हटलं आहे की, 320W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाने स्मार्टफोन फक्त 4 मिनिटे 30 सेकंदात चार्ज केला जाऊ शकतो. 320W चा चार्जर फक्त 1 मिनिटाच्या चार्जिंगने डिवाइस 26 टक्के चार्ज करू शकतो. इतकेच नाही तर या पॉवरफुल चार्जरच्या मदतीने यूजर फक्त 2 मिनिटात 50 टक्के पर्यंत फोन चार्ज करू शकतो. कंपनीने या 4 मिनिटांना मिरॅकल म्हणजेच चमत्कार असं नाव दिलं आहे.
जगातील सर्वात वेगवान चार्जिंग तंत्रज्ञानासह, Realme ने 4420mAh फोल्ड करण्यायोग्य बॅटरी देखील या ईव्हेंटमध्ये लाँच केली आहे. त्यातील प्रत्येक सेल 3 मिमी जाड आहे. ही जगातील पहिली क्वाड सेल स्मार्टफोन बॅटरी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. या तंत्रज्ञानामध्ये स्मार्टफोन्ससाठी अॅएडवांस कॉन्टॅक्ट फ्री इलेक्ट्रोमैग्नेटिक कनवर्जनची सविधा देखील उपलब्ध आहे. सर्किट ब्रेकडाउनसारख्या गंभीर समस्यांवेळी, हे तंत्राज्ञान उच्च व्होल्टेज बॅटरीपासून वेगळे राहते, ज्यामुळे जोखीममुक्त चार्जिंग लिंक तयार होते. हे बॅटरीचे संरक्षण करण्यासाठी व्होल्टेज फक्त 20V पर्यंत कमी करते, 320W SuperSonic चार्जिंगला अंदाजे 98% पॉवर कार्यक्षमतेसह ऑपरेट करण्यास अनुमती देते.