Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता घरबसल्या शोधा तुमच्या जवळील अधिकृत आधार केंद्र, हे नेविगेशन प्लेटफॉर्म्स करणार मदत! अशी आहे सोपी पद्धत

सरकारने नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे आता घरबसल्या जवळील अधिकृत आधार केंद्र शोधणे सोपे झाले आहे. नेविगेशन प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने काही सेकंदात लोकेशन मिळू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 18, 2026 | 08:36 AM
आता घरबसल्या शोधा तुमच्या जवळील अधिकृत आधार केंद्र, हे नेविगेशन प्लेटफॉर्म्स करणार मदत! अशी आहे सोपी पद्धत

आता घरबसल्या शोधा तुमच्या जवळील अधिकृत आधार केंद्र, हे नेविगेशन प्लेटफॉर्म्स करणार मदत! अशी आहे सोपी पद्धत

Follow Us
Follow Us:
  • सरकारने नेविगेशन प्लॅटफॉर्म्ससोबत भागीदारी करून अधिकृत आधार केंद्र शोधण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.
  • यामुळे नागरिकांना जवळील आधार केंद्राचे लोकेशन, वेळ आणि इतर माहिती सहज मिळते.
  • घरबसल्या मोबाइलवरूनच काही क्लिकमध्ये आधार केंद्र शोधता येत असल्याने वेळ आणि मेहनत दोन्ही वाचते.
जेव्हा नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करायचे असते तेव्हा सहसा अधिकृत आधार सेंटर शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागते. मात्र यामध्ये खूप वैताग येतो आणि खूप मनस्ताप देखील सहन करावा लागतो. मात्र नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन अलीकडेच सरकारने मोठ्या नेविगेशन प्लॅटफॉर्म्ससह भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्व अधिकृत माहिती नागरिकांना स्क्रीनवर दिसणार आहे. तसेच जर तुम्ही डिजिटल मॅपचा वापर करत असाल तर तुम्ही अगदी सहज अधिकृत सेंटरचा शोध घेऊ शकणार आहात. आता गुगल मॅप्स आणि mapmyindia चा वापर करून आधार सेंटर कसे शोधावे याबाबत जाणून घेऊ.

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर Samsung ची धमाकेदार ऑफर! स्मार्ट होम अप्लायन्सेसवर मिळणार कॅशबॅक आणि बंपर डिस्काऊंट

या गोष्टींची खात्री करा

आधार सेंटर शोधण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची खात्री करणे गरजेचे आहे.

  • तुमच्याकडे अँड्रॉइड किंवा आयओएस डिवाइस असले पाहिजे ज्यामध्ये ॲक्टिव्ह इंटरनेट कनेक्शन असेल.
  • तुम्ही वापरत असलेल्या फोनमध्ये सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन सर्व्हिस किंवा जीपीएस चालू असल्याची खात्री करा.
  • यामुळे ॲप तुम्ही असलेल्या ठिकाणाहून जवळपास असलेले माझा सेंटर शोधू शकेल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

MapmyIndia किंवा गुगल मॅप्सचा वापर करून तुमच्या जवळील आधार सेंटर कसे शोधावे?

  • तुम्हाला तुमच्या जवळील आधार सेंटर शोधण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करावा लागणार आहेत.
  • MapmyIndia किंवा गुगल मॅप्स ॲप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा आणि इन्स्टॉल करून.
  • ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा आणि महत्त्वाच्या परवानगी द्या.
  • सर्च बॉक्समध्ये आधार सेंटर किंवा आधार सेवा केंद्र टाईप करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर एक मॅप ओपन होईल ज्यामध्ये तुमच्या लोकेशनपासून जवळ असलेले अधिकृत आधार सेंटर दाखवले जातील.
  • तुम्हाला ज्या सेंटरची माहिती पाहिजे आहे त्या सेंटरवर टॅप करा. जसे की, त्या सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सेवा, त्या सेंटरपर्यंत पोहोचण्याचा मार्ग, सेंटर चालू असण्याचा वेळ, इत्यादी.
हि सर्व माहिती मिळाल्यानंतर तुम्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या सोयीनुसार आधार सेंटरवर जाऊ शकता आणि तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.

पावरफुल चिपसेट आणि तगडी बॅटरी… नव्या स्मार्टफोनसह या कंपनीने केली कमाल, ग्राहकांची पसंती मिळणार?

अनाधिकृत सेंटर्स कसे ओळखाल?

डिजिटल सेवांच्या वाढीमुळे, काही खाजगी दुकाने योग्य परवानगीशिवाय अधिकृत केंद्र असल्याचा दावा करू शकतात. असा दावा करणाऱ्या खाजगी दुकानांपासून सावध कसं राहावं याबाबत जाणून घेऊया.

  • अधिकृत सेंटर, ज्यांना आधार सेवा केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. अशा अधिकृत केंद्रांवर नेहमीच UIDAI चा अधिकृत लोगो आणि सेवांसाठी निश्चित दरांची यादी प्रदर्शित केली जाईल.
  • गुगल मॅक्स किंवा MapmyIndia वर असे सेंटर शोधा जिथे व्हेरिफाईडचे निशाण असेल किंवा असे सेंटर शोधा ज्यांबाबत UIDAI द्वारे अधिकृत माहिती शेअर करण्यात आली आहे.
  • अधिकृत सेंटर सरकारद्वारे ठरवण्यात आलेल्या दरांचे पालन करतात. जर एखादे सेंटर कोणत्याही सामान्य आधार अपडेटसाठी जास्तीचे पैसे मागत असेल तर ते अनाधिकृत सेंटर असण्याची शक्यता अधिक असते.
  • अशी काही छोटी दुकाने असतात जे कोणत्याही योग्य बायोमेट्रिक स्कॅन किंवा अधिकृत पावतीशिवाय आधार कार्ड अपडेट किंवा प्रिंट करण्याचा दावा करतात. अशा दुकानांपासून सावध राहा.
  • जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल शंका असेल, तर केंद्रावर जाण्यापूर्वी कृपया UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर त्या केंद्राचा पत्ता पुन्हा तपासा.

Web Title: Find nearby aadhaar centers from home government partners with navigation platforms tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 08:36 AM

Topics:  

  • aadhar
  • Google maps
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?
1

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी
2

फक्त नवीन Siri नाही… iOS 27 मध्ये मिळणार एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स! इथे वाचा संपूर्ण यादी

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
3

चिप टंचाईचा फटका! Xiaomi ने भारतात वाढवल्या या दोन टॅब्लेट्सची किंमती… ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये
4

पर्सनल ग्रूमिंग सेगमेंट boAt ची एंट्री! अनोख्या फीचर्ससह भारतात Slazer सीरीज लाँच… सुरुवातीची किंमत केवळ 799 रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.