Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Made In India Chip: सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची मोठी झेप, पहिली ‘मेड इन इंडिया चिप’ लवकरच होणार लाँच

चीनने अत्यंत कमी किमतीत डीपसीक विकसित करून आणि ते मोफत वापरासाठी उपलब्ध करून देऊन अमेरिकेला आव्हान दिले आहे. भारत देखील या दिशेने काम करत आहे, जेणेकरून एआय तंत्रज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवता येईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2025 | 10:24 AM
Made In India Chip: सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची मोठी झेप, पहिली 'मेड इन इंडिया चिप' लवकरच होणार लाँच

Made In India Chip: सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची मोठी झेप, पहिली 'मेड इन इंडिया चिप' लवकरच होणार लाँच

Follow Us
Close
Follow Us:

भारताची पहिली सेमीकंडक्टर चीप लवकरच लाँच केली जाणार असल्याची माहिती केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जगाला पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप मिळणार आहे. त्यामुळे आता सेमीकंडक्टर उत्पादन क्षेत्रात भारत एक मोठी झेप घेण्यासाठी तयार झाला आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच याबाबत घोषणा केली आहे. आतापर्यंत चीन, अमेरिका, जपान आणि व्हिएतनाम सारख्या देशांनी सेमीकंडक्टर चिप उत्पादन क्षेत्रात वर्चस्व गाजवले होते, आता भारत देखील या शर्यतीत सामील होणार आहे.

स्टायलिश आणि कूल नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर ठरतोय धोकादायक, हे आहेत तोटे! सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा सोप्या टीप्स

केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काय सांगितलं?

टाटा इलेक्ट्रॉनिक्स, पॉवरचिप सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन (PSMC) सोबत भागीदारीत, गुजरातमधील धोलेरा येथे देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब उभारले जात आहे. त्यामुळे आता येत्या काही महिन्यांतच भारतातील पहिली सेमीकंडक्टर चीप लाँच केली जाणार आहे. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे की, देशातील पहिला ‘मेड इन इंडिया’ चिपसेट या वर्षी बाजारात लाँच केली जाईल. भारताच्या तांत्रिक विकासासाठी ही एक महत्त्वाची कामगिरी असेल. सरकार या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी वेगाने काम करत आहे आणि भारताला सेमीकंडक्टर हब बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

चिप निर्मितीनंतर काय आहे भारताचं पुढचं पाऊल

अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकार आता फक्त चिप निर्मितीपुरते मर्यादित राहू इच्छित नाही, तर पुढील टप्प्यात मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग, डिझाइन आणि उपकरण निर्मितीवरही लक्ष केंद्रित केले जाईल. भारतातील सेमीकंडक्टर उत्पादनाच्या वाढीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळेल. सेमीकंडक्टर कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तथापि, त्यांनी हे देखील मान्य केले की प्रगत चिप उत्पादन सोपे नाही आणि त्यासाठी मोठे बदल करावे लागतील.

AI बाबात अश्विनी वैष्णव म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) चे महत्त्व सतत वाढत आहे आणि सरकार देखील या क्षेत्रात वेगाने काम करत आहे. भारतात AI तंत्रज्ञान मजबूत करण्यासाठी एक ठोस रणनीती आखली जात आहे, जेणेकरून भविष्यात देशाच्या तांत्रिक प्रगतीत ती महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

10 महिन्यांनंतर तयार होणार भारताचे स्वतःचे AI मॉडेल

अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच घोषणा केली की भारत स्वतःचे AI मॉडेल विकसित करत आहे, जे पुढील 10 महिन्यांत लाँच केले जाईल. या प्रदेशात भारत अमेरिका आणि चीनशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. भारत डीपसीक सारखे परवडणारे AI मॉडेल विकसित करू शकतो, ज्यामुळे लोकांना कमी किमतीत AI टूल्स वापरता येतील.

लवकरच बदलणार UPI पेमेंटची पद्धत! पैसे ट्रान्सफर करण्यासाठी टायपिंगची गरज नाही, तुमच्या आवाजाने होईल सर्व काम

AI क्षेत्रात हे देश प्रगतीच्या मार्गवर

ग्लोबल व्हायब्रन्सी रँकिंग 2023 नुसार, AI क्षेत्रात टॉप 10 असलेल्या देशांमध्ये अमेरिका, चीन, यूके, भारत, यूएई, फ्रान्स, दक्षिण कोरिया, जर्मनी, जपान आणि सिंगापूर यांचा समावेश आहे. AI बाबत अमेरिका आणि चीनमध्ये तीव्र स्पर्धा आहे. अमेरिका सध्या रिसर्च पेपर, इन्वेस्टमेंट आणि पेटंटच्या बाबतीत आघाडीवर आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या मते, अमेरिकेतील AI क्षेत्र चीनपेक्षा अधिक विकसित आणि प्रभावी आहे.

Web Title: First made in india semiconductor chip will launch soon it minister ashwini vaishnaw announced tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील
1

पुढच्या वर्षीच्या सुरूवातीलाच लाँच होऊ शकतो Apple चा स्वस्त iPhone 17e, जाणून घ्या तपशील

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
2

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया
3

काय सांगता! रेल्वेचे जनरल तिकीट आता मोबाईलवर; रांगेत उभे राहण्यापेक्षा ही सोपी पद्धत वापरा, वाचा संपूर्ण प्रक्रिया

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस
4

टाटा कम्युनिकेशन्स आणि BSNL ची हातमिळवणी, कंपनी संपूर्ण भारतात देणार E-Sim सर्व्हिस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.