स्टायलिश आणि कूल नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर ठरतोय धोकादायक, हे आहेत तोटे! सुरक्षित राहण्यासाठी फॉलो करा सोप्या टीप्स
सध्याच्या डिजीटल जगात नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर आणि मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बरेच लोक हेडफोन घालून घराबाहेर पडतात आणि त्यांचा संपूर्ण दिवस वापर करतात. नॉइस कँसलिंग हेडफोनचे अनेक फायदे आहेत. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी आणि विद्यार्थ्यांसाठी नॉइस कँसलिंग हेडफोन प्रचंड फायद्याचे ठरतात. कारण नॉइस कँसलिंग हेडफोनमुळे आपल्याला बाहेरील आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे आपण आपलं काम शांतपणे आणि लक्ष देऊन करू शकतो.
Samsung च्या या फ्लिप स्मार्टफोनवर मिळत आहे तगडा डिस्काऊंट, आता दमदार फीचर्सचा आनंद कमी किंमतीत
नॉइस कँसलिंग हेडफोनमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी देखील मदत होते. कारण गोंधळ असलेल्या ठिकाणी विद्यार्थी शांतपणे, लक्ष देऊन अभ्यास करू शकत नाहीत. अशावेळी नॉइस कँसलिंग हेडफोन त्यांची मदत करतात. तसेच ऑफीसच्या कामांसाठी देखील नॉइस कँसलिंग हेडफोन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच सर्व कारणांमुळे अनेक लोकं दिवसभर नॉइस कँसलिंग हेडफोन लावून ठेवतात. तुम्ही देखील त्यांच्यापैकी एक आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
नॉइस कॅन्सलिंग हेडफोन्स जास्त काळ वापरण्याचे अनेक तोटे आहेत. यामुळे तुम्हाला कानदुखी आणि इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नॉइस कँसलिंग हेडफोनचा वापर आपल्यासाठी कशा प्रकारे धोकादायक ठरू शकतो, याबद्दल जाणून घेऊया.
नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्समुळे आजूबाजूचा आवाज कमी होतो. नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्समुळे आजूबाजूचा नको असलेला आवाज कमी होतो. हे अॅक्टिव नॉइस कंट्रोलद्वारे केले जाते. यामुळे आवाज जास्त न वाढवता सहजपणे ऑडिओ कंटेंट ऐकता येतो, परंतु नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सचा दीर्घकालीन वापर अनेक तोटे घेऊन येतो. नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सचा सततचा वापर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
सभोवतालच्या परिस्थितीचे भान राहत नाही – नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्समुळे तुम्हाला आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही. यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही. त्यामुळे वाहतूक किंवा इतर ठिकाणी धोका वाढतो. सहसा प्रवास करताना, गाडी चालवताना नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्सचा वापर करणं टाळा.
ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम – सतत हेडफोन लावल्याने कानात अस्वस्थता येते. याशिवाय, ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. जर हेडफोनवर जास्त वेळ जास्त आवाजात काहीतरी ऐकले तर ते एखाद्या व्यक्तीच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. यासोबतच कानात संसर्ग होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे हेडफोन्सचा वापर करताना नेहमी 60:60 चा नियम फॉलो करावा.
डोकेदुखी किंवा चक्कर येणे – चालताना नॉइज कॅन्सलिंग हेडफोन वापरल्याने अनेकांना डोकेदुखी किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या येऊ शकतात. याशिवाय, दीर्घकाळ वापरल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. त्यामुळे हेडफोन्सचा वापर मर्यादित ठेवा.
iPhone पासून Vivo V50 पर्यंत, पुढील आठवड्यात लाँच होणार हे ढासू स्मार्टफोन्स! वाचा संपूर्ण यादी
कधीकधी मनोरंजन किंवा ध्यानासाठी हेडफोन वापरणे आवश्यक होते. अशा परिस्थितीत, आवाजाची पातळी सामान्य राहील याची खात्री करा. डिव्हाइसच्या 60 टक्क्यांपेक्षा जास्त आवाजात जास्त वेळ गाणी किंवा इतर गोष्टी ऐकू नका. जास्त वेळ हेडफोन वापरू नका आणि मध्येमध्ये ब्रेक घेत राहा. किमान 60 मिनिटांचा हेडफोनचा वापर करणं उत्तम आहे, पण त्यापेक्षा अधिक हेडफोनचा वापर करत असाल तर सावध राहा, यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.