
Samsung ची मोठी ऑफर! यूजर्सना फ्री मिळणार 10 हजारांचं Amazon गिफ्ट कार्ड, फक्त करावे लागणार 'हे' काम
प्रजासत्ताक दिनानिमित्त टेक कंपनी सॅमसंग इंडिया हे नवीन चॅलेंज सुरु करणार आहे. या कँपेनमध्ये सहभागी होणाऱ्या तीन लकी विजेत्यांना 10 हजार रुपयांचे अॅमेझॉन गिफ्ट कार्ड मोफत मिळणार आहे. या कँपेनमध्ये सहभागी होण्यासाठी यूजर्सना आधी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. ही सर्व प्रोसेस सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
सॅमसंगच्या या कँपेनमध्ये सहभागी होण्यासाठी यूजर्सना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये सर्वात आधी सॅमसंग हेल्थ अॅप डाउनलोड करावा लागणार आहे. या अॅपमध्ये रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रोसेस मेंशन करण्यात आली आहे. ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर यूजर्स या कँपेनमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. हे कँपेन 26 जानेवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये यूजर्सना 30 दिवसांत एकूण 2 लाख पाऊले चालावी लागणार आहेत. यूजर्स सॅमसंग हेल्थ अॅपद्वारे स्टेप काउंट्स ट्रॅक करू शकणार आहेत.
टेक कंपनी सॅमसंगने या कँपेनसाठी रजिस्ट्रेशन सुरु केले आहे. तीन विजेत्यांशिवाय इतर 1,000 लकी सहभागी झालेल्या विजेत्यांना 500 रुपयांचे अॅमेझॉन गिफ्ट कार्ड मोफत मिळणार आहे. यूजर्स सॅमसंग हेल्थ अॅपद्वारे त्यांची रँकींग डेली बेसिसवर ट्रॅक करू शकणार आहेत. फिट इंडिया मोहिमेचा उद्देश लोकांना अधिक शारीरिकदृष्ट्या सक्रिय होण्यास प्रोत्साहित करणे आहे जेणेकरून ते एक निरोगी दिनचर्या स्थापित करू शकतील. दररोज हजारो पावले चालल्याने त्यांच्या शारीरिक हालचाली सुधारतील. या कँपेनमध्ये यूजर्सना 2 लाख पाऊलांचे टार्गेट पूर्ण झाल्यानंतर लकी ड्रॉमध्ये सहभगी होण्याची संधी मिळणार आहे. चॅलेंज पूर्ण केल्यानंतर तीन लकी विजेत्यांना 10 हजार रुपयांचे अॅमेझॉन गिफ्ट कार्ड मोफत मिळणार आहे आणि 1,000 लकी सहभागी झालेल्या विजेत्यांना 500 रुपयांचे अॅमेझॉन गिफ्ट कार्ड मोफत मिळणार आहे.