iQOO 15R vs OnePlus 15R: मिड-रेंज किंमतीत कोणता स्मार्टफोन ऑफर करणार दमदार फीचर्स? वाचा संपूर्ण तुलना
iQOO 15R चा एक टिझर जारी झाला आहे, ज्यामध्ये या स्मार्टफोनची झलक पाहायला मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये चेकर्ड पॅटर्न, मेटल फ्रेम आणि ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. लीकनसार, या डिव्हाईसमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग आहे, ज्यामुळे हे डिव्हाईस धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहते. (फोटो सौजन्य – Pinterest)
एकूणच, iQOO 15R चे डिझाईन स्पोर्टी आणि रग्ड यूजर्सना लक्षात ठेऊन तयार करण्यात आले आहे. तर, OnePlus 15R चे डिझाईन जास्त क्लीन आणि प्रीमियम अनुभव देतो. या डिव्हाईसमध्ये ग्लास बॅक आणि स्लीक बॉडी पाहायला मिळत आहे, जी OnePlus ची ओळख आहे. हा स्मार्टफोन स्टाइल-फोकस्ड आहे आणि हार्ड-कोर ड्यूरेबिलिटीच्या बाबतीत हा स्मार्टफोन iQOO पेक्षा थोडा मागे आहे.
iQOO 15R मध्ये 6.59-इंच AMOLED फ्लॅट डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन आणि 144Hz चा हाई रिफ्रेश रेट दिला जाण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, हा डिस्प्ले 5,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो, ज्यामुळे ऊन्हात देखील स्क्रीन स्पष्टपणे पाहू शकता. OnePlus 15R मध्ये देखील AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
परफॉर्मंसच्याबाबतीत बोलायचं झालं तर iQOO 15R मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच हे डिव्हाईस 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज दिला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा स्मार्टफोन गेमिंग आणि हैवी मल्टी-टास्किंगसाठी पावरफुल बनातो. OnePlus 15R देखील फ्लॅगशिप-लेवल परफॉर्मेंस ऑफर करतो. मात्र हाई-परफॉर्मेंस आणि गेमिंग-सेंट्रिक फोन ही iQOO ची नेहमीच ओळख राहिली आहे.
iQOO 15R मध्ये 7,600mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे, जी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. तर OnePlus 15R मध्ये देखील पावरफुल बॅटरी आणि उत्तम चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
iQOO 15R डिव्हाईस 200MP प्राइमरी कॅमेरासह लाँच केला जाऊ शकतो, तर सेकेंडरी कॅमेरा 8MP सह लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या फ्रंटला 32MP चा सेल्फी कॅमेरा दिला आहे. रियल-वर्ल्ड फोटोग्राफीमध्ये OnePlus 15R जास्त कंसिस्टेंट रिजल्ट देऊ शकतो.
iQOO 15R स्मार्टफोन भारतात फेब्रुवारी महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. ज्याची किंंमत 45,000 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. हे डिव्हाईस Amazon आणि iQOO इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असू शकते. OnePlus 15R ची किंमत देखील मिड रेंज सेगमेंटमध्येच आहे.






