ट्रेनच्या किमतीत मिळेल फ्लाइट तिकीट! फक्त फॉलो करा 'ही' सोपी पद्धत
दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशात कामानिमित्त आपल्या घरापासून दूर राहणारे अनेकजण आता आपल्या कुटुंबाला दिवाळी सुट्टीनिमित्त भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. यासाठी अनेकजण रेल्वेचा मार्ग निवडतात, मात्र सणांदरम्यान घरी जाणाऱ्या लोकांची संख्या इतकी जास्त असते की बऱ्याचदा रेल्वेचे तिकीट मिळत नाही. मात्र तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्ही रेल्वे काय तर फ्लाइटने देखील अगदी स्वस्तात प्रवास करू शकता.
आता फ्लाइट तिकीट बुक करणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे आणि तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईल फोनवरील ॲपची आवश्यकता आहे. MakeMyTrip, Yatra, Cleartrip, EaseMyTrip आणि IRCTC Air सारख्या विविध प्रवासी ॲप्ससह, तुम्ही तुमचे बजेट, वेळ आणि प्राधान्यानुसार फ्लाइट तिकीट सहजपणे बुक करू शकता. चला तर मग याबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – Tatkal Ticket: यंदा दिवाळीला मिळेल कन्फर्म तिकीट, फक्त या ट्रिकचा वापर करा
ॲप डाउनलोड करा
यासाठी सर्वप्रथम, तुमच्या मोबाइलच्या प्ले स्टोअर (Android) किंवा App Store (iOS) वर जा आणि तुमच्या आवडीचे ट्रॅव्हल ॲप डाउनलोड करा
नोंदणी करा किंवा लॉगिन करा
ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुम्ही आधीच रजिस्टर केले नसेल तर प्रथम अकाउंट तयार करा. आधीच रजिस्टर्ड असल्यास, आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करा
फ्लाइट शोधा
ॲपमध्ये दिलेल्या ‘फ्लाइट’ पर्यायावर क्लिक करा आणि तुमचे प्रवासाचे ठिकाण आणि तारीख टाका. ‘शोध’ बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला वेगवेगळ्या फ्लाइटची लिस्ट दिसेल.
फ्लाइट निवडा
तुमचे बजेट, वेळ आणि एअरलाइननुसार फ्लाइट निवडा. ॲपवर, तुम्हाला वेगवेगळ्या एअरलाइन्सची माहिती, वेळ आणि भाडे एकाच ठिकाणी दिसेल ज्यामुळे तुलना करणे सोपे होईल.
हेदेखील वाचा – Diwali 2024: यंदाच्या दिवाळीला आई-वडिलांना गिफ्ट करा 10 हजाराहून कमी किमतीचा दमदार स्मार्टफोन
पॅसेंजर डिटेल्स टाका
फ्लाइट निवडल्यानंतर, प्रवाशांची माहिती भरा (नाव, वय, लिंग). तपशील बरोबर भरल्याची खात्री करा कारण ते तिकिटात दिसतील.
पेमेंट करा
सर्व माहिती भरल्यानंतर पेमेंट पेजवर जा. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI किंवा वॉलेट यांसारख्या विविध पेमेंट पर्यायांद्वारे पेमेंट करू शकता. अनेक ॲप्सवर डिस्काउंट ऑफरही देण्यात आल्या आहेत, ज्याचा लाभ घेता येतो.
ई-तिकीट मिळवा
पेमेंट पूर्ण झाल्यावर, तुम्हाला तुमचे ई-तिकीट ईमेल आणि ॲपद्वारे प्राप्त होईल. तुम्ही भविष्यात कधीही ॲपवरून हे तिकीट डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.
चेक-इन करा आणि प्रवासाची तयारी करा
जसजशी तुमची प्रवासाची तारीख जवळ येईल, तुम्ही ऑनलाइन चेक-इन करू शकता आणि प्रवासाच्या दिवशी तुमचे तिकीट आणि आईडी कार्ड घेऊन विमानतळावर पोहोचू शकता.
एक्सट्रा टिप्स
ॲपमध्ये सूचना चालू ठेवा जेणेकरून तुम्हाला फ्लाइट ऑफर किंवा प्रवासाची महत्त्वाची माहिती वेळेवर मिळू शकेल. तसेच ॲपमध्ये तुमच्या तिकिटाची स्टेटस चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला फ्लाइटमधील कोणत्याही बदलाची माहिती तुम्हाला त्वरित मिळू शकेल.