
Flipkart Sale 2026: आयफोन 17 प्रो खरेदी करण्याची सुवर्णसंधी! फ्रीडम सेलमध्ये मिळतंय मोठं डिस्काऊंट, ऑफर्स पाहून चकित व्हाल
फ्लिपकार्टनुसार, आयफोन 17 प्रो 1,34,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता हा आयफोन सेलमध्ये केवळ 1,26,900 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की, कोणत्याही बँक ऑफरशिवाय आयफोन 17 प्रो च्या खरेदीवर ग्राहकांना थेट 8 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. याशिवाय, एसबीआय क्रेडिट कार्ड्स आणि फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड्स वापरून केलेल्या पेमेंटवर ग्राहकांना 5,000 रुपयांचे इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. या बँक ऑफर्ससह फोनची किंमत 1,21,900 रुपये होणार आहे. इतकंच नाही तर फ्लिपकार्ट या खरेदीवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देखील देणार आहे, याची किंमत सुमारे 4 हजार रुपये असणार आहे. या सर्व ऑफर्स आणि डिस्काऊंटसह फोनच्या खरेदीवर सुमारे 17 हजार रुपयांचा फायदा मिळू शकतो. (फोटो सौजन्य – AI Created)
दुसऱ्या बँक ऑफर्सबद्दल बोलायचं झालं तर, फ्लिपकार्टने इतर बँक कार्ड यूजर्ससाठी काही खास ऑफर्सची देखील घोषणा केली आहे. या ऑफर्सअंतर्गत फोनची किंमत 1,26,900 रुपये असणार आहे. तथापि, एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड्सचा वापर करून केलेल्या पेमेंटवर 6,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सवलत मिळेल. ईएमआयद्वारे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 4 रुपयांपर्यंतचा एक्स्ट्रा बेनिफिट मिळणार आहे. कंपनीने असे देखील संकेत दिले आहेत की, सर्वात कमी किंमतीतील या ऑफर्स मर्यादित काळासाठी असू शकतात. त्यामुळे या ऑफर्स सुरु होताच ग्राहकांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित
फ्लिपकार्टने आयफोन 17 प्रो मॅक्सवर देखील अशाच ऑफर्सची घोषणा केली आहे. या आयफोन मॉडेलची लाँच किंमत 1,49,900 रुपये होती. मात्र आता सेलमध्ये हे डिव्हाईस 1,41,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना थेट 8 हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच, जर ग्राहक एसबीआय किंवा फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करत असतील तर बँक ऑफर्स आणि कॅशबॅकसह डिव्हाईसची किंमत 1,32,900 रुपये होऊ शकते.