7000mAh बॅटरी अन् आकर्षक लूक! नव्या Honor स्मार्टफोनने वेधले युजर्सचे लक्ष; किंमत पाहून व्हाल चकित
पुण्यातील आयुकाच्या शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी; विश्वात प्रथमच दुर्मीळ तारकीय प्रणालीचा शोध
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB + 256GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 2,099 युआन म्हणजेच सुमारे 25,500 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मून सिल्व्हर, सनराईज गोल्ड आणि मिडनाईट ब्लॅक रंगांच्या पर्यायांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनची प्री-बुकिंग देखील आता सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य: X)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, हॉनर प्ले 11 प्रो मध्ये 6.6 इंच का 1.5K ओएलईडी फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यासोबतच स्क्रीनची पीक ब्राइटनेस 6,500 निट्सपर्यंत आहे. फोनमध्ये 3840Hz पीडब्ल्यूएम डिमिंग सपोर्ट देखील मिळणार आहे, ज्यामुळे दिर्घकाळ वापर केल्यानंतर देखील डोळ्यांवर ताण कमी येतो.
परफॉर्मंससाठी कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6500 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज देखील देण्यात आले आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये कोणत्याही माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवण्याचा पर्याय देण्यात आला नाही. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर आधारित मॅजिकओएस 10 वर चालतो.
Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
हॉनर प्ले 11 प्रोमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या डिव्हाईसमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये मेटल फ्रेम, धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP66 रेटिंग आणि SGS 5-स्टार ड्रॉप रेजिस्टेंस सर्टिफिकेशन देखील मिळणार आहे. स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचं झालं तर, या डिव्हाईसमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, 1,000 चार्जिंग सायकल पूर्ण झाल्यानंतरही या फोनची बॅटरी तिची 80 टक्के क्षमता टिकवून ठेवू शकते.






