Tech Tips: स्मार्टफोनचा Wi-Fi सतत चालू ठेवताय? वेळीच सावध व्हा, तुमची ही सवय ठरू शकते धोकादायक
घराबाहेर पडताना जर तुमच्या स्मार्टफोनचा वायफाय तुम्ही बंद करायला विसरलात, तर तुमचा फोन एखाद्या अनोळखी आणि धोकादायक नेटवर्कला कनेक्ट होऊ शकतो. ज्यामुळे पासवर्ड, बँकिंग डिटेल्स, आणि तर महत्त्वाची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. अनेक रिसर्चमध्ये देखील असा खुलासा झाला आहे की, सतत नेटवर्क स्कॅन करणारे स्मार्टफोन खोटे नेटवर्क किंव मॅन-इन-द-मिडल सारख्या खोट्या सायबर अटॅकमध्ये अडकतात. त्यामुळे घरातून बाहेर पडताना आपल्या स्मार्टफोनचा वायफाय बंद आहे की नाही याची खात्री करणं अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आपल्या छोट्या – छोट्या सवयींमुळेच आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा टिकून राहते. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑटो-कनेक्शन फीचर घराबाहेर वायफाय ऑन ठेवणाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक आहे. या फीचरमुळे तुमचा स्मार्टफोन एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, कॅफे, सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या वायफायला तुमचा स्मार्टफोन कनेक्ट होतो. हे Wi-Fi नेटवर्क कोणत्याही एन्क्रिप्शन उलबध असतात. म्हणजेच इथे तुमचा स्मार्टफोन अगदी सहज हॅक केला जाऊ शकतो. जर तुमचा स्मार्टफोन अशा वायफाय नेटवर्कला कनेक्ट असेल तर तुमचा पासवर्ड, बँकिंग डिटेल्स, मेसेज सर्वकाही धोक्यात येऊ शकतं.
हॅकर्स सहसा लोकांना फसवण्यासाठी एअरपोर्ट फ्री वाय-फाय किंवा कॅफे गेस्ट नेटवर्क सारख्या खोट्या नेटवर्कचा वापर करतात. अशा नेटवर्कला कोणताही पासवर्ड नसतो त्यामुळे फोन अगदी लगेच या नेटवर्कला कनेक्ट होतात. जर तुमचा फोन अशा नेटवर्कला कनेक्ट झाला तर तुमची सर्व माहिती हॅकर्सकडे जाऊ शकतो आणि यामुळे हॅकर्स तुमच्या अॅक्टिव्हिटी ट्रॅक करतात आणि तुमची लॉगिन माहिती देखील चोरतात.
तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा वाढावी आणि तुमचा डेटा सुरक्षिता राहावा यासाठी तुम्हाला काही सवयी बदलणं अत्यंत आवश्यक आहे. घराबाहेर पडताना तुमच्या स्मार्टफोनचा वायफाय बंद असल्याची खात्री करा. पब्लिक वायफायवर कोणतेही व्यवहार करू नका. स्टेशन, एअरपोर्ट, कॅफे अशा ठिकाणी उपलब्ध असलेला पब्लिक वायफाय तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट करणं टाळा. तुमच्या स्मार्टफोनचा ऑटो-कनेक्ट फीचर अनोळखी नेटवर्ससाठी डिसेबल करा. स्मार्टफोनमधील जुने वायफाय नेटवर्क डिलीट करा. बँकिग संबंधित व्यवहार करण्यासाठी स्मार्टफोनधील इंटरनेट डेटा किंवा VPN चा वापर करा. वायफाय तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे.






