Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान… वाचा सविस्तर

हिवाळा सुरु होताच बाथरुममधील गीझर पुन्हा एकदा चालू केले जातात. पण अनेक महिने बंद असलेले गीझर परत एकदा चालू करण्यापूर्वी काही गोष्टी तपासणं अतिशय गरजेचं असतं. अन्यथा दुर्घटना घडू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 30, 2026 | 07:00 AM
Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान... वाचा सविस्तर

Tech Tips: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी सावधान! या चुका केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान... वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • पाणी गरम झाल्यानंतर अंघोळीला जाण्यापूर्वी गीझरचे मुख्य स्विच पूर्णपणे बंद करा
  • गरजेपेक्षा जास्त प्रेशर निर्माण झाल्यास टँकचा ब्लास्ट होऊ शकतो
  • हिवाळ्यात पहिल्यांदाच गिझर चालू करण्यापूर्वी एखाद्या टेक्नीशियनला बोलावून त्याची सर्विसिंग करणं योग्य
महाराष्ट्रात थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे आता बाथरुममधील गीझर पुन्हा एकदा सुरु करण्याची वेळ आली आहे. हिवाळ्यात लोकं बाथरुममध्ये जाताच घाईघाईत गीझर सुरु करतात. मात्र अति घाई संकटात नेई, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण दरवर्षी हिवाळ्यात गीझरचा ब्लास्ट होणं, शॉर्ट सर्किट किंवा गॅस गिझरमुळे गुदमरणं अशा घटना घडत असतात. सहसा ऊन्हाळ्यात गीझरचा वापर केला जात नाही. त्यामुळे गीझर अनेक महिने बंद असतात आणि त्यामध्ये कचरा आणि धूळ जमा होते. मात्र अनेक लोकं या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे काही दुर्घटना घडू शकतात. अशा परिस्थतीत स्वत:ची आणि तुमच्या कुटूंबाची सुरक्षा करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत… मिळणार हे फीचर्स

अंघोळ करताना गीझर चालू ठेवू नये

अनेक लोकांची सवय असते की, ते बाथरुममध्ये जाण्यापूर्वीच गीझर चालू करतात आणि अंघोळ करताना देखील गीझरचा स्विच चालूच ठेवतात. मात्र ही सवय अतिशय धोकादायक ठरू शकते. जर गीझरच्या हिटींग एलीमेंटमध्ये काही समस्या निर्माण झाली किंवा आतील वायरिंगमध्ये लीकेज झाले तर पाण्यामधून थेट करंट लागण्याची भिती असते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, पाणी गरम झाल्यानंतर अंघोळीला जाण्यापूर्वी गीझरचे मुख्य स्विच पूर्णपणे बंद करा.

घरात सकाळपासून दुपारपर्यंत सतत गीझर चालू राहतो, जेणेकरून घरातील प्रत्येकजण आपापल्या सोयीनुसार अंघोळ करू शकेल. मात्र घरात सतत गीझर चालू राहिल्याने गीझरचे थर्मोस्टेट खराब होऊ शकते. आतमध्ये गरजेपेक्षा जास्त प्रेशर निर्माण झाल्यास टँकचा ब्लास्ट होऊ शकतो. त्यामुळे नेहमी गरज असेल तेव्हाच 15 ते 20 मिनिटे गीझर चालू ठेवा आणि लगेच बंद करा.

गॅस गिझरचा वापर करताना सावध राहणं गरजेचं

हल्ली विजबिलाची बचत करण्यासाठी अनेक घरांमध्ये एलपीजीवर चालणाऱ्या गॅस गिझरचा वापर केला जातो. मात्र अशा प्रकारच्या गिझरचा वापर करताना सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. गॅस गीझर चालू केल्यानंतर तो आपली ज्योत टिकवून ठेवण्यासाठी बाथरूममधील ऑक्सिजन वेगाने खेचून घेतो आणि यावेळी कार्बन मोनोऑक्साइडसारखा विषारी वायू बाहेर सोडला जातो.

या गॅसमध्ये कोणताही वास नसतो आणि हा गॅस डोळ्यांना दिसत देखील नाही. जर तुमच्या बाथरुमचा आकार छोटा असेल आणि तिथे हवा बाहेर जाण्यासाठी खिडकी किंवा एग्जॉस्ट फॅन नसेल, तर अंघोळ करताना काही मिनिटांतच माणूस गुदमरू शकतो आणि काहीवेळा बेशुद्ध देखील पडू शकतो. त्यामुळे गॅस गिझरचा वापर करायचा असेल तर बाथरुममध्ये हवा बाहेर जाण्यासाठी खिडकी किंवा एग्जॉस्ट फॅन गरजेचा आहे किंवा बाथरुममध्ये केवळ पाण्याची पाईपलाईन घ्या. बाथरुम छोटे असेल तर गॅस गिझरचे मुख्य युनिट बाथरुमच्या बाहेर एखाद्या मोकळ्या जागेत लावण्याचा प्रयत्न करा.

Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या

पहिल्यांदा वापरण्यापूर्वी सर्विसिंग करणं योग्य

हिवाळ्यात पहिल्यांदाच गिझर चालू करण्यापूर्वी एखाद्या टेक्नीशियनला बोलावून त्याची सर्विसिंग करणं योग्य ठरू शकतं. यावेळी गीझरचा प्रेशर रिलीज वाल्व आणि ऑटो-कट फीचर तपासून घ्या. कारण पाणी एका ठरावीक तापमानावर गरम झाल्यानंतर हे फीचर गीझर आपोआप बंद करते. तसेच गिझरचा वापर करण्यासाठी हलक्या किंवा नॉर्मल स्विचचा वापर न करता हेवी लोड पेलणाऱ्या पावर प्लग आणि एमसीबीचा वापर करा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिवाळ्यात गीझर सुरू करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?

    Ans: गीझर अनेक महिने बंद असेल, तर तो सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञाकडून तपासणी आणि सर्व्हिसिंग करून घ्यावी.

  • Que: अंघोळ करताना गीझर सुरू ठेवावा का?

    Ans: नाही. पाणी गरम झाल्यानंतर अंघोळीपूर्वी गीझरचा स्विच बंद करावा. सुरक्षिततेसाठी निर्मात्याच्या सूचनांचे पालन करावे.

  • Que: गीझर सतत सुरू ठेवल्याने काय होऊ शकते?

    Ans: गीझर सतत सुरू ठेवणे टाळावे. थर्मोस्टॅट किंवा इतर सुरक्षा यंत्रणेत बिघाड झाल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो.

Web Title: Geyser safety tips for winter avoid these common mistakes to prevent accidents hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Apple Home Hub Launch: १४ तासांची बॅटरी, 5G सपोर्ट अन् ७-इंच स्क्रीन! नवीन स्मार्ट होम डिव्हाईसची दमदार एंट्री
1

Apple Home Hub Launch: १४ तासांची बॅटरी, 5G सपोर्ट अन् ७-इंच स्क्रीन! नवीन स्मार्ट होम डिव्हाईसची दमदार एंट्री

Jio Cheapest Prepaid Plan: फक्त 123 रुपयांत 28 दिवसांची मौज! जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतोय 14GB डेटा
2

Jio Cheapest Prepaid Plan: फक्त 123 रुपयांत 28 दिवसांची मौज! जिओच्या ‘या’ प्लॅनमध्ये मिळतोय 14GB डेटा

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत… मिळणार हे फीचर्स
3

Motorola चा नवा धमाका! यूजर्ससाठी आणले खास कम्युनिटी ॲप, गेमिंगपासून फोटोग्राफीपर्यंत… मिळणार हे फीचर्स

Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या
4

Apple ची मोठी घोषणा! ‘या’ फोल्डेबल iPhone यूजर्सना मिळणार नवा फोन… काय आहे प्रकरण? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.