क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर! मुकेश अंबानींकडून JIO युजर्सला गिफ्ट, काय आहे ऑफर? (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आता नुकताच ९ मार्चला भारतीय क्रिकेट टीमने न्यूझीलंडला पराभूत करून चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. जिकडे तिकडे आनंदाचे वातावरण होते. चॅम्पियन ट्रॉफी जिंकून झाली. आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते IPL २०२५ वर. यालाच लक्षात घेत मुकेश आंबानीने क्रिकेट प्रेमीला एक गिफ्ट दिला आहे. क्रिकेट प्रेमीकरिता एक नवीन आणि उत्कृष्ट ऑफर रिलायन्स जियोने लाँच केला आहे आणि या ऑफरचा लाभ करोडो युजर्सला होणार आहे. ९० दिवस फ्री सर्विस देण्यात येत आहे. चला तर बघुयात काय आहे ऑफर आणि फ्री सर्विस.
काय आहे ऑफर?
२२ मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग २०२५ (IPL) सुरु होणार आहे. यालाच लक्षात घेत रिलायंस जियोने नवीन ऑफर लाँच केला आहे. रिलायंस जिओचा हा नवीन ऑफर जुने युजर्स आणि नवीन युजर्स करिता आहे. करोडो जिओ युजर्सला कंपनी जियो हॉटस्टारचा ऍक्सेस देण्यात येत आहे. विशेष म्हणजे कंपनी फक्त एक नाही तर तीन फायदे देत आहे. पहिला – 4K क्वालिटी, दुसरा-मोबाईल आणि तिसरा- टीव्ही वर देखील जिओ हॉटस्टारचा ऍक्सेस देण्यात येत आहे.
कसं मिळणार लाभ?
तर तुम्हाला जियो २९९चा प्लान किंवा याच्या पेक्षा जास्त किमतीचा प्लॅन घ्यावा लागेल. प्लान घेतल्यानंतर ९० दिवस फ्री जियो हॉटस्टार वापरायला देण्यात येणार. फक्त जियो हॉटस्टार नाही तर ५० दिवस जियो होमची सर्व्हिस देण्यात येत आहे. ज्यात ८०० पेक्षा जास्त लाइव टीवी चैनल, ११ पेक्षा जास्त ओटीटी ऐप्स आणि अनलिमिटेड वाई-फाईचा देखील लाभ मिळेल. या सोबतच कंपनी २ जीबीचा डेली डेटा आणि जास्त किमतीच्या प्लॅन्सवर अनलिमिटेड ५जी डेटा ऑफर करणार आहे.
हा ऑफर कधी पर्यंत…
या ऑफेरची सुरवात आज म्हणजे १७ मार्च पासून सुरु झाली आहे. काही ग्राहकांनी जर आधी रिचार्जे केला असेल म्हणजे १७ मार्चच्या पहिले रिचार्ज केला असेल तर १०० रुपयांचा एड-ऑन पैक करून या ऑफरचा लाभ घेऊ शकता. हा ऑफर १७ मार्च ते ३१ मार्च पर्यंत सुरु आहे. तुम्ही या मधात कधीही रिचार्ज करून या ऑफेरचा लाभ घेऊ शकता.
जियो हॉटस्टार पैक २२ मार्च पासून लाईव्ह राहणार आणि ९० दिवस हा वालिड राहणार आहें. या ऑफर बाबत अधिक माहितीसाठी कंपनी च्या ६०००८६०००८ या नंबरवर कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता. तर वाट कसली बघताय,लवकरात लवकर जाऊन रिचार्ज करा आणि या ऑफरचा आणि क्रिकेटचा लाभ घ्या.