Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 30 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Apps: सावधान! फोनची बॅटरी झपाट्याने संपतेय? Google चे ‘हे’ 5 Apps कारणीभूत

Google Apps: आजच्या काळात स्मार्टफोन हा दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, अनेकदा फोनची बॅटरी अपेक्षेपेक्षा खूप लवकर संपते. यामागे बॅटरी खराब असणे हे एकमेव कारण नसून, काही Google अॅप्स पार्श्वभूमीत (Background) सतत चालू राहून जास्त बॅटरी वापरतात.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 30, 2026 | 11:30 AM
Google Apps: सावधान! फोनची बॅटरी झपाट्याने संपतेय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Google Apps: सावधान! फोनची बॅटरी झपाट्याने संपतेय? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • काही Google अॅप्स बॅकग्राऊंडमध्ये चालू राहून जास्त बॅटरी वापरतात.
  • फोनची बॅटरी लवकर संपण्यामागे अॅप्सची सेटिंग्सही कारणीभूत ठरू शकतात.
  • अनावश्यक बॅकग्राऊंड अॅक्टिव्हिटी बंद केल्यास बॅटरी लाइफ वाढू शकते.
  • बॅटरीचा वापर नियमित तपासून गरज नसलेली अॅप्स नियंत्रित करणे फायदेशीर ठरते.
Google Apps Draining Your Phone Battery? : आजच्या काळात स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. काम, शिक्षण किंवा मनोरंजन, प्रत्येक गोष्टीसाठी आपण फोनवरच अवलंबून असतो. पण दिवसभरात अनेकदा एकच तक्रार ऐकायला मिळते, ती म्हणजे फोनची बॅटरी खूप लवकर संपते. अनेकांना वाटतं की बॅटरी खराब झाली आहे, पण प्रत्यक्षात काही अॅप्स फोनची चार्जिंग खात असतात.

गुगल क्रोम (Google Chorme)

सर्वात आधी बोलायचं झालं तर इंटरनेट वापरण्यासाठी अनेकजण गुगल क्रोमचा(Google Chorme) वापर करताता. हे अॅप वेगवान असलं तरी त्यामध्ये एकाचवेळी अनेक टॅब सुरु ठेवतो. त्यामुळे बॅटरीवर जास्त ताण येतो. त्यातच सतत दिसणाऱ्या जाहिराती, वेबपेज रिफ्रेश होणं आणि बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेल्या प्रक्रिया यामुळे फोनचे चार्जिंग वेगाने कमी होते. तसे होऊ नये म्हणून अनावश्यक टॅब बंद ठेवा.

युटयूब (Youtube)

आवडीचे गाणे किंवा व्हिडिओ पाहायचे असेल तर, आपण युटयूबचा (Youtube) वापर केला जातो. पंरतू तासन्तास व्हिडिओ पाहिल्यास स्क्रीन, इंटरनेट आणि प्रोसेसरवर ताण येतो. शक्य असेल तेव्हा व्हिडिओची गुणवत्ता मध्यम ठेवा. त्यामुळे डेटा आणि बॅटरी दोन्हीची बचत होते.

ईमेल (G- Mail)

ईमेलसाठी वापरले जाणारे जीमेल अॅप दिसायला हलकं वाटत असलं तरी ते सतत नवीन मेल तपासत असतं. अनेक ईमेल खाती जोडलेली असतील तर ही प्रक्रिया अधिक वाढते. परिणामी फोनची बॅटरी नकळत कमी होते . ज्या खात्यांचा वापर होत नाही ती काढून टाकल्यास बॅटरीच्या बदलामध्ये फरक जाणवू शकतो.

गुगल मॅप्स (Google Map)

प्रवास करताना गुगल मॅप्स मोठी मदत करते. पण मार्गदर्शन सुरू असताना जीपीएस, मोबाईल डेटा आणि स्क्रीन सतत चालू राहतात. यामुळे बॅटरी झपाट्याने कमी होते. अनेकजण लोकेशन सेवा दिवसभर सुरू ठेवतात. ही सवय टाळली तर बॅटरी जास्त वेळ टिकू शकते.

गुगल होम (Google Home)

ज्यांच्या घरात स्मार्ट टीव्ही, स्मार्ट लाईट किंवा इतर स्मार्ट उपकरणे आहेत, त्यांच्यासाठी गुगल होम उपयुक्त अॅप आहे. मात्र हे अॅप त्या उपकरणांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याने ब्लूटूथ आणि लोकेशन सुरू असल्यास बॅटरीचा वापर वाढतो. वापर नसताना ही सुविधा बंद ठेवणे अधिक योग्य ठरते.

मित्रांसोबत ट्रिपचं बिल वाटणं झालं सोपं! Paytm ने आणलं ‘Split Bills’ फीचर, कसं काम करतं ते जाणून घ्या

फक्त अॅप्सच नाही तर काही छोट्या सवयी बदलल्यासही फोनचा चार्ज जास्त काळ टिकवता येतो. स्क्रीनची चमक आवश्यक तेवढीच ठेवा. वापरात नसलेले ब्लूटूथ( Bluetooth), वाय-फाय(Wifi) आणि लोकेशन(Location) बंद करा. क्वचित वापरल्या जाणाऱ्या अॅप्सना बॅकग्राउंडमध्ये चालण्याची परवानगी देऊ नका. तसेच फोनमधील बॅटरी (Battery) वापराचा अहवाल अधूनमधून तपासल्यास कोणते अॅप सर्वाधिक चार्ज खर्च करत आहे, हे सहज समजू शकते.

याशिवाय फोन आणि सर्व अॅप्स (App) वेळोवेळी अपडेट ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नवीन अपडेटमध्ये अनेकदा बॅटरीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी बदल केलेले असतात. त्यामुळे अपडेट टाळू नका. गरज नसताना अनेक अॅप्स एकाच वेळी उघडी ठेवण्याऐवजी ती बंद केल्यासही बॅटरीवरचा ताण कमी होतो.

युझर्ससाठी मोठी बातमी! Google Pay, PhonePe अन् Paytm वर दिसणार नाही ‘हा’ नंबर; NPCI चा नवीन आदेश

फोनची बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी महागडा स्मार्टफोन (Smart Phone) घेण्याची गरज नसते. योग्य सेटिंग्ज, मर्यादित वापर आणि काही साध्या सवयी अंगीकारल्या तर दिवसभर चार्जची चिंता कमी होऊ शकते. छोट्या बदलांमुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि फोन वापरण्याचा अनुभवही अधिक चांगला होतो.

 

Web Title: Google apps draining your phone battery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • apps
  • google
  • YouTube

संबंधित बातम्या

Instagram, Meta सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीची नोटीस; 3 ऑगस्टला प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश
1

Instagram, Meta सह सोशल मीडिया कंपन्यांना संसदीय समितीची नोटीस; 3 ऑगस्टला प्रतिनिधींना हजर राहण्याचे आदेश

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर
2

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Google Job: गुगलमध्ये नोकरी मिळवायची आहे का? मग लगेच गूगलच्या रिक्रुटरने सांगितलेल्या ‘या’ ३ टिप्स नक्की फॉलो करा
3

Google Job: गुगलमध्ये नोकरी मिळवायची आहे का? मग लगेच गूगलच्या रिक्रुटरने सांगितलेल्या ‘या’ ३ टिप्स नक्की फॉलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.