Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

गुगल लवकरच क्रोम यूजर्ससाठी एक नवीन फीचर घेऊन आहे. हे फीचर सर्कल टू सर्च फीचरप्रमाणेच असणार आहे. यामध्ये यूजर्सना टाईप न करता कंटेट शोधण्याचा अनुभव मिळणार आहे. या नवीन फीचरमुळे आता माहिती शोधण्याची प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 26, 2026 | 01:30 PM
टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय 'Select From Screen' AI फीचर... यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय 'Select From Screen' AI फीचर... यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

Follow Us
Follow Us:
  • गुगल क्रोममध्ये Gemini सोबत ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रिन’ हे नवे AI फीचर रोलआउट केले जात आहे.
  • या फीचरमुळे स्क्रीनवरील कोणताही भाग निवडून त्याबाबत थेट जेमिनीला प्रश्न विचारता येणार आहे.
  • क्रोम वर्जन 149 वापरणाऱ्या यूजर्सना हे फीचर उपलब्ध होणार असून ब्राउझर अपडेट केल्यानंतर त्याचा वापर करता येईल.
काही वर्षांपूर्वी टेक कंपनी गूगलने सर्कल टू सर्च नावाचे एक नवीन फीचर लाँच केले होते. थेट स्क्रीनवरून एखादी वस्तू शोधण्यासाठी हे फीचर डिझाईन करण्यात आले आहे. अत्यंत कमी वेळात या फीचरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सर्कल टू सर्च हे गुगलच्या सर्वात लोकप्रिय AI-पावर्ड टूल्सपैकी एक आहे. यानंतर आता कंपनी एक नवीन फीचर घेऊन येत आहे. गुगल क्रोममध्ये जेमिनीसह सिलेक्ट फ्रॉम स्क्रिन नावाचे एक नवीन फीचर येत आहे, जे सर्कल टू सर्च सारखाच अनुभव देणार आहे.

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

हे नवीन फीचर यूजर्सना स्क्रीनवरील कंटेट वेगाने सिलेक्ट करून त्याला जेमिनी प्रॉम्प्टमध्ये जोडण्याची सुविधा देतो. टाईप करून माहिती शोधण्याऐवजी यूजर्स त्यांच्या स्क्रीनचा एक भाग निवडू शकतात आणि मदतीसाठी थेट जेमिनीला पाठवू शकतात. ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूल क्रोम वर्जन 149 चा एक भाग म्हणून रोलआऊट केले जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ फीचर

क्रोममध्ये जेमिनीच्या अपडेटेड सपोर्ट पेजवर, कंपनीने नवीन ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूलबाबत माहिती शेअर केली आहे. या फीचरचा वापर करण्यासाठी यूजर्सना डेस्कटॉपवर गूगल क्रोममध्ये आस्क जेमिनीवर क्लिक करावे लागणार आहे. तर मोबाईलवर नवीन ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूल अगदी सर्कल टू सर्च फीचरप्रमाणेच काम करणार आहे. यूजर्स त्यांच्या स्क्रीनचा एक भाग निवडून त्याबाबत जेमिनीला विचारू शकतात. कंपनीचं असं म्हणणं आहे की, ‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूल विविध परिस्थितीत फायदेशीर ठरते. जसे, काही स्नीकर्सच्या जोड्या हाइलाइट टाकणे आणि रनिंग स्टाइलसाठी त्यापैकी कोणती जोडी सर्वोत्तम आहे, याबाबत विचारणे. याशिवाय, स्पष्टकरीण मिळवण्यासाठी आकृतीचा काही भाग कॅप्चर करणे, पानाच्या एखाद्या भागाची पुनर्रचना करण्यासाठी तो निवडणे किंवा तुमच्या कल्पनेला नवीन रूप देणे.

Tech Tips: पावसात गॅझेट्स सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स; नाहीतर होईल हजारोंचं नुकसान

‘सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन’ टूल वापरण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी डेस्कटॉपवर क्रोम ओपन करा.
  • ब्राऊझरच्या वरील बाजूला दिसणाऱ्या आस्क जेमिनीवर क्लिक करा.
  • आता प्लस (+) आयकॉन निवडा आणि अ‍ॅड मेन्यूवर क्लिक करा.
  • सिलेक्ट फ्रॉम स्क्रीन फीचर निवडा
  • आता ज्याबाबत माहिती विचारायची आहे, त्या ठिकाणी बॉक्स करा.
  • टेक्स्ट बॉक्स कोणताही प्रश्न आणि विनंती टाका.
  • सिलेक्शन मोडमधून बाहेर पडण्यासाठी Esc दाबा.
यूजर्स बॉक्सच्या कडा ओढून किंवा संपूर्ण बॉक्स हलवून निवडलेल्या भागाचा आकार आणि स्थान बदलू शकतात. हे नवीन फीचर क्रोम वर्जन 149 सह उपलब्ध असल्याचे दिसते. ज्या यूजर्सकडे क्रोमचे लेटेस्ट वर्जन आहे, ते या फीचरचा वापर करू शकतात. पण यासाठी त्यांना ब्राऊझर रीस्टार्ट करावे लागू शकते. तुम्ही तीन-डॉट मेनू > सेटिंग्ज > क्रोमबद्दल येथे जाऊन नवीनतम क्रोम अपडेट तपासू शकता.

Web Title: Google chrome rolls out select from screen feature with gemini for smarter ai search

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Google Chrome
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
1

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
2

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

Zoom कॉलवर सायबर हल्ल्याचा धोका; AIच्या मदतीने होऊ शकते ‘Zero-Click’ हॅकिंग, सुरक्षेसाठी आत्ताच फॉलो करा ‘या’ स्टेप्स

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
4

iQOO यूजर्सना झटका! कंपनीने वाढवल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.