ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! 'हे' लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
कंपनीने ए 6 सीरीज स्मार्टफोनच्या किंमती दुसऱ्यांदा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ओप्पो ए 6 5G स्मार्टफोनच्या सर्व व्हेरिअंटची किंमत सुमारे 2 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. स्मार्टफोनचे 4GB + 128GB व्हेरिअंट 17,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. पहिल्यांदा किंमती वाढवल्यानंतर या डिव्हाईसची किंमत 21,999 रुपये झाली होताी. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी 23,999 रुपये मोजावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – OPPO)
6GB + 128GB व्हेरिअंट 19,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. कंपनीने यापूर्वी या डिव्हाईसची किंमत 23,999 रुपयांपर्यंत वाढवली होती. मात्र आता हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 25,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच 21,999 रुपये रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेले 6GB + 256GB व्हेरिअंट आता 27,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. यापूर्वी या डिव्हाईसची किंमत 25,999 रुपयांपर्यंत वाढवली होती.
| ओप्पो ए 6 5G स्मार्टफोन व्हेरिअंट | लाँच किंमत | पहिल्यांदा वाढवलेली किंमत | दुसऱ्यांदा वाढवलेली किंमत |
|---|---|---|---|
| 4GB + 128GB | 17,999 रुपये | 21,999 रुपये | 23,999 रुपये |
| 6GB + 128GB | 19,999 रुपये | 23,999 रुपये | 25,999 रुपये |
| 6GB + 256GB | 21,999 रुपये | 25,999 रुपये | 27,999 रुपये |
कंपनीने ओप्पो ए 6 प्रो 5G स्मार्टफोनच्या किंमतीत देखील 2 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 8GB + 128GB व्हेरिअंट 21,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. पहिल्यांदा किंमत वाढवल्यानंतर या डिव्हाईसची किंमत 26,999 रुपये झाली होताी. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी 28,999 रुपये मोजावे लागणार आहेत. 8GB + 256GB व्हेरिअंट 23,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. कंपनीने यापूर्वी या डिव्हाईसची किंमत 29,999 रुपयांपर्यंत वाढवली होती. मात्र आता हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 31,999 रुपये मोजावे लागणार आहेत.
| ओप्पो ए 6 प्रो 5G स्मार्टफोन व्हेरिअंट | लाँच किंमत | पहिल्यांदा वाढवलेली किंमत | दुसऱ्यांदा वाढवलेली किंमत |
|---|---|---|---|
| 8GB + 128GB | 21,999 रुपये | 26,999 रुपये | 28,999 रुपये |
| 8GB + 256GB | 23,999 रुपये | 29,999 रुपये | 31,999 रुपये |
कंपनीने या स्मार्टफोनच्या किंमत 3 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. स्मार्टफोनचे 6GB + 128GB व्हेरिअंट 31,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. आता हे व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी 34,999 रुपये खर्च करावे लागणार आहे. 34,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेले 8GB + 128GB व्हेरिअंट आता 36,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. 8GB + 256GB व्हेरिअंट 37,999 रुपयांत लाँच केले होते. आता याची किंमत 39,999 रुपये झाली आहे.
| ओप्पो एफ 33 5G स्मार्टफोन व्हेरिअंट | लाँच किंमत | वाढवलेली किंमत |
|---|---|---|
| 6GB + 128GB | 31,999 रुपये | 34,999 रुपये |
| 8GB + 128GB | 34,999 रुपये | 36,999 रुपये |
| 8GB + 256GB | 37,999 रुपये | 39,999 रुपये |






