Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी

Google's 27th Birthday: आज सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. कारण आज सर्वांच्या लाडक्या गुगलचा वाढदिवस आहे. आज गुगलला 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. 27 वर्षांपूर्वी गुगलची सुरुवात कशी झाली होती, याबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 27, 2025 | 11:31 AM
Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी

Happy Birthday Google: 27 वर्षांचा झाला सर्वांचा लाडका गुगल, जाणून घ्या या टेक जायंटच्या सुरुवातीचे रहस्य आणि अनोख्या गोष्टी

Follow Us
Close
Follow Us:

इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठं नाव असलेल्या गुगलचा आज वाढदिवस आहे. टेक जायंट कंपनी आणि जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगल आज त्याचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज जगातील प्रत्येक व्यक्ती गुगलचा वापर करत आहे. प्रत्येक छोट्या – मोठ्या कामांसाठी गुगलचा वापर केला जात आहे. गुगलमध्ये अनेक टूल्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ऑनलाइन एडवरटाइजिंग, मेल सर्विस, स्ट्रीमिंग सर्विस आणि क्वाउड स्टोरेजसह एडवांस AI टूल्सचा देखील समावेश आहे. पण या जगातील सर्वात मोठ्या इंजिनची सुरुवात कशी झाली आणि गुगलने जगावर आपलं वर्चस्व कसं निर्माण केलं जाणून घेऊया.

Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!

कशी झाली गुगलची सुरुवात?

गुगलची स्थापना लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी केली होती. दोघांनी स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून पीएचडी केली आणि याचदरम्यान गुगलच्या स्थापनेला सुरुवात झाली. सर्वात आधी त्यांनी आपल्या सर्च इंजिनची सुरुवात केली. या कंपनीला अल्फाबेट या नावाने देखील ओळखले जाते. सर्वात आधी गुगलचे नाव बॅकरब होतं, नंतर हे नाव बदलून गुगल असं ठेवण्यात आलं. लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांनी 4 सप्टेंबर 1998 मध्ये गुगल म्हणून खाजगी कंपनी म्हणून नोंदणीकृत केली. त्यांनी गुगलचे डोमेन 15 सप्टेंबर 1997 रोजी रजिस्टर केले होते. 27 सप्टेंबर रोजी कंपनीने विक्रमी संख्येने वेब पेजेस इंडेक्स केले होते. त्यामुळे हे यश लक्षात ठेवण्यासाठी गुगलचा वाढदिवस 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. कमी काळातच गुगलने एक आघाडीचे सर्च इंजिन म्हणून आपले वर्चस्व निर्माण केले. (फोटो सौजन्य – Pinterest) 

गूगलसंबंधित काही खास गोष्टी

गुगलचे पहिले ऑफीस कॅलिफोर्नियामध्ये एका गॅरेजमध्ये होतं. आता गुगलचे ऑफीस माउंटेन व्यू कॅलिफोर्नियामध्ये स्थित आहे. गूगलचे सर्वात मोठे प्रोडक्ट मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम Android आणि वीडियो स्ट्रीमिंग YouTube आहे, याची गुगलने खरेदी केली आहे. कंपनीने 2005 मध्ये अँड्रॉईड आणि 2006 मध्ये युट्यूब खरेदी केले होते. गुगलने त्याच्या नावाशी संबंधित अनेक डोमेन नोंदणीकृत केले आहेत

या आहेत मजेदार गोष्टी

गुगलच्या ऑफीसमध्ये काम करणारे कर्मचारी स्वत:ला Googlers असं म्हणतात. तर कंपनीतील नवीन कर्मचाऱ्यांना Nooglers म्हटलं जातं. गुगल कर्मचारी त्यांचे पाळीव प्राणी देखील ऑफीसमध्ये घेऊन जाऊ शकतात. गुगलवर Do a barrel Roo टाईप केल्यास पेज 360 डिग्री फिरते. जर तुम्ही “Askew” शोधलात तर शोध पृष्ठ थोडेसे झुकते. शिवाय, जर तुम्ही “Google Gravity” टाइप केले आणि नंतर “I’m Feeling Lucky” दाबले तर Google पृष्ठ पूर्णपणे कोलॅप्स होते.

Xiaomi 17 Pro Series: टेक लव्हर्ससाठी आनंदाची बातमी, Xiaomi चे तुफानी स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! काय आहे खास?

गुगलने सादर केलं खास डूडल

वाढदिवसानिमित्त गुगलने एक खास डूडल होम पेजवर सादर केले आहे. यावेळी 27 व्या वाढदिवसानिमित्त मजेदार आणि नॉस्टैल्जिक अंदाजात डूडल सादर करण्यात आले आहे. त्यात 90 च्या दशकातील आठवणींना उजाळा देण्यासाठी गुगलचा पहिला लोगो (1998 पासून) आहे.

Web Title: Google is celebrating its 27th birthday know about the google journey how it started tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

धोक्यात आहे तुमचा iPhone! Apple ने 1.8 अब्ज युजर्सना केले अलर्ट, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा
1

धोक्यात आहे तुमचा iPhone! Apple ने 1.8 अब्ज युजर्सना केले अलर्ट, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच
2

घड्याळ नाही, स्क्रीन नाही… बोटची स्मार्ट रिंग करेल 24×7 करेल हेल्थ ट्रॅकिंग; भारतात ‘या’ किमतीत लाँच

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
3

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
4

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.