Flipkart Big Billion Days 2025: 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करा CMF Phone 2 Pro, फ्लिपकार्ट देतेय खरेदीची संधी!
सध्या सर्वत्र शॉपिंग, डिस्काऊंट आणि सेलचे वातावरण आहे. कारण फ्लिपकार्टवर बिग बिलीयन डेज सुरु झाला आहे. मोठ्या डिस्काऊंट आणि ऑफरसह तुम्हाला खरेदी करायची असेल तर फ्लिपकार्ट तुमच्यासाठी एक चांगली संधी घेऊन आला आहे. कंपनीचा हा सेल 23 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे. यंदा सेलमध्ये स्मार्टफोनवर फोकस करण्यात आला आहे. म्हणजेच इतर वस्तूंसह ग्राहकांना स्मार्टफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. महागडे आणि प्रिमियम स्मार्टफोन देखील सेलमध्ये अगदी कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. कारण या सेलमध्ये तुम्हाला असे काही स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. आता आम्ही तुम्हाला सेलमधील एका फायदेशीर डिलबद्दल सांगणार आहोत. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग बिलीयन डेज सेलमध्ये CMF Phone 2 Pro 15 हजार रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही एखादा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल, तर ही डिल तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. बजेट स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी हि डिल फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
CMF Phone 2 Pro भारतात 18,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचे 8GB + 128GB व्हेरिअंट 15,999 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. म्हणजेच ई-कॉमर्स कंपनी Big Billion Days सेलमध्ये CMF Phone 2 Pro वर 3,000 रुपयांचे डिस्काऊंट देण्यात आले आहे.
या स्मार्टफोनच्या खरेदीवर HDFC Bank क्रेडिट कार्ड आणि Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डसह पेमेंट केल्यास तुम्हाला एडिशनल 1,000 रुपयांचे डिस्काऊंट दिले जाणार आहे. तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदलून आणखी बचत करू शकता. ग्राहकांना त्यांचा जुना फोन बदलून 12,050 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तथापि, किंमत जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल.
CMF Phone 2 Pro मध्ये 6.77-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz एडॅप्टिव रिफ्रेश रेट, 3000 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट देण्यात आला आहे, इथे 1.07 बिलियन कलर्स मिळतात. फोनला MediaTek Dimensity 7300 Pro 5G चिपसेटने सुसज्ज करण्यात आले आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी CMF Phone 2 Pro मध्ये 50MP प्रायइमरी कॅमेरा, 50MP टेलीफोटो लेंस आणि 8MP अल्ट्रा-वाइड सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.