
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा (फोटो सौजन्य - ChatGPT)
मोठ्या संख्येने विद्यार्थी ज्या परीक्षांची तयारी करतात, त्या परीक्षा लक्षात घेऊन ही साधने विशेषतः तयार करण्यात आली आहेत. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी गुरुवारी सांगितले की, Google १४० हून अधिक देशांमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत Google AI सबस्क्रिप्शन देईल. कंपनीने AI अभ्यास साधनांच्या सादरीकरणासोबतच ही मोठी घोषणा केली आहे.
Fill in the blank: Search can now help with test prep for _________. A. SAT
B. ACT
C. AP
D. ENEM
E. GRE
F. JEE
G. LSAT
H. MCAT
I. NEET
J. All of the above! — Sundar Pichai (@sundarpichai) August 19, 2026
आता NEET, JEE, GRE, SAT, AP आणि MCAT यासारख्या परिक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना घरी बसून आपल्या आवश्यकतेनुसार अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी Google Search, Gemini, YouTube आणि कंपनीच्या अन्य शैक्षणिक टूल्सची मदत घेता येणार आहे. सुंदर पिचाईन यांनी आपल्या X वर पोस्ट करून याबाबत अधिक माहिती दिली आहे.
त्यांनी अत्यंत मजेशीर अंदाजात विचारले की, ‘Google Search आता कोणत्या परिक्षांची तयारी करण्यासाठी मदत करू शकते? पर्यायात SAT, ACT, AP, ENEM, GRE, JEE, LSAT, MCAT आणि NEET चा समावेश होता. याचे उत्तर – All Of The Above असं आलं, अर्थात सर्व परिक्षांची तयारी करण्यासाठी मदत मिळेल.’
गुगलने विविध देशांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर्स सादर केल्या आहेत. अमेरिकेतील पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी गुगल एआय प्रो (Google AI Pro) मोफत मिळेल. यामध्ये जेमिनी स्पार्क (Gemini Spark), वाढीव वापर मर्यादा आणि ५ टीबी स्टोरेज यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
अमेरिकेबाहेरील पात्र विद्यार्थ्यांना गुगल एआय प्लस (Google AI Plus) मोफत मिळेल. यामध्ये वाढीव वापर मर्यादा, ४०० जीबी स्टोरेज आणि गुगल एआय प्रो व यूट्यूब प्रीमियमवर विशेष सवलतींचा समावेश आहे.
भारतातील पात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना १२ महिन्यांसाठी गुगल एआय प्लस मोफत मिळेल. यामध्ये जेमिनी ओम्नी (Gemini Omni), जेमिनीवर दुप्पट वापर मर्यादा आणि ४०० जीबी स्टोरेज यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
ज्या विद्यार्थ्यांना जाहिरातमुक्त संगीत आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग हवे आहे, त्यांच्यासाठी Google AI Pro आणि यूट्यूब प्रीमियमचे एक बंडलदेखील सादर करण्यात आले आहे. यावर ७०% पर्यंत सवलत उपलब्ध आहे.