Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI Circle : आता करता येईल बँक खात्याशिवाय UPI पेमेंट; Google Pay चे नवीन पॉकेट मनी फीचर झाले लॉन्च

गुगल पे ने 'UPI Circle Pocket Money' नावाचे एक नवीन फीचर सादर केले आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे, आता तुम्हाला तुमच्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना UPI पेमेंट करण्यासाठी बँक खात्याची गरज भासणार नाही.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 09, 2026 | 04:48 PM
google pay upi circle pocket money feature launch payment without bank account 2026

google pay upi circle pocket money feature launch payment without bank account 2026

Follow Us
Follow Us:
  • खात्याशिवाय UPI क्रांती
  • संपूर्ण नियंत्रण पालकांच्या हातात
  • सुरक्षित आणि सुलभ केवायसी

Google Pay UPI Circle pocket money : डिजिटल इंडियाच्या युगात आपण सर्वजण आता पाकीट विसरलो तरी चालते, कारण मोबाईलमध्ये युपीआय (UPI) आहे. मात्र, आतापर्यंत यूपीआय पेमेंट करण्यासाठी बँक खाते असणे अनिवार्य होते. यामुळे लहान मुले, विद्यार्थी किंवा घरातले वृद्ध सदस्य ज्यांचे स्वतःचे बँक खाते नाही, त्यांना डिजिटल व्यवहारांपासून लांब राहावे लागत होते. पण आता गुगल पे (Google Pay) ने ही अडचण दूर केली आहे. गुगल पे ने ‘यूपीआय सर्कल पॉकेट मनी’ (UPI Circle) नावाचे एक क्रांतिकारी फिचर लाँच केले आहे, ज्यामुळे आता बँक खात्याशिवाय सुद्धा सुरक्षितपणे पेमेंट करणे शक्य होणार आहे.

काय आहे ‘यूपीआय सर्कल’ आणि हे कसे काम करते?

गुगल पे चे हे नवीन फिचर प्रामुख्याने दोन स्तरांवर काम करते. यामध्ये एक ‘प्राथमिक वापरकर्ता’ (Primary User) असतो आणि दुसरा ‘दुय्यम वापरकर्ता’ (Secondary User) असतो. ज्या व्यक्तीचे स्वतःचे बँक खाते आहे आणि जो दुसऱ्याला पेमेंट करण्याची परवानगी देतो, तो प्राथमिक वापरकर्ता ठरतो. तर ज्या व्यक्तीचे स्वतःचे खाते नाही पण तो प्राथमिक वापरकर्त्याच्या खात्यातून पैसे खर्च करतो, तो दुय्यम वापरकर्ता ठरतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, पालक आपले खाते मुलांच्या गुगल पे ला जोडू शकतात, जेणेकरून मुले डिजिटल ‘पॉकेट मनी’ वापरू शकतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran US Ceasefire: ‘पाकिस्तानला पुन्हा भारतात विलीन करा!’ नोबेल मागणाऱ्या शहबाज आणि मुनीर यांची ब्रिटिश पत्रकाराने मोडली खोड

पॉकेट मनीवर पालकांचा ‘वॉच’

हे फिचर लाँच करताना सुरक्षिततेचा विचार प्राधान्याने करण्यात आला आहे. मुलांच्या हातात डिजिटल पैसे देताना पालकांना भीती वाटते की ते जास्त पैसे खर्च करतील का? पण यूपीआय सर्कलमध्ये प्राथमिक वापरकर्त्याकडे पूर्ण नियंत्रण असते. तुम्ही तुमच्या मुलांसाठी किंवा मित्रांसाठी मासिक १५,००० रुपयांपर्यंतची मर्यादा (Limit) सेट करू शकता. इतकेच नाही तर, जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठेतरी पेमेंट करेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या फोनवर एक नोटिफिकेशन येईल. तुम्ही ते ‘Approve’ केल्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही. यामुळे पैशांचा अपव्यय टाळता येईल आणि सुरक्षितताही राखली जाईल.

पाच जणांना जोडा आणि टेन्शनमुक्त व्हा!

गुगल पे च्या या सुविधेअंतर्गत तुम्ही तुमच्या एका खात्याशी कमाल ५ दुय्यम वापरकर्ते जोडू शकता. यासाठी तुम्हाला गुगल पे ॲपमधील ‘UPI Circle’ पर्यायावर जावे लागेल. ज्याला जोडायचे आहे त्याचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह असणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार (KYC Directions, 2016) दुय्यम वापरकर्त्याची ओळख पडताळणी करणे बंधनकारक आहे. यासाठी त्यांचे आधार कार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्र क्रमांक द्यावा लागेल. यामुळे प्रत्येक व्यवहाराचा मागोवा (Tracking) ठेवणे सोपे होईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Geography: ‘दोन पर्वतरांगा, दोन वाळवंटे अन् दोन समुद्र’, इराणची सर्वात धोकादायक ‘शस्त्रे’; महासत्ता का थरथरते ‘या’ शक्तीसमोर?

कोणासाठी आहे हे फिचर सर्वात फायदेशीर?

हे फिचर अशा कुटुंबांसाठी वरदान आहे जिथे मुले शिक्षणासाठी घराबाहेर राहतात किंवा वृद्ध आई-वडील ज्यांना डिजिटल पेमेंट करणे कठीण जाते. आता पालकांना मुलांना दरवेळी रोख रक्कम देण्याची गरज नाही. मुले त्यांच्या मोबाईलवरून क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देऊ शकतात, जे पालकांच्या खात्यातून कापले जातील. हे केवळ सोयीचे नाही तर आजच्या काळाची गरज देखील आहे. गुगल पे च्या या पावलामुळे भारतात डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बँक खाते नसलेली व्यक्ती गुगल पे वापरू शकते का?

    Ans: होय, गुगल पे च्या नवीन 'यूपीआय सर्कल' फिचरद्वारे बँक खाते नसलेली व्यक्ती प्राथमिक वापरकर्त्याच्या खात्यातून पेमेंट करू शकते.

  • Que: यूपीआय सर्कलमध्ये पेमेंटची मर्यादा किती आहे?

    Ans: प्राथमिक वापरकर्ता दुय्यम वापरकर्त्यासाठी दरमहा कमाल १५,००० रुपयांपर्यंतची मर्यादा सेट करू शकतो.

  • Que: एका खात्यावर किती जणांना जोडता येते?

    Ans: तुम्ही तुमच्या एका मुख्य बँक खात्याशी कमाल ५ दुय्यम वापरकर्ते (कुटुंब किंवा मित्र) जोडू शकता.

Web Title: Google pay upi circle pocket money feature launch payment without bank account 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • google pay
  • Tech News
  • UPI

संबंधित बातम्या

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा
1

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या
2

Bitchat: इंटरनेट बंद तरीही मेसेज सुरू! CJP आंदोलनात विद्यार्थ्यांनी वापरले कोणते तंत्रज्ञान? जाणून घ्या

WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो ‘हा’ पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?
3

WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो ‘हा’ पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा
4

धक्कादायक! मानवाशिवाय AI ने अब्ज डॉलरच्या कंपनी सिस्टीमवर केला सायबर हल्ला; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.