"इराणच्या शस्त्रसंधीसाठी शहबाज आणि मुनीर यांना नोबेल पारितोषिक द्या," अशी पाकिस्तानींनी मागणी केली, तर एका परदेशी पत्रकाराने उत्तर दिले, "जाऊन भारतात भेटा." ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Pakistan Nobel Peace Prize demand 2026 : जागतिक राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, पण सध्या पाकिस्तान (Pakistan) ज्या कारणाने चर्चेत आहे ते ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. इराण आणि अमेरिका यांच्यातील भीषण (US-Israel Iran War) युद्ध टाळण्यात आपणच सर्वात मोठी भूमिका बजावली आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे. इतकेच नाही तर, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांना त्यांच्या या ‘महान’ कार्यासाठी चक्क ‘नोबेल शांतता पुरस्कार’ मिळावा, अशी मागणी पाकिस्तानी जनता आणि तिथली माध्यमे लावून धरत आहेत. मात्र, या मागणीमुळे पाकिस्तानला कौतुकाऐवजी जगभरातून टोमणे आणि टीकेचा सामना करावा लागत आहे.
या वादाची ठिणगी पडली ती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे. ट्रम्प यांनी इराणशी सुरू असलेल्या संघर्षात शस्त्रसंधी (Ceasefire) जाहीर करताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल आसिम मुनीर यांचा नावानिशी उल्लेख केला. ट्रम्प यांनी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केल्यावर पाकिस्तानी सोशल मीडियावर एकच जल्लोष सुरू झाला. “आम्ही जगाला विनाशापासून वाचवले,” अशा थाटात पाकिस्तानी नेटकऱ्यांनी नोबेल पुरस्काराची मोहीमच सुरू केली. पाकिस्तानी माध्यमांच्या मते, युरोपचे राजनैतिक महत्त्व आता संपले असून पाकिस्तान आता जगाचा नवा ‘पीस मेकर’ बनला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Canada Visa : ‘देश सोडा किंवा पुरावा द्या!’ कॅनडा सरकारची भारतीय विद्यार्थ्यांना शेवटची नोटीस; 21 दिवसांत होणार निकाल
पाकिस्तानच्या या नोबेल प्रेमावर स्कॉटलंडचे माजी मंत्री हमजा युसूफ यांनी स्तुतीसुमने उधळली होती. मात्र, या स्तुतीला ब्रिटिश पत्रकार टॉमी रॉबिन्सन यांनी अत्यंत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले. रॉबिन्सन यांनी हमजा युसूफ यांच्या ट्विटला उत्तर देताना थेट पाकिस्तानच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी लिहिले, “पाकिस्तानला पुन्हा भारत बनवा (Make Pakistan India again). ज्या देशाने ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्याला वर्षानुवर्षे आश्रय दिला आणि लपवून ठेवले, त्या देशाच्या शांततेच्या गप्पांवर माझा काडीचाही विश्वास नाही.” रॉबिन्सन यांच्या या विधानामुळे सोशल मीडियावर दोन गट पडले असून पाकिस्तानच्या दहशतवादी इतिहासाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
Make Pakistan India again. I don’t trust a country that hid and gave refuge to Osama Bin Laden. https://t.co/ztQWMusQVU — Tommy Robinson 🇬🇧 (@TRobinsonNewEra) April 8, 2026
credit – social media and Twitter
एकीकडे खिल्ली उडवली जात असताना, दुसरीकडे पाकिस्तान सरकारने या यशाचे भांडवल करण्यासाठी मोठी तयारी केली आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराणच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळांना शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबादमध्ये आमंत्रित केले आहे. या बैठकीत इराण-अमेरिका वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी निर्णायक वाटाघाटी होणार असल्याचे सांगितले जात आहे. “आम्ही दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे आभारी आहोत आणि शांततेसाठी आमचा प्रयत्न सुरूच राहील,” असे विधान शरीफ यांनी केले आहे.
امروز بعدازظهر، گفتوگویی گرم و پربار با رئیسجمهور ایران، آقای دکتر مسعود پزشکیان، داشتم.
در این گفتوگو، مراتب قدردانی عمیق خود را از درایت و دوراندیشی رهبری ایران در پذیرش پیشنهاد پاکستان برای میزبانی گفتوگوهای صلح در اسلامآباد در اواخر این هفته، با هدف تلاش مشترک برای… https://t.co/Izt1abQsXP — Shehbaz Sharif (@CMShehbaz) April 8, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kalpakkam PFBR : भारताचे अणु-तांडव पाहून पाकिस्तानचा थरकाप!’दरवर्षी 300 बॉम्ब अन् 8000 किमी पल्ला’, झहीर काझमींचा ‘असा’ भयावह दावा
पाकिस्तानी नेत्यांच्या नोबेल पुरस्काराच्या मागणीवरून भारतीय आणि परदेशी युजर्सनी मिम्सचा पाऊस पाडला आहे. “ज्या देशाला स्वतःची अर्थव्यवस्था सांभाळता येत नाही, ते जगाची शांतता राखण्याचे स्वप्न पाहत आहेत,” अशा कमेंट्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी असाही टोला लगावला की, ज्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थीचा आव आणल्याबद्दल नोबेल देण्याच्या गप्पा झाल्या होत्या, तसेच काहीसे आता मुनीर आणि शरीफ यांच्याबाबत घडत आहे. एकूणच, इराण-अमेरिका शस्त्रसंधीच्या निमित्ताने पाकिस्तानला जागतिक प्रसिद्धी तर मिळाली आहे, पण ती सन्मानापेक्षा उपरोधानेच जास्त व्यापलेली दिसत आहे.
Ans: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली, असा दावा करत पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांच्यासाठी ही मागणी केली जात आहे.
Ans: रॉबिन्सन यांनी म्हटले की ज्या देशाने लादेनला आश्रय दिला त्यावर विश्वास ठेवता येणार नाही आणि पाकिस्तानला पुन्हा भारतात विलीन केले पाहिजे.
Ans: पाकिस्तानने इराण आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळांना शांतता करारावर चर्चा करण्यासाठी इस्लामाबादमध्ये आमंत्रित केले आहे.






