ChatGPT व्हायरल होत असतानाच Google ने जारी केला Gemini 2.5 Pro! कठीण कामांसाठी करणार मदत, अशा प्रकारे करा वापर
सोशल मीडियाचं युजर्सचं Ghibli वेड कमी होतच नाही. सोशल मीडियावर Ghibli ईमेजचे रोज नवीन फोटो पाहायला मिळत आहेत. कधी राजकारणी नेते त्यांचे Ghibli फोटो अपलोड करत आहेत, तर सेलेब्रिटी त्यांच्या फॅन्ससाठी Ghibli फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या Ghibli फोटोंमुळे चॅटजीपीटीची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. चॅटजीटीची लोकप्रियता वाढत असतानाच आता टेक कंपनी गुगलने त्यांच्या AI चॅटबोट Gemini चं नवीन वर्जन लाँच केलं आहे. कठीण काम करण्यासाठी कंपनीने हे नवीन वर्जन लाँच केलं आहे.
गुगलने Gemini 2.5 Pro रोल आऊट केलं आहे. त्यामुळे आता वेगाने व्हायरल होत असलेल्या चॅटजीपीटीला कठीण टक्कर देण्यासाठी गुगल तयार झाला आहे. गुगलने रोल आऊट केलेलं नवीन मॉडेल अद्याप प्रायोगिक टप्प्यात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युजर्सना Gemini 2.5 Pro वापरण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही, कारण हे नवीन वर्जन सर्व युजर्ससाठी मोफत रोल आऊट करण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही वापरत असलेलं Gemini मॉडेल अपडेट करून Gemini 2.5 Pro निवडण्यासाठी तुम्हाला ड्रॉप डाउन मेनूचा वापर करावा लागणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, ही सुविधा लवकरच iOS आणि Android मोबाइल अॅप्सवर उपलब्ध होऊ शकते. गुगलने या आठवड्याच्या सुरुवातीला Gemini 2.5 Pro ची घोषणा केली. चॅटजीपीटी सध्या सर्वत्र चर्चेत आहे कारण नवीन इमेज जनरेशन फीचर सर्वत्र लोकप्रिय होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी देखील सोशल मीडियावर याचा वापर करत आहेत. यामुळे गुगलच्या जेमिनिकडे दुर्लक्ष होत आहे का, असा शंका देखील व्यक्त केली जात होती. अशातच कंपनीने जेमिनीचं नवीन वर्जन लाँच केलं आहे.
Google Gemini 2.5 Pro रीजनिंग मॉडल आहे. हे OpenAI च्या o3 Mini किंवा DeepSeek R1 वर काम करेल. मागील ट्रेंड किंवा GPT प्रमाणे, हे मॉडेल अचूकतेवर काम करेल. जर कोणताही रीजनिंग त्याच्या मदतीने सोडवला गेला तर तो कमी यांत्रिक आणि अधिक मानवीय वाटेल. अशा वैशिष्ट्यांना त्यात जागा देण्यात आली आहे. अनेकदा असं होतं की AI च्या मदतीने कोणतंही कामं केलं तर आपल्याला लगेचंच समजंत, कारण AI च्या भाषेवरून हे ओळखलं जातं. पण आता असं एक फीचर देण्यात आलं आहे ज्याच्या मदतीने ही संपूर्ण भाषा मानवी वाटणार आहे. म्हणजेच आता AI तुम्हाला तुमच्या भाषेत माहिती देणार आहे.
गुगलचा दावा आहे की Gemini 2.5 Pro जटिल तर्क आणि कोडिंग कार्ये पूर्ण करण्यास देखील सक्षम आहे. नवीनतम भाषा मॉडेलमध्ये, कॉम कोडिंग, गणित आणि विज्ञानाशी संबंधित कामे देखील पूर्ण केली जाऊ शकतात. आतापर्यंत, गुगलच्या AI सपोर्टमध्ये कोडिंग क्षमता कमी दिसून येत होती. यामुळेच कंपनीने आता ही कोडींग क्षमता आणण्याचा निर्णय घेतला आहे.
गुगलने Gemini 2.5 Pro चा एक नवीन व्हिडिओ देखील जारी केला आहे. हे कसे कार्य करेल हे एका ओळीच्या मदतीने स्पष्ट केले आहे. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की तुम्हाला फक्त एक ओळ लिहायची आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखादा खेळ हवा असेल तर तुम्हाला फक्त लिहावे लागेल – एक नवीन क्रिकेट खेळ तयार करा. हे लिहिताच, तुम्ही खेळ तयार कराल.