Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Selfie video for Google Account: गूगल आपल्या यूजर्ससाठी अकाऊंटची सुरक्षा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहे. आता सेल्फी व्हिडिओच्या मदतीने गूगल अकाऊंटमध्ये लॉग-इन आणि अकाऊंट रिकव्हर करण्याचा पर्याय उपलब्ध होणार असून, त्यामुळे पासवर्ड विसरल्यासही अकाऊंटचा ॲक्सेस मिळवणे अधिक सोपे होईल.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 27, 2026 | 07:00 AM
पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

पासवर्ड विसरलात? सेल्फी व्हिडिओनेही लॉग-इन करता येणार Google Account, नवीन फीचर यूजर्ससाठी ठरणार फायदेशीर

Follow Us
Follow Us:
  • Google ने सेल्फी व्हिडिओद्वारे अकाऊंट लॉग-इन आणि रिकव्हरीसाठी नवे फीचर सादर केले आहे.
  • पासवर्ड विसरल्यास सेल्फी व्हिडिओ व्हेरिफिकेशनद्वारे गूगल अकाऊंट पुन्हा ॲक्सेस करता येणार आहे.
  • गूगलने हे फीचर सुरक्षित एन्क्रिप्शन आणि यूजरच्या संमतीसह उपलब्ध केले असून सध्या ते टप्प्याटप्प्याने रोलआउट होत आहे.
गूगलने त्यांच्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर जारी केले आहे. कंपनी एक नवीन साइन-इन आणि रिकवरी ऑप्शन घेऊन आली आहे, ज्यामध्ये सेल्फी व्हिडीओद्वारे तुमची ओळख व्हेरिफाय करण्याचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच आता तुम्ही सेल्फी व्हिडीओच्या मदतीने तुमच्या गूगल अकाऊंटमध्ये लॉगिन करू शकणार आहात.

जर तुम्ही तुमच्या गूगल अकाऊंटचा पासवर्ड विसरला असाल आणि इतर पद्धतींनी तुम्ही अकाऊंटमध्ये लॉगिन करू शकत नसाल तर नवीन फीचर तुमच्या फायद्याचे ठरणार आहे. आता तुम्ही सेल्फी व्हिडीओद्वारे अकाऊंटचा ॲक्सेस मिळवू शकणार आहात. याशिवाय गूगलचे इतर फीचर आणि दुसऱ्या सर्विस ॲक्सेस करण्यासाठी देखील सेल्फी व्हिडीओ पर्याय वापरला जाऊ शकतो. कंपनीने अद्याप प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक डिव्हाईससाठी हे फीचर रोलआऊट केले नाही.

Facebook चे नवे Verified फीचर! आता समजणार समोरचा खरा माणूस की AI? कसं करणार काम? जाणून घ्या

ॲडिशनल रिकवरी ऑप्शन ठरणार नवीन फीचर

गूगलने म्हटलं आहे की, हे फीचर पासकी आणि रिकवरी कॉन्टॅक्ट्ससोबतच एक ॲडिशनल रिकवरी ऑप्शन म्हणून काम करणार आहे. हे सेटअप करण्यासाठी तुम्हाला गूगल अकाऊंटमध्ये साइन-इन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही साइन केलं नसेल तर तुम्ही सेल्फी व्हिडीओ जोडू शकणार नाहीत. (फोटो सौजन्य – AI Created)

सेल्फी व्हिडीओ जोडण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

कंपनीने अद्याप हे फीचर सर्व यूजर्ससाठी रोलआऊट केलं नाही. यासाठी सर्वात आधी तुम्हाला पात्रता तपासावी लागणार आहे. तुम्ही ब्राऊझरमध्ये g.co/signin-selfie टाईप करून पाहू शकता की, तुमच्या डिव्हाईससाठी नवीन फीचर रोलआऊट झाले आहे की नाही. जर तुमच्या डिव्हाईससाठी हे फीचर उपलब्ध झाले असेल तर तुम्हाला चेहऱ्याचा शॉर्ट व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिसणार आहे.

या फीचरमध्ये इनरोल करण्यासाठी सेल्फी व्हिडीओ सेटअप पेज ओपन करा आणि गूगलच्या नियमांचे पालन करा. या संपूर्ण प्रोसेसदरम्यान, डिव्हाईसच्या कॅमेऱ्यात पाहात राहा आणि नियमांचे पालन करा आणि डोक्याची हालचाल करा. यादरम्यान कॅमेरा तुमच्या चेहऱ्याला वेगवेगळ्या अँगलने कॅप्चर करेल. यानंतर तुमचा सेल्फी व्हिडीओ गूगल अकाऊंटमध्ये सुरक्षित पद्धतीने सेव्ह केला जाईल.

रेकॉर्ड व्हिडीओ कसा ठरणार फायदेशीर?

भविष्यात जर तुम्ही तुमच्या डिव्हाईसवरून गूगल अकाऊंट ॲक्सेस करू शकत नसाल, तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा तुम्ही पासवर्ड विसरला असाल तर अशावेळी गूगल अकाऊंच्या रिकव्हरीसाठी तुम्हाला सेल्फी व्हेरिफिकेशन पर्याय मिळणार आहे. तेव्हा तुम्हाला नवीन व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सांगितलं जाईल. त्यानंतर गूगल त्या व्हिडीओची आधी सेव्ह करण्यात आलेल्या व्हिडीओसोबत तुलना करेल आणि ओळख पटल्यानंतर तुम्हाला तुमच्या गूगल अकाऊंटचा ॲक्सेस मिळणार आहे.

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

प्रायव्हसीची काळजी घेतली जाईल

गूगलने सांगितलं आहे की, हा व्हिडीओ यूजर्सनी दिलेल्या परवानगीनंतर स्टोअर केला जाणार आहे. व्हिडीओ संग्रहित असताना पूर्णपणे एनक्रिप्टेड असेल आणि कधीही हटवला जाऊ शकतो. गुगलने असेही म्हटले आहे की, स्पूफिंग रोखण्यासाठी अनेक सुरक्षा तपासण्या लागू केल्या आहेत.

Web Title: Google selfie video sign in feature google account recovery new security update tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
1

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
2

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
3

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
4

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.