Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश

GTA 6 हा सध्या जगातील सर्वाधिक चर्चेत असलेला गेम ठरला आहे. मात्र या गेमची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो गेमर्ससाठी एक धक्कादायक बाब समोर आली असून प्रत्येकाला GTA 6 चा अनुभव घेता येईलच असे नाही. जुन्या कंसोल किंवा पीसीचा वापर करणाऱ्या लाखो प्लेअर्सना सुरुवातीला GTA 6 खेळण्याचा अनुभव मिळणार नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 09, 2026 | 09:06 AM
GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! 'या' कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश

GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! 'या' कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश

Follow Us
Follow Us:
  • GTA 6 हा गेम सुरुवातीला फक्त कन्सोलसाठी उपलब्ध होण्याची शक्यता असून PC गेमर्सना प्रतीक्षा करावी लागू शकते.
  • गेमची उच्च सिस्टम आवश्यकता आणि महागडे हार्डवेअर अनेक गेमर्ससाठी अडथळा ठरू शकतात.
  • लॉन्चनंतरही सर्व डिव्हाइसेसवर GTA 6 सहज चालेलच याची खात्री नसल्याने काहींचे गेम खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते.
जगभरातील गेमर्स गेल्या अनेक वर्षांपासून GTA 6 ची प्रतिक्षा करत होते. आता रॉकस्टार गेम्सने अधिकृतपणे घोषणा केली आहे की, हा बहुप्रतीक्षित गेम 19 नोव्हेंबर 2026 रोजी रिलीज केला जाणार आहे. GTA 5 रिलीज केल्यानंतर सुमारे 13 वर्षांनंतर या लोकप्रिय गेमिंग सिरीजमधील नवीन गेम रिलीज केला जाणार आहे.

जुना Smartphone विकताय? सर्वात आधी आवर्जून करा ही 4 कामं; नाहीतर वैयक्तिक डेटा होऊ शकतो लीक

गेमिंगच्या रिलीजबाबत गेमर्समध्ये वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. मात्र आता गेमर्ससाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही गेमर्स रिलीजनंतर GTA 6 खेळू शकणार नाहीत. कारण रॉकस्टार गेम्स सध्या या गेमला केवळ नवीन जनरेशनच्या गेमिंग कंसोल्सवर रिलीज करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जुन्या कंसोल किंवा पीसीचा वापर करणाऱ्या लाखो प्लेअर्सना सुरुवातीला GTA 6 खेळण्याचा अनुभव मिळणार नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest)

पीसी गेमर्सना GTA 6 खेळण्यासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता

GTA 6 रिलीजवेळी केवळ प्लेस्टेशन 5 आणि एक्सबॉक्स सीरीज एक्स/एसवर उपलब्ध असणार आहे. तसेच रॉकस्टार गेम्सने अद्याप GTA 6 च्या पीसी वर्जनची घोषणा केली नाही. यापूर्वी देखील कंपनीने त्यांचे मोठे गेम्स आधी कंसोलवर रिलीज केले आहेत आणि काही काळानंतर गेम्सचे पीसी वर्जन रिलीज केले जाते.

GTA 5 आणि रेड डेड रिडेम्प्शन 2 बाबत देखील असाच निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता ज्या गेमर्सकडे केवळ पीसी आहे, त्यांना GTA 6 खेळण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. खरं तर पीसी गेमर्सची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे रिलीजच्या दिवशी करोडो गेमर्स GTA 6 खेळण्याचा अनुभव घेऊ शकणार नाहीत.

या देशात नाही होणार गेमची विक्री

केवळ पीसी यूजर्सच नाही तर काही देशांमध्ये गेमर्सना GTA 6 खेळताना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याचे कारण म्हणजे स्थानिक नियम आणि सरकारी निर्बंध. उदारहणार्थ, रशियामध्ये GTA 6 च्या अधिकृत विक्रीबाबत अजूनही अस्पष्ट परिस्थिती आहे. रॉकस्टार गेम्सची मूळ कंपनी टेक-टू इंटरॲक्टिव्ह सध्या रशियामध्ये आपले गेम्स विकत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रशियातील अधिकारी देखील या गेम्सवर काही प्रतिबंध लादण्याचा विचार करत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे, रशियामधील गेमर्स लाँचिंगवेळी GTA 6 खरेदी करू शकणार नाहीत. त्यानंतर गेमची विक्री सुरु झाली तरी देखील, या ठिकाणाचे स्थानिक नियम आणि सरकारी निर्बंधांमुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये वयाची पडताळणी अनिवार्य

रॉकस्टार गेम्सने अद्याप GTA 6 च्या ऑनलाईन मोडबाबत संपूर्ण माहिती दिली नाही. मात्र आता असं मानलं जात आहे की, कंपनी GTA ऑनलाईनप्रमाणेच गेमर्सना एक मोठा मल्टीप्लेयर अनुभव देण्याचा विचार करत आहे. मात्र यावेळी जारी केले जाणारे नवीन नियम यूजर्ससाठी काही समस्या निर्माण करू शकतात.

अरे देवा! Aadhaar Card हरवलं? आधार नंबर सुद्धा आठवत नाही? काळजी करू नका… आत्ताच फॉलो करा ही प्रोसेस

ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ऑनलाईन गेम्स आणि सर्विससाठी वयाची पडताळणी अनिवार्य केली जात आहे. याचा अर्थ असा आहे की, गेमर्सना त्यांचे वय सिद्ध करावे लागेल आणि त्यानंतरच त्यांना गेम खेळता येईल. जर एखादा खेळाडू पूर्ण व्हेरिफिकेशन पूर्ण करत नसेल किंवा त्यांचे वय निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असेल, तर त्याला काही ऑनलाइन फीचर्सचा वापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

Web Title: Gta 6 dream may remain unfulfilled for many gamers here is the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • online games
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला
1

AI Shopping Tips: वीकेंड शॉपिंग आता होणार Easy! AI सांगेल काय घ्यायचं, कुठे आणि कितीला

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!
2

Flipkart Big Billion Days Sale Date Leaked: फ्लिपकार्टचा Big Billion Days सेल कधीपासून? तारीख झाली लीक!

गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium
3

गणेशोत्सवाची प्रत्येक आठवण होणार खास! Airtel ची खास ऑफर, ग्राहकांना मोफत मिळणार Adobe Express Premium

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना
4

MSD Launches New Technology Centre: हैदराबादमध्ये MSD चं मोठं पाऊल – नवीन टेक सेंटर सुरू, हजारो नोकऱ्यांना चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.