Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hackers नेही घेतला उन्हाळ्याचा फायदा! Free AC च्या नावाखाली तुम्हालाही आलाय मेसेज? Link वर क्लिक करताच रिकामं होईल अकाऊंट

Scam Message: आता सरकारच्या फॅक्ट चेक टिमने त्यांच्या एक्स अकाऊंटवर चेतावणी जारी केली असून स्कॅम आणि खोट्या मेसेजवर कोणीही विश्वास ठेऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 21, 2025 | 11:59 AM
Hackers नेही घेतला उन्हाळ्याचा फायदा! Free AC च्या नावाखाली तुम्हालाही आलाय मेसेज? Link वर क्लिक करताच रिकामं होईल अकाऊंट

Hackers नेही घेतला उन्हाळ्याचा फायदा! Free AC च्या नावाखाली तुम्हालाही आलाय मेसेज? Link वर क्लिक करताच रिकामं होईल अकाऊंट

Follow Us
Close
Follow Us:

स्कॅमर्स लोकांना फसवण्याची एक संधी सोडत नाहीत. स्कॅमर्स लोकांनी फसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून कशा पद्धतीने पैसे उकळले जाऊ शकतात, यासाठी नवीन मार्ग शोधत असतात. यासाठी कधी फ्रॉड कॉल केले जातात तर कधी खोटे मेसेज केले जातात. स्कॅमर्सनी केलेल्या मेसेजमध्ये कधी आकर्षक ऑफर असतात तर कधी फ्री गिफ्टची लालच दिली जाते. याच सर्व गोष्टींमुळे लोकं स्कॅमर्सच्या मेसेज आणि कॉल्सना बळी पडतात.

BSNL घेऊन आलाय जबरदस्त रिचार्ज प्लॅन! केवळ 1,198 रुपयांच्या किंमतीत मिळणार वर्षभराचा प्रीपेड प्लॅन, हे आहेत फायदे

आता देखील सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये लोकांना फ्री एसीची लालच देऊन लिंक क्लिक करण्यास सांगितंल आहे. हे एसी सरकारकडून दिले जात आहेत, असा दावा देखील या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. हा मेसेज एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारत सरकार ‘पीएम मोदी एसी योजना 2025’ अंतर्गत 1.5 कोटी 5-स्टार एअर कंडिशनर मोफत वाटत आहे. ही योजना मे 2025 पासून लागू केली जाईल असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे. मेसेजमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, ऊर्जा मंत्रालयाने आधीच 1.5 कोटी एसी तयार केले आहेत. लोकांना एका विशिष्ट खात्याचे अनुसरण करण्यास आणि हा संदेश इतरांपर्यंत पोहोचविण्यास सांगितले होते.

A post being widely shared on social media claims that under a new scheme ‘PM Modi AC Yojana 2025’, the Government will provide free 5-star air conditioners and 1.5 crore ACs have already been prepared. #PIBFactCheck

❌This claim is #FAKE

❌No such scheme providing free 5-… pic.twitter.com/6MMJZdI2tV

— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 18, 2025

या व्हायरल होत असलेल्या मेसेजचा आता सरकारच्या फॅक्ट चेक टीमने पर्दापाश केला आहे. तथापि, सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सांगण्यात आलं आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की ‘पीएम मोदी एसी योजना 2025’ अंतर्गत सरकार 5-स्टार एसी मोफत देत आहे. हा दावा खोटा आहे.” असेही सांगण्यात आले की ऊर्जा मंत्रालयाने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणीही अशा प्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेऊ नये.

आता केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Airtel चे 5G सिम, या कंपनीने सुरु केली नवीन सुविधा! असे करता येईल ऑर्डर

लोकांना गोंधळात टाकण्यासाठी आणि त्यांचा वैयक्तिक डेटा चोरण्यासाठी असे खोटे संदेश अनेकदा पसरवले जातात. बऱ्याचदा त्यांचा उद्देश अज्ञात वेबसाइटवर ट्रॅफिक आणणे किंवा बनावट खात्यांना प्रोत्साहन देणे असतो. अशा मेसेजना लोकं बळी पडतात आणि त्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं.

अशा परिस्थितीत लोकांनी काय करावे?

  • लोकांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये आणि त्यांची वैयक्तिक माहिती (जसे की आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक तपशील इ.) कोणत्याही असत्यापित वेबसाइटवर शेअर करू नये.
  • खात्री केल्याशिवाय कोणताही संदेश पुढे पाठवू नका.
  • जर तुम्हाला असा कोणताही संदेश मिळाला तर प्रथम त्याची सत्यता पीआयबी फॅक्ट चेक किंवा मंत्रालयाच्या वेबसाइट सारख्या अधिकृत सरकारी स्रोतांकडून पडताळून पहा.
  • तसेच अशा खोट्या दाव्यांची तक्रार करा आणि ऑनलाइन फसवणूक आणि अफवा टाळण्यासाठी इतरांना जागरूक करा.

Web Title: Have you also received a message in the name of free ac hackers are targeting people tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 09:04 AM

Topics:  

  • scam
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
1

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज
2

Lava Play Ultra 5G: दमदार 5G बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री, 64MP कॅमेरासह डेडिकेटेड गेमबूस्ट मोडने सुसज्ज

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट
3

सर्वसामान्यांना चुना लावण्यासाठी स्कॅमर्स पुन्हा सज्ज, Screen Mirroring Fraud चुटकीसरशी रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…
4

प्रेम आंधळं असतं! दिवसरात्र करत होता चॅटिंग, नंतर पडला प्रेमात! AI साठी व्यक्तीने चक्क बायकोकडेच मागितला घटस्फोट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.