BSNL घेऊन आलाय जबरदस्त रिचार्ज प्लॅन! केवळ 1,198 रुपयांच्या किंमतीत मिळणार वर्षभराचा प्रीपेड प्लॅन, हे आहेत फायदे
भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL (भारत संचार निगम लिमिटेड) नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे. BSNL चे रिचार्ज प्लॅन म्हणजे छोटा पॅकेट आणि बडा धमाका. BSNL च्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फायदे ऑफर केले जातात. याच कारणामुळे अनेक मोठ्या टेलिकॉम कंपन्यांच्या ग्राहकांनी BSNL चा पर्याय निवडला आहे. आता देखील कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आली आहे.
कंपनीने सुरु केलेला नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर केली जात आहे. या प्लॅनची किंमत देखील परवडणारी आहे. ज्यांना वर्षभर रिचार्जची कटकट सहन करायची नाही, अशा ग्राहकांसाठी हा नवीन रिचार्ज प्लॅन सुरु करण्यात आला आहे. BSNL ने सुरु केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 1198 रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 365 दिवसांसाठी म्हणजेच संपूर्ण वर्षाचा रिचार्ज प्लॅन ऑफर केला जातो. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने संपूर्ण वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 1198 रुपये आहे. यामध्ये लिमिटेड फायदे देण्यात आले आहेत. म्हणजेच ज्या ग्राहकांना कमी पैशांत संपूर्ण वर्षासाठी रिचार्ज प्लॅनची गरज असेल तर अशा ग्राहकांसाठी हा रिचार्ज प्लॅन बेस्ट आहे. ज्या लोकांना जास्त फायद्यांची गरज नाही, अशा लोकांसाठी कंपनीने हा विशेष रिचार्ज प्लॅन सुरु केला आहे.
टेलिकॉम कंपनी BSNL ने सुरु केलेल्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 1198 रुपये आहे. हा प्लॅन 365 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये 300 मिनिटे व्हॉइस कॉलिंग, 3GB डेटा आणि प्रतिमाह 30 एसएमएस ऑफर केले जातात. रिचार्ज प्लॅनमध्ये ऑफर केले जाणारे बेनिफिट्स दर महिन्याला 12 महिन्यांसाठी रिन्यू केले जातात. या लिमिटेड फायद्यांमुळे कंपनीने या रिचार्ज प्लॅनची किंमत देखील कमी ठेवली आहे. पण ज्या ग्राहकांना संपूर्ण वर्षासाठी त्यांचं सिम सुरु ठेवायचं असेल तर अशा ग्राहकांना हा रिचार्ज प्लॅन अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.
BSNL त्यांच्या ग्राहकांना कमी किंमतीत अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनच्या किंमती कमी असल्या तरी देखील त्यामध्ये उत्तम फायदे ऑफर केले जातात. याच कारणामुळे जेव्हा इतर टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या, तेव्हा ग्राहक BSNL कडे वळले. आता देखील अशी माहिती समोर आली आहे की, भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या पुन्हा त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवणार आहेत.
गेल्या वर्षी 2024 जुलैमध्ये जेव्हा भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी टेरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या, तेव्हा BSNL त्यांच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केला नाही. मात्र आता BSNL काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर इतर टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे BSNL ने देखील त्यांच्या टेरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ केली तर ग्राहकांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता आहे.