आता केवळ 10 मिनिटांत घरपोच होणार Airtel चे 5G सिम, या कंपनीने सुरु केली नवीन सुविधा! असे करता येईल ऑर्डर
तुम्हाला नवीन 5G सिम खरेदी करायचं आहे? अहो आता 5G सिम खरेदी करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची देखील गरज नाही. कारण आता फास्टेस्ट डिलीव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंकीट तुम्हाला केवळ 10 मिनिटांत सिमकार्डची डिलीव्हरी देणार आहे. होय, आता नवीन सिम खरेदी करण्यासाठी तुम्हाला घराबाहेर जाण्याची देखील गरज नाही. आता एअरटेलने ब्लिंकिटच्या सहकार्याने एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही आता तुमचे नवीन एअरटेल 5G सिम कार्ड घरी बसून ऑर्डर करू शकता आणि काही मिनिटांत हे सिम कार्ड तुमच्या घरी डिलीव्हर देखील केलं जाणार आहे.
फास्टेस्ट डिलीव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंकीट आता एअरटेल सिम कार्ड तुमच्या दाराशी पोहोचवणार आहे. ज्यांना 5G नेटवर्कशी लवकर कनेक्ट करायचे आहे पण घराबाहेर जाऊन सिमकार्ड खरेदी करायला कंटाळा आला आहे, त्यांच्यासाठी ही सुविधा विशेष फायदेशीर आहे. कंपनीने ही सेवा सध्या काही निवडक शहरांमध्ये सुरु केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ब्लिंकिट, ज्याला पूर्वी ग्रोफर्स म्हणून ओळखले जात होते, त्याने आता एक नवीन सुविधा सुरु केली आहे. आता दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये एअरटेल 5G सिमची होम डिलिव्हरी सुरू केली जात आहे. यासाठी ब्लिंकिटने एअरटेलसोबत भागीदारी केली आहे. ब्लिंकिटच्या जलद वितरण सेवेद्वारे, एअरटेल सिम कार्ड काही मिनिटांत तुमच्या घरी डिलीव्हर केलं जाईल. ही सुविधा लवकरच इतर शहरांमध्ये देखील सुरु केली जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
केवायसीसाठी तुमच्याकडे व्हॅलिड ओळखपत्र (जसे की आधार कार्ड) असणे आवश्यक आहे. डिलिव्हरी एजंट सिमसह केवायसी प्रक्रिया देखील पूर्ण करेल. त्यामुळे नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी रांगेत उभं राहण्याची देखील गरज नाही.
या नवीन सुविधेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आता तुम्हाला 5जी सिम घेण्यासाठी दुकानांमध्ये धाव घ्यावी लागणार नाही. याशिवाय, ब्लिंकिटच्या जलद वितरणाचा अर्थ असा आहे की तुम्ही वेळ वाया न घालवता त्वरित 5G नेटवर्कशी कनेक्ट होऊ शकता. ज्यांना तात्काळ नवीन सिमची आवश्यकता आहे किंवा नवीन 5G फोन खरेदी करून हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही सुविधा अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
सध्या ही सेवा दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि बेंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु एअरटेल आणि ब्लिंकिट येत्या काही महिन्यांत इतर महानगरे आणि टियर-2 शहरांमध्ये ते विस्तारण्याची योजना आखत आहेत.