
विद्यार्थ्यांच्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश इलेक्ट्रिकल उपकरणांना आग विझवताना होणारे नुकसान कमी करणे हा आहे. सर्वसाधारण अग्निशामक यंत्रांमधील पाणी किंवा रसायनांमुळे सर्व्हर, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स आणि महागडी उपकरणे खराब होऊ शकतात. सोनिक तंत्रज्ञानामध्ये मात्र आग विझवल्यानंतर कोणताही रासायनिक अवशेष मागे राहत नाही.
ब्रेक लावताच तयार होणार Electricity! Vande Bharat Express चं अजब तंत्रज्ञान; कशी काम करते सिस्टीम?
या उपकरणामध्ये सेन्सर्स, मायक्रोकंट्रोलर, डिजिटल लॉजिक कंट्रोलर आणि हाय-पॉवर अॅम्प्लिफायर यांचा वापर करण्यात आला आहे. सेन्सरच्या मदतीने आग ओळखल्यानंतर सिस्टीम विशिष्ट कमी वारंवारतेच्या ध्वनीलहरी निर्माण करते. विद्यार्थ्यांच्या प्रोटोटाइपमध्ये 30 ते 60 Hz दरम्यानच्या ध्वनीलहरींचा वापर करण्यात आला आहे.
या लहरी हवेत कंपन निर्माण करून आगीभोवतीच्या ऑक्सिजनच्या हालचालीवर परिणाम करतात. त्यामुळे ज्वाळांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि आग विझण्यास मदत होते. थोडक्यात, ध्वनीलहरींच्या माध्यमातून आगीभोवती एक प्रकारची ‘हवेची भिंत’ तयार करण्याची संकल्पना यामागे आहे.
प्रगत एआय तंत्रज्ञानासह सॅमसंगचे नवीन ‘गॅलेक्सी वॉच’ लवकरच होणार लॉन्च; जाणून घ्या काय असेल खास!
या उपकरणाची किंमत सध्या अंदाजे ₹7,000 ते ₹8,000 असल्याचे सांगण्यात आले आहे. वजन कमी असल्याने दुर्गम भागातही ते नेणे शक्य होऊ शकते. भविष्यात डेटा सेंटर, सर्व्हर रूम, प्रयोगशाळा तसेच जंगलातील आगीसाठी याचा वापर करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे.
हा सध्या प्रोटोटाइप असून त्याला अधिक कॉम्पॅक्ट आणि पावरफुल बनवण्याचे काम सुरू आहे. प्रकल्पाला पेटंट मिळवण्यासाठीही तयारी केली जात आहे. विद्यार्थ्यांचा हा प्रयोग महाविद्यालयीन प्रकल्पाच्या पलीकडे नेऊन व्यावसायिक उत्पादनात रूपांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.