
दिसायला भारी, परफॉर्मन्स जबरदस्त! Honor च्या नव्या स्मार्टफोनने वेधलं सर्वांचं लक्ष, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
Honor Magic 8 Pro Air च्या बेस व्हेरिअंट 12GB+256GB कॉन्फिगरेशनसाठी CNY 4,999 म्हणजेच सुमारे 65,000 रुपये खर्च करावे लागणार आहे. 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,299 म्हणजेच सुमारे 69,000 रुपये आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,599 म्हणजेच सुमारे 73,000 रुपये आहे. तर टॉप-ऑफ-द-लाइन कॉन्फिगरेशन 16GB रॅम आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 78,000 रुपये आहे.
चीनमध्ये Honor Magic 8 RSR Porsche Design च्या बेस व्हेरिअंट 16GB+512GB ची किंमत CNY 7,999 म्हणजेच सुमारे 1,04,000 रुपये आहे. तर टॉप-एंड 24GB रॅम आणि 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 8,999 म्हणजेच सुमारे 1,17,000 रुपये आहे. Magic 8 RSR Porsche Design मूनलाइट स्टोन आणि स्लेट ग्रे रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर Honor Magic 8 Pro Air फेयरी पर्पल, लाइट ऑरेंज, फेदर व्हाइट आणि शॅडो ब्लॅक रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
ऑनर मॅजिक 8 प्रो एअर एक फिजिकल आणि एक eSIM ला सपोर्ट करते. हा फोन अँड्रॉईड 16-बेस्ड MagicOS 10 वर आधारित आहे. यामध्ये 6.31-इंच (1,216×2,640 पिक्सेल) OLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 460 ppi पिक्सेल डेंसिटी, 1.07 बिलियन कलर, 6,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि HDR कंटेंटसाठी सपोर्ट आहे. हा फोन ऑक्टा कोर मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 चिपसेटने सुसज्ज आहे. यामध्ये माली जी1-अल्ट्रा एमसी12 जीपीयू, 16 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे.
ऑनर मॅजिक 8 प्रो एअरमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.6) चा मुख्य शूटर ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह येतो. यामध्ये मागील बाजूला 50-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 64-मेगापिक्सेल (f/2.6) चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील आहे. Magic 8 Pro Air मध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50-मेगापिक्सेल (f/2.0) चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 6.0, NFC, एक USB टाइप-C पोर्ट, BeiDou, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि NavIC देखील आहे. ऑनबोर्ड सेंसरच्या यादीमध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक प्रॉक्सिमिटी सेंसर, सिक्योरिटीसाठी एक अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर, एक हॉल सेंसर, एक IR ब्लास्टर, एक ई-कंपास, एक जायरोस्कोप, एक ग्रेविटी सेंसर आणि एक कलर टेम्परेचर सेंसर समाविष्ट आहे. Honor Magic 8 Pro Air मध्ये 5,500mAh बॅटरी आहे. ज्यामध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे हँडसेट धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंगसह लाँच करण्याच आले आहेत.
ऑनर मॅजिक 8 आरएसआर पोर्श डिझाइन एक डुअल सिम फोन आहे जो Android 16-बेस्ड MagicOS 10 वर चालतो. यामध्ये 6.71-इंच फुल-HD+ (1,256×2,808 पिक्सल) OLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 6,000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, 1.07 बिलियन रंग आणि HDR कंटेंटसाठी सपोर्ट आहे. हा क्वालकॉमच्या ऑक्टा कोर 3nm स्नॅपड्रॅगन 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज आहे. हँडसेटमध्ये अॅड्रेनो 840 जीपीयू, 24 जीबी पर्यंत एलपीडीडीआर5 एक्स अल्ट्रा रॅम आणि 1 टीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे.
ऑनर मॅजिक 8 आरएसआर पोर्श डिझाइनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेल (f/1.6) प्रायमरी शूटर, 50-मेगापिक्सेल (f/2.0) अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200-मेगापिक्सेल (f/2.6) पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटला 50-मेगापिक्सेल (f/2.0) सेल्फी कॅमेरा आहे. ऑनर मॅजिक 8 आरएसआर पोर्श डिझाइनमध्ये 7,200mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 120W वायर्ड आणि 80W वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय 7, ब्लूटूथ 6, यूएसबी टाइप-सी पोर्ट, बीडौ, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि नेव्हिकसाठी सपोर्ट आहे.