iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता
लीक झालेल्या व्हिडीओमध्ये अपकमिंग आयफोन 18 प्रोचे पूर्ण डिझाईन आणि काही मुख्य हार्डवेयर डिटेल्सचा दावा केला जात आहे. फ्रंट पेज टेकचे टिपस्टर जॉन प्रॉसरतर्फे करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अॅपलच्या पुढील प्रमुख रीडिझाइन टप्प्याची माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये डिस्प्ले, कॅमेरा सिस्टीम, इंटरनल कंपोनेंट्स आणि अगदी रंग पर्यायांमध्ये बदल झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – X)
आयफोन 18 प्रोच्या फ्रंटला सर्वात मोठा बदल पाहायला मिळाला. अॅपल अनेक जेनरेशनपासून पिल-शेपचा कटआउटचा वापर करत आहे. मात्र आता लिक झालेल्या फोटो आणि व्हिडीओवरून अशी माहिती मिळत आहे की, पिल-शेप कटआउटचा आकार यावेळी छोटा असू शकतो. व्हिडीओनुसार, फेस आयडीचे काही कंपोनेंट्स डिस्प्लेच्या खालील बाजूला शिफ्ट केले जाणार आहेत. यामुळे अॅपल दृश्यमान कटआउट एकाच सिंगल होलपुरते मर्यादित ठेवू शकेल. सर्वात मजेदार गोष्ट अशी आहे की, सेल्फी कॅमेरा स्क्रीनमध्ये असल्यामुळे टॉप-लेफ्ट कोपऱ्यात दिसणार आहे. जे दीर्घकाळ आयफोन वापरणाऱ्यांसाठी एक मोठा बदल असू शकतो.
🚨 iPhone 18 Pro LEAKS! 👀
✅ A20 Pro (2nm)
✅ Under-display Face ID
✅ Punch-hole front
✅ Apple C2 modem
✅ Pressure-sensitive camera control
✅ 5G via satellite
✅ Variable aperture
🎨 Burgundy & Purple
💰 $1099 | $1199
Via: FPT
Thoughts? 🥹 pic.twitter.com/TuAGgdQvvG — Shailendra Khare (@shail01khare) January 19, 2026
लीक झालेल्या व्हिडीओनुसार, हा फोन 3 कलर ऑप्शनमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. यामध्ये बर्गेंडी, ब्राउन आणि पर्पल यांचा समावेश असणार आहे. बर्गेंडी कलरद्वारे फीचर आणि स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला जात आहे.
लीकनुसार, फिजिकल कंट्रोलमध्ये देखील काही बदल होण्याची शक्यता आहे. अॅपल सध्या असलेलं कॅपेसिटिव कॅमेरा कंट्रोल बटण काढून त्याऐवजी प्रेशर-बेस्ड (दाबावर काम करणारी) सोपी यंत्रणा देऊ शकते. यामुळे बटण वापरणं अधिक विश्वासार्ह होईल. विशेषतः फोटो किंवा व्हिडिओ काढताना ज्यांना स्पष्ट फिजिकल रिस्पॉन्स हवा असतो, अशा यूजर्ससाठी हे खूपच उपयुक्त ठरू शकतं.
Google Translate चा खेळ खल्लास? OpenAI ने केला सायलेंट धमाका! ChatGPT साठी आणलं नवं फीचर
लीक व्हिडीओमध्ये आगामी आयफोन 18 प्रोच्या बॅटरीबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र आयफोन 18 प्रोमध्ये 6.3 इंच डिस्प्ले आणि मॅक्स व्हेरिअंटमध्ये 5100mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.
Ans: iPhone चे डिझाइन Apple (अमेरिका) करते, तर उत्पादन भारत, चीन आणि इतर देशांमध्ये केले जाते.
Ans: नाही. iPhone मध्ये फक्त iOS साठी उपलब्ध अॅप्सच वापरता येतात.
Ans: iPhone चा कॅमेरा फोटो आणि व्हिडिओची गुणवत्ता, स्थिरता (stabilization) आणि नैसर्गिक रंगांसाठी प्रसिद्ध आहे.






