14,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले Honor ने दोन नवीन 'स्मार्ट'फोन, असे आहेत स्पेसिफिकेशन्स
स्मार्टफोन कंपनी Honor चे दोन नवीन स्मार्टफोन आता अखेर लाँच करण्यात आले आहेत. हे नवीन स्मार्टफोन Honor Play 60 आणि Honor Play 60m या नावाने स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंंमत 14,100 रुपये आहे. स्मार्टफोन MediaTek Dimensity चिपसेट आणि मोठी 6,000mAh बॅटरीने सुसज्ज आहे. फोन्समध्ये एक फिजिकल बटन देखील देण्यात आलं आहे, जे सिंगल क्लिकमध्ये अनेक क्विक फीचर्स अॅक्सेस करण्याची सुविधा देतो. स्मार्टफोनच्या किंमती, रंग पर्याय आणि फीचर्सवर नजर टाकूया.
तुमच्या बजेटमध्ये Honor घेऊन आलाय नवीन Smartphone, AI फीचर्स आणि AMOLED डिस्प्लेने सुसज्ज!
Honor Play 60 च्या 6GB + 128GB व्हेरिअंटची चीनमध्ये किंमत CNY 1,199 म्हणजेच अंदाजे 14,100 रुपयांपासून सुरू होते. 8GB + 256GB मॉडेलची किंमत 1,399 चिनी युआन म्हणजेच अंदाजे 16,400 रुपये आहे. दुसरीकडे, Honor Play 60m चा 6GB + 128GB व्हेरिएंट CNY 1,699 म्हणजेच अंदाजे 19,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर 8GB + 256GB आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे CNY 2,199 म्हणजेच अंदाजे 25,800 रुपये आणि CNY 2,599 म्हणजेच अंदाजे 30,500 रुपये आहे. हे डिव्हाईस लवकरच ऑनरच्या चायना ई-स्टोअरवर उपलब्ध होतील. Honor Play 60 हा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये ब्लॅक, स्नोवी आणि ग्रीन पर्याय आहेत. Honor Play 60m रॉक ब्लॅक, स्नो आणि मॉर्निंग ग्लो गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Honor Play 60 आणि Play 60m मध्ये 6.61-इंच HD+ (720×1,604 पिक्सेल) TFT LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1,010 निट्स पीक ब्राइटनेस, DC डिमिंग, लो ब्लू लाइट, नेचुरल लाइट आई प्रोटेक्शन आणि रीडर मोड सारखे फीचर्स आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर आणि ARM G57 MC2 GPU ला सपोर्ट करतात. हँडसेट Android 15 वर बेस्ड MagicOS 9.0 वर चालतात.
फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर, दोन्हीमध्ये 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा (f/1.8 अपर्चर) आणि 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा (f/2.2 अपर्चर) आहे. मागील आणि पुढील कॅमेरे 1080p रिझोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगला समर्थन देतात. Honor Play 60 सीरीज फोनमध्ये AI बेस्ड इमेजिंग, प्रोडक्टिविटी आणि सिक्योरिटी फीचर्स आहेत. डाव्या काठावर असलेल्या एका फिजिकल बटणामुळे यूजर्सना एका क्लिकवर कॉल करणे, ब्राइटनेस एडजस्ट करणे इत्यादी गोष्टी करता येतात.
इंडियन मार्केटमध्ये लाँच झाला POCO चा लेटेस्ट स्मार्टफोन, हटके फीचर्स आणि किंमत तुमच्या बजेटमध्ये
Honor ने पुष्टी केली आहे की दोन्ही मॉडेल्समध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 5V/3A वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.
सुरक्षेसाठी, त्यांच्याकडे बाजूला माउंट केलेले फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि ते IP64 रेटिंगसह धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधक आहेत. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Wi-Fi 5, Bluetooth 5.3, GPS, OTG, USB Type-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक यांचा समावेश आहे. फोनचा आकार 163.95 x 75.6 x 8.39 मिमी आणि वजन १९७ ग्रॅम आहे.