तुमच्या बजेटमध्ये Honor घेऊन आलाय नवीन Smartphone, AI फीचर्स आणि AMOLED डिस्प्लेने सुसज्ज!
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी Honor ने त्यांचा नवीन 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. Honor 400 Lite 5G चं लाँचिंग निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये करण्यात आलं आहे. चिनी टेक ब्रँड Honor ने लाँच केलेला हा नवीन स्मार्टफोन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Honor 200 Lite 5G चा उत्तराधिकारी आहे. कंपनीने अलीकडेच Honor 300 देखील लाँच केला होता. परंतु या स्मार्टफोन सिरीजमध्ये Lite व्हर्जन लाँच करण्यात आलं नाही. त्यामुळे आता कंपनीने हा नवीन Honor 400 Lite 5G स्मार्टफोन लाँच केेला आहे.
कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन एक बजेट मॉडेल आहे. शिवाय हा स्मार्टफोन तीन आकर्षक रंगाच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच होणार आणि त्याची किंमत काय असणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. या स्मार्टफोनमध्ये अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – X)
हंगेरीमध्ये Honor 400 Lite 8GB आणि 12 GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Honor 400 Lite च्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत FT 1,09,999 म्हणजेच अंदाजे 25,000 रुपये ठेवण्यात आली आहे. 12 GB रॅम व्हेरिअंटच्या किंमतीची माहिती अद्याप उपलब्ध नाही. हा फोन मार्र्स ग्रीन, व्हेलवेट ब्लॅक आणि व्हेलवेट ग्रे रंगाच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. फोनचे रंग अतिशय आकर्षक आहेत.
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला Honor 400 Lite हा Android 15 वर आधारित MagicOS 9.0 सह येतो. या स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,412 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,500 nits पीक ब्राइटनेस देतो. डिस्प्लेमध्ये 3840Hz उच्च-फ्रिक्वेन्सी PWM डिमिंग आहे. स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 7025-Ultra चिपसेटवर चालते आणि 8GB आणि 12GB रॅम पर्यायांसह उपलब्ध आहे.
नव्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, Honor 400 Lite मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये f/1.75 अपर्चरसह 108-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 5-मेगापिक्सेलचा सेकंडरी सेन्सर समाविष्ट आहे. समोर, f/2.45 अपर्चरसह 16-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी, Honor 400 Lite मध्ये 5GNR, Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.3, GPS, AGPS, GLONASS, BeiDou, Galileo, OTG आणि USB Type-C सारखे पर्याय आहेत. त्यामध्ये असलेल्या सेन्सर्समध्ये अँबियंट लाइट सेन्सर, कंपास, ग्रॅव्हिटी सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर यांचा समावेश आहे. या फोनला IP65 रेटिंगसह पाणी आणि धूळ प्रतिरोधकता, तसेच SGS फाइव्ह-स्टार ड्रॉप प्रतिरोधकता रेटिंग मिळाली आहे. प्रमाणीकरणासाठी त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. Honor ने या फोनमध्ये AI इरेज, AI पेंटिंग, AI ट्रान्सलेट इत्यादी अनेक AI-चालित वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत. यात AI कॅमेरा बटण देखील आहे, जे युजर्सना एका हाताने फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यास अनुमती देते.
Honor 400 Lite मध्ये 5,230mAh बॅटरी आहे, जी 35W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डायमेंशन्सबद्दल बोलायचे झाले तर, ते 161×74.55×7.29mm आहे आणि त्याचे वजन 171 ग्रॅम आहे.