Vivo Y600 ने रचला इतिहास! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, सलग 32 तास 37 मिनिटे सुरू राहिला स्मार्टफोन
विवो स्मार्टफोनने एका कठीण बॅटरी परिक्षेदरम्यान या फोनच्या परफॉर्मंसचा डेमो सादर केला. ब्रँडने शेअर केलेल्या माहितीनुसार, या स्मार्टफोनने त्याच्या जबरदस्त बॅटरी परफॉर्मंससाठी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नाव नोंदवले आहे. हा स्मार्टफोन Vivo V80 Lite चे रिब्रँडेड वर्जन असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जो अलीकडेच मलेशियामध्ये लाँच करण्यात आला होता. (फोटो सौजन्य: X)
एका Weibo पोस्टमध्ये विवोने घोषणा केली आहे की, 30 ऑक्टोबर रोजी चीनमध्ये नवीन Y600 स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. या पोस्टमध्ये स्मार्टफोनची एक ईमेज देखील शेअर करण्यात आली आहे. ज्यामध्ये फोन सफेद आणि पर्पल रंगात दिसत आहे. या फोटोमध्ये फोनची डिझाईन हायलाईट केली जात आहे. ज्यामध्ये फ्लॅट साइड्स आणि किंचित उंचावलेले कॅमेरा मॉड्यूल पाहायला मिळत आहे. कॅमेरा मॉड्यूलवरून स्पष्ट होते की, यामध्ये 50-मेगापिक्सेल मेन सेंसरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
एका दुसऱ्या वीबो पोस्ट मध्ये विवोने सांगितलं आहे की, त्यांच्या आगामी Y600 स्मार्टफोनने बॅटरी लाईफसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. रिपोर्ट्सनुसार, फोनने एका लाईव्ह स्ट्रिमिंग टेस्टमध्ये 32 तास आणि 37 मिनिटे चालू राहून सर्वांना चकित केले. शेअर करण्यात आलेल्या ईमेजमध्ये असं मेंशन करण्यात आलं आहे की, ही चाचणी याचवर्षी 11 ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.
जबरदस्त फीचर्ससह नवा HMD फीचर फोन लाँच; AI असिस्टेंटने सुसज्ज, वृद्धांसाठी ठरणार बेस्ट पर्याय
आगामी Y600 स्मार्टफोन Vivo V80 Lite चे रिब्रँडेड वर्जन असू शकते. Vivo V80 Lite मध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाला 6.83-इंच अमोलेड पॅनल मिळणार आहे. हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP68 + IP69 रेटिंग ऑफर करतो. यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7300e चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 44W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी दिली आहे.
Ans: Vivo Y600 स्मार्टफोन ३० ऑक्टोबर २०२६ रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे.
Ans: या स्मार्टफोनमध्ये १०,०००mAh क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी दोन दिवसांची बॅटरी लाइफ देऊ शकते.
Ans: रिपोर्ट्सनुसार, Vivo Y600 ने लाइव्ह स्ट्रीमिंग चाचणीदरम्यान सलग ३२ तास ३७ मिनिटे कामगिरी करत बॅटरी लाइफसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे.






