Aadhaar Update: एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही! घरबसल्या आधार कार्डसोबत लिंक करा ई-मेल; फॉलो करा 'ही' सोपी प्रोसेस
Tech Tips: किती असतं Gaming Laptop चे आयुष्य? खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य, नाहीतर कराल पश्चाताप
आधार डेटामध्ये कार्ड धारकाचा ई-मेल अपडेट झाल्यानंतर ओटीपी वेरिफिकेशन आणि ऑनलाईन सेवा ॲक्सेस करणं अतिशय सोपं होणार आहे. तसेच डॉक्युमेंट सेव्ह करण्याची प्रोसेस देखील अतिशय सोपी होणार आहे. आधार कार्ड धारक सध्या सुरु असलेल्या मोफत सेवेअंतर्गत आधार कार्डमध्ये मोफत ई-मेल अपडेट करू शकणार आहेत. ही सेवा 31 डिसेंबर 2026 पर्यंत मोफत असणार आहे. कालावधी संपल्यानंतर आधार कार्डमध्ये ई-मेल अपडेट करण्यासाठी 75 रुपये खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
UIDAI चं असं म्हणणं आहे की, ही सेवा केवळ अशा यूजर्सना ऑफर केली जाणार आहे, जे आधार ॲपद्वारे ईमेल अपडेट करत आहेत. मोबाईल ॲप वापरून ई-मेल अपडेट करणाऱ्या यूजर्सना कोणतेही पैसे खर्च करावे लागणार नाहीत. मात्र जर तुम्ही आधार सेंटर किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आधारमध्ये ई-मेल अपडेट केला तर तुम्हाला त्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
अनेकदा मोबाईलमध्ये सिग्नल नसेल तर आधार ओटीपी येत नाही. पण जर तुमच्या आधारला तुम्ही ई-मेल लिंक केला असेल तर कार्ड धारक ई-मेलमधून ओटीपी मिळवू शकतात. तसेच ईमेलमध्ये त्यांना आधारसंबंधित अपडेट्स देखील मिळणार आहेत. जरी तुम्ही आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर बदलला तरी देखील तुम्हाला ई-मेलद्वारे ओटीपी मिळवण्याचा पर्याय असणार आहे.
ज्या यूजर्सनी अद्याप आधार कार्डमध्ये ई-मेल अपडेट केला नाही, त्यांनी त्वरित आधार कार्जमध्ये ई-मेल लिंक करणं गरजेचं आहे. तसेच, जर तुमचे आधार आधीच लिंक केलेले असेल आणि तुम्ही नवीन आयडी तयार केला असेल, तरीही तुम्ही तुमचा नवीन ई-मेल अपडेट करू शकता. यामुळे आधार ओटीपी पडताळणीची प्रक्रिया सुलभ होईल.






