Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

एलपीजी सिलेंडरचा तुटवडा टाळण्यासाठी पीएनजी वापरण्याचे आवाहन. घरबसल्या MGL, IGL किंवा GAIL गॅससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 09, 2026 | 05:20 PM
PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? (Photo Credit- X)

PNG साठी Online अप्लाय कसे करावे? किती दिवसांत लागेल कनेक्शन? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • PNG साठी Online अप्लाय कसे करावे?
  • किती दिवसांत लागेल कनेक्शन?
  • एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
How to Apply for New Png Connection: एलपीजी (LPG) सिलेंडरच्या तुटवड्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने आता पाईप्ड नॅचरल गॅस म्हणजेच पीएनजी (PNG) वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात नैसर्गिक वायूची वाहिनी उपलब्ध आहे, अशा परिसरातील नागरिकांना पुढील तीन महिन्यांत पीएनजी कनेक्शन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे ज्या दुर्गम भागात गॅस वाहिनी नाही, तेथे एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तुमच्या भागात पीएनजी पाईपलाईन उपलब्ध असल्यास, तुम्ही खालीलप्रमाणे घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता.

1. महानगर गॅस लिमिटेड (MGL) – मुंबई आणि परिसरासाठी

मुंबई आणि उपनगरात ‘महानगर गॅस’द्वारे पीएनजी पुरवठा केला जातो. अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे:

  • सर्वप्रथम www.mahanagargas.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवरील ‘Customer Zone’ मध्ये जाऊन ‘New Domestic Connection Request’ हा पर्याय निवडा.
  • तुमच्या परिसराचा पिन कोड टाकून नवीन कनेक्शनसाठी नोंदणी करा.

2. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL)

दिल्ली-एनसीआरसह काही प्रमुख शहरात आयजीएलद्वारे पुरवठा केला जातो:

  • https://www.iglonline.net/ या संकेतस्थळावर जा.
  • ‘Apply New Connection’ वर क्लिक करून तुमच्या भागातील गॅस उपलब्धतेची (Feasibility) तपासणी करा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. त्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी येऊन पडताळणी करतील आणि कनेक्शन कार्यान्वित होईल.

UPI Circle : आता करता येईल बँक खात्याशिवाय UPI पेमेंट; Google Pay चे नवीन पॉकेट मनी फीचर झाले लॉन्च

3. गेल गॅस (GAIL Gas)

देशातील इतर अनेक शहरांमध्ये गेल गॅस कार्यरत आहे:

  • www.gailgas.com या वेबसाइटवर ‘New Customer Registration’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा शहर किंवा भागाचा नाव निवडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

कनेक्शन मिळण्यासाठी किती दिवस लागतात?

पीएनजी कनेक्शन मिळण्याचा कालावधी हा प्रामुख्याने तुमच्या भागातील मागणीवर अवलंबून असतो. जर तुमच्या इमारतीत किंवा परिसरात आधीच पाईपलाईन असेल, तर साधारणपणे 15 ते 20 दिवसांत गॅस पुरवठा सुरू होतो. नवीन भागात किंवा मागणी मोठ्या प्रमाणात असल्यास नवीन कनेक्शन मिळण्यासाठी 90 दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो. MGL, IGL आणि GAIL या सर्व कंपन्यांसाठी साधारणपणे हाच कालावधी लागू होतो.

पीएनजी वापराचे फायदे

पीएनजी हा एलपीजी सिलेंडरच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि स्वस्त मानला जातो. यामध्ये सिलेंडर संपण्याची भीती नसते आणि थेट पाईपलाईनद्वारे 24 तास गॅस उपलब्ध राहतो. तसेच, तुम्हाला जेवढा गॅस वापरला आहे, तेवढेच बिल भरावे लागते.

Flipkart Big Bachat Days: अवघे काही शिल्लक! डिस्काऊंटसह खरेदी करा एसी, टिव्ही आणि बरंच काही; जाणून घ्या ऑफर्स

Web Title: How to apply for a png connection online how long will it take to get the connection find out with just one click

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 05:20 PM

Topics:  

  • Central Governement
  • gas
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.