
Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय
PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस
मॅच सुरू होताना योग्य ठिकाणी लँड करणे आवश्यक आहे. जर तुम्ही नवीन प्लेअर असाल तर सुरुवातीला जास्त प्लेअर्स असलेल्या ठिकाणी जाऊ नका. अशा जागा निवडा जिथे तुम्हाला जास्त लूट मिळेल आणि शत्रू कमी असतील. ज्यामुळे तुम्ही आरामात जास्त शस्त्रे गोळा करू शकाल आणि शत्रूंना हरवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
मिनी मॅप तुमच्यासाठी नेहमी फायद्याचा ठरतो. यामध्ये शत्रूंनी केलेले वार, गाड्यांचा आवाज आणि सेफ झोन या सर्वांची माहिती मिळते. वेळोवेळी मॅप बघत राहिल्यास तुम्ही स्वतःचे रक्षण करू शकता.
प्रत्येक खेळाडूला प्रत्येक शास्त्राचा वापर होईलच असे नाही. सुरुवातीला SMG किंवा AR सारख्या शस्त्राचा वापर करा. नंतर तुमच्या आवडीनुसार आणि कंट्रोलनुसार स्नाइपर किंवा शॉटगन निवडा. तुमचे शस्त्र वेळोवेळी अपग्रेड करत राहा..
फ्री फायर मॅक्समध्ये प्रत्येक कॅरेक्टरची स्किन वेगळी असते. जसे की एखादा कॅरेक्टर HP वाढवतो तर कोणता कॅरेक्टर स्पीड वाढवतो. तुमच्या खेळण्याच्या स्टाईलनुसार कॅरेक्टर आणि स्किल्सची निवड करा.
ग्लू वॉल तुमचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कोणावर हल्ला करताना किंवा कोणी तुमच्यावर हल्ला केल्यास ग्लू वॉल लावून तुमचे रक्षण करा.
OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर! मिड-रेंज सीरिजची प्री-बुकिंग सुरू, लाँचला अवघे काहीच दिवस शिल्लक
जर तुम्हाला लवकरात लवकर शत्रूवर विजय मिळवायचा असेल तर हेडशॉटवर फोकस करा. यासाठी तुम्ही ट्रेनिंग ग्राऊंडवर प्रॅक्टिस करू शकता.