Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Independence Day Red Fort Ceremony: 15 ऑगस्टनिमित्त लाल किल्ल्यावर होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनेकांची इच्छा असते. यंदाही या सोहळ्यासाठी ऑनलाइन प्रवेश पास बुक करण्याची सुविधा आमंत्रण पोर्टलवर उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 14, 2026 | 12:02 PM
Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Independence Day 2026: लाल किल्ल्यावरून पाहायचा आहे स्वातंत्र्यदिन सोहळा? आत्ताच घरबसल्या बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Follow Us
Follow Us:
  • लाल किल्ल्यावरील 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी संरक्षण मंत्रालयाच्या आमंत्रण पोर्टलवरून ऑनलाइन प्रवेश पास बुक करता येतो.
  • तिकीट बुकिंगसाठी वैध ओळखपत्र आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर आवश्यक आहे.
  • बुकिंग पूर्ण झाल्यानंतर मिळणारा एंट्री पास सोबत ठेवणे महत्त्वाचे असून दिल्लीमध्ये सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Independence Day: भारतात सर्वत्र 15 ऑगस्टचा उत्साह पाहायला मिळत आहे. शाळा, कॉलेज आणि ऑफीसमध्ये देखील भारताचा 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावर दरवर्षीप्रमाणेच उद्या देखील काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. लाल किल्ल्यावरील या सोहळ्याचे साक्षीदार व्हायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत ‘आमंत्रण’ पोर्टलद्वारे तुमचे प्रवेश पास ऑनलाइन बुक करू शकता. ही बुकींग प्रोसेस अतिशय सोपी आहे. प्रोसेस पूर्ण करण्यासाठी यूजर्सना एक व्हॅलिड आयडेंटिटी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबरची आवश्यकता असणार आहे.

Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स

स्वातंत्र्यता दिन समारंभाच्या तिकीटची किंमत

  • जनरल कॅटेगरी: ₹20
  • स्टँडर्ड कॅटेगरी: ₹100
  • प्रीमियम कॅटेगरी: ₹500  (फोटो सौजन्य: Pinterest) 

तिकीट बुक करण्यासाठी हे कागदपत्रे आवश्यक

  • आधार कार्ड
  • वोटर आयडी
  • पासपोर्ट

ऑनलाईन कसे बुक कराल समारंभाचे तिकीट?

  • अधिकृत आमंत्रण पोर्टल aamantran.mod.gov.in ला भेट द्या.
  • रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु करण्यासाठी मोबाईल नंबर एंटर करा.
  • आता फोनवर आलेला ओटीपी एंटर करा आणि महत्त्वाच्या डिटेल्स भरा.
  • आता तुमच्या आधार कार्ड, वोटर आयडी किंवा पासपोर्टचा फोटो अपलोड करा.
  • आता तुमच्या समोर ईव्हेंट्सची यादी दिसू लागेल. त्यामध्ये स्वातंत्र्यता दिन समारंभ 2026 निवडा.
  • तुमची आवडती तिकीट कॅटेगरी निवडा.
  • यूपीआय, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करून पेमेंट करा.
  • बुकींग पूर्ण झाल्यानंतर आता तुमच्या फोनमध्ये एंट्री पास डाऊनलोड करा.
  • लाल किल्ल्यावरील समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी हा एंट्री पास अत्यंत गरजेचा आहे, त्यामुळे तो जपून ठेवा.
Independence Day 2026: एक सेल्फी, एक AI Prompt आणि तयार होईल 15 ऑगस्टचा भन्नाट फोटो; अशी आहे सोपी प्रोसेस

दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था वाढवली

मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यता दिनानिमित्त दिल्ली पोलिसांनी राजधानीत सुरक्षा वाढवली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, उद्याचा समारंभ शांततापूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी गस्त, वाहनांची तपासणी, ड्रोनद्वारे देखरेख आणि मॉक ड्रिल्स (नमुना सराव) केले जात आहेत. दिल्लीच्या सीमा, गजबजलेली बाजारपेठ, मॉल्स, हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणे आणि इतर संवेदनशील भागांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यमुना नदी, तिचे पूरक्षेत्र आणि इतर संवेदनशील भागांवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत, तसेच बाजारपेठा, मॉल्स आणि सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे.

Web Title: How to book online ticket for independence day red fort ceremony follow this process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Independence Day 2026
  • Red Fort
  • Tech News

संबंधित बातम्या

Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स
1

Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स

Independence Day 2026: एक सेल्फी, एक AI Prompt आणि तयार होईल 15 ऑगस्टचा भन्नाट फोटो; अशी आहे सोपी प्रोसेस
2

Independence Day 2026: एक सेल्फी, एक AI Prompt आणि तयार होईल 15 ऑगस्टचा भन्नाट फोटो; अशी आहे सोपी प्रोसेस

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
3

realme 16x 5G ची एन्ट्री! 7000mAh ‘Titan’ बॅटरी अन् पॉवरफुल परफॉर्मन्स; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी
4

Independence Day Special: देशभक्तीच्या कथा पाहण्याची Airtel आयपीटीव्हीवर रंगतदार मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.