Fraud Alert: 15 ऑगस्टच्या शुभेच्छांचा मेसेज अन् क्षणातच रिकामं होईल बँक अकाऊंट! स्कॅमर्सपासून राहा सावध, लक्षात ठेवा या टिप्स
स्कॅमर्स तुमच्या फोनवर विविध कंपन्याच्या नावाने मेसेज पाठवतात. या मेसेजमध्ये ऑफर्स, भेटवस्तू किंवा इतर आकर्षक गोष्टी लिहील्या जातात. विशेष म्हणजेच या मेसेजमध्ये एक लिंक देखील जोडली जाते. स्कॅमर्सद्वारे पाठवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये लिहीले असते की, 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यता दिनानिमित्त विशेष भेटवस्तू आणि आकर्षक ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. अनेक लोकं या मेसेजवर आणि मेसेजमधील लिंकवर विश्वास ठेवतात आणि त्यावर क्लिक करतात. यानंतर अगदी काही क्षणातच तुमचं बँक अकाऊंट रिकामं होतं आणि तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये ट्रांसफर होतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
नेहमी लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, दिवाळी किंवा इतर कोणत्याही उत्सवांच्या दिवसांत तुमच्या स्मार्टफोनवर असे मेसेद आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण स्कॅमर्स भेटवस्तू, शुभेच्छा, ऑफर्स आणि सेलच्या नावाने लोकांची फसवणूक करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. असे केल्यास तुमचे बँक अकाऊंट रिकामे होण्याची आणि तुमचे सर्व पैसे स्कॅमर्सच्या अकाऊंटमध्ये जाण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते.
Vivo यूजर्सना झटका! कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप 5G फोन महागला, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवी किंमत
या फिशिंग लिंक असू शकतात आणि या लिंकवर क्लिक केल्यास तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा कंट्रोल स्कॅमर्सकडे जाऊ शकतो. तसेच तुमच्या अकाऊंटमधील सर्व पैसे स्कॅमरच्या अकाऊंटमध्ये जाऊ शकतात. जर तुमच्या स्मार्टफोनवर असा कोणता मेसेज आला तर त्यावर क्लिक करू नका.



