Independence Day 2025: लाल किल्ल्यावर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यकामाचे व्हा साक्षीदार, अशी बुक करा ऑनलाइन तिकिटे
दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यादिन साजरा केला जाणार आहे. ब्रिटिशांपासून मिळालेली आझादी 15 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. हा दिवस प्रत्येक भारतीय व्यक्ती अगदी गर्वाने साजरा करतो. लाल किल्ल्यावर साजरा केल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हावा असा अनेकांना वाटतं. पण यासाठी तिकीट कसे बुक करावे, इथपर्यंतचा प्रवास कसा करावा याबाबत अनेकांना माहिती नसतं.
लाल किल्ल्यावर साजरा केला जाणाऱ्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी तुम्हीही ऑनलाईन बुक करू शकता. यासाठी अगदी सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. तुम्ही अगदी घरबसल्या लाल किल्ल्यावर सोहळ्यासाठी तिकिटे बुक करू शकता आणि यावेळी तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्याची देखील संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
यंदा भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी देखील लाल किल्ल्यावर जाऊन तिरंगा ध्वज फडकवणार आहेत आणि जनतेला संबोधित करण्यात आहेत. यावेळी हजारो लोक त्या क्षणाचे साक्षीदार असतील. तसेच हा कार्यक्रम लाईव्ह दाखवला जातो. तुम्हाला देखील या क्षणाचा साक्षीदार व्हायचे असेल आणि लाल किल्ल्यावरील सोहळा समोरासमोर पहायचा असेल तर तुम्हाला तिकीट बुक करावे लागेल. या सोहळ्याचे तिकीट बुक करणे सरकारने अधिक सोपे बनवले आहे. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करायची आहे आणि काही क्षणातच तुमची तिकिटे बुक होतील.
तुम्ही 13 ऑगस्टपासून रक्षा मंत्रालयची वेबसाइट [aamantran.mod.gov.in](https://aamantran.mod.gov.in) किंवा [e-invitations.mod.gov.in](https://e-invitations.mod.gov.in) या वेबसाईटला भेट देऊन तुमची तिकिटेबुक करू शकता आणि या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होऊ शकता.
जर तुम्ही ऑनलाईन तिकीट खरेदी करू शकत नसाल तर तुमच्यासाठी ऑफलाइन तिकिटाची सुविधा देखील उपलब्ध आहे. ऑफलाइन तिकीट तुम्ही दिल्लीतील काही सरकारी भवन आणि विशेष काउंटरवरून 10 ते 12 ऑगस्ट दरम्यान खरेदी करू शकता. लक्षात ठेवा की ही तिकीट अगदी मर्यादित असतात त्यामुळे तुम्हाला ऑफलाइन तिकीट खरेदी करण्यासाठी घाई करावी लागणार आहे. या तिकिटांची मागणीत प्रचंड असते त्यामुळे यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्ली मेट्रोने देखील जनतेसाठी काही सुविधा सुरू केल्या आहेत. या सोहळ्या दिवशी मेट्रो सकाळी 4 वाजल्यापासून सुरू केली जाणार आहे. त्यामुळे लोकांना लाल किल्ल्यावर पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही. लाल किल्ला मेट्रो स्टेशन आणि चांदनी चौक मेट्रो स्टेशन ही जवळची स्टेशन आहेत.
या स्टेशनवरून काही मिनिटांच्या अंतरावर लाल किल्ला आहे जिथे स्वतंत्र्य दिनाचा सोहळा आयोजित केला जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहे, यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही साडेसहा किंवा सात वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचाल.